ETV Bharat / state

Measles : मुंबईत गोवर साथीचे ६१ मुले कस्तुरबा रुग्णालयात दाखल, ६ ऑक्सिजनवर - Increase number of measles patients in Mumbai

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसात गोवर रुग्णांची संख्या वाढत ( measles patients increasing ) आहे. आतापर्यंत १२६ गोवरचे रुग्ण आढळून आले असून ९०८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ६१ रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

measles
measles
author img

By

Published : Nov 14, 2022, 10:53 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये गेल्या काही दिवसात गोवर रुग्णांची संख्या वाढत ( measles patients increasing ) आहे. आतापर्यंत १२६ गोवरचे रुग्ण आढळून आले असून ९०८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ६१ रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ६ रुग्ण ऑक्सीजनवर आहेत. हे सर्व रुग्ण लहान मुले असून ती मुंबईमधून दाखल झाली आहेत. त्यासाठी रुग्णालयात ३ कक्ष उभारण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

९०८ संशयित रुग्ण - मुंबईमध्ये एम पूर्व म्हणजेच गोवंडी विभागात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यापासुन गोवर आजाराचा संसर्ग वाढल्याचे आढळून आले असून दोन महिन्यात ९९ रुग्णांची नोंद झाली आहे. एम पूर्व गोवंडी विभागात एकूण १ लाख १४ हजार १५७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या ठिकाणी अतिरिक्त लसीकरण सत्रामध्ये १२६१ मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर मुंबईत १० लाख ९२ हजार ३९१ घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

मुंबईत जानेवारीपासून आतापर्यंत एकूण १२६ गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. तर ९०८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत अतिरिक्त सत्रात ५९७२ मुलांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. या विभागात केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या तीन सदस्य असलेली टीम विभागवार भेट देत आहे. या टीमने तीन संशयित मृत्यूनंतर शवविच्छेदन केलेल्या राजावाडी रुग्णालयाला भेट दिली आहे.

६ रुग्ण ऑक्सीजनवर - ० ते ८ महिन्याचे ९९, ९ ते ११ महिने १०५, १ ते ४ वर्ष ४९३, ५ ते ९ वर्षे १६२, १० ते १४ वर्षे ४४, १५ आणि त्यावरील ६ असे एकूण ९०८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी कस्तुरबा रुग्णालयात ६१ रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. त्यात ० ते ८ महिन्याचे ८, ९ ते ११ महिने ५, १ ते ४ वर्ष ३१, ५ ते ९ वर्षे १४, १५ आणि त्यावरील ३ रुग्ण आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या ६१ रुग्णांपैकी ६ रुग्ण ऑक्सीजनवर आहेत.

केंद्रीय पथकाने दिल्या या सूचना - केंद्रीय पथकाने आज राज्य शासनाच्या प्रमुख सचिवांना तसेच अतिरिक्त आयुक्त (प.उ.) यांना मुंबईतील गोवर उद्रेकाच्या सद्यपरिस्थितीबाबत माहिती देऊन सुचना दिल्या आहेत. त्यात उद्रेक असलेल्या विभागात सर्वेक्षणाव्दारे दररोज ताप व पुरळ असलेल्या नविन रूग्णांचा शोध घेणे. लक्षण आढळलेल्या रूग्णांचा दुस-या दिवशी पाठपुरावा करणे. अतिरिक्त लसीकरण सत्राचे आयोजन करणे. रुग्ण दाखल करण्याची सुविधा वाढविणे. आरोग्य सेविकांना गोवर आजाराच्या गंभीर लक्षणांबाबत अवगत करणे. खाजगी डॉक्टरांना गोवर आजार व लसीकरणाविषयी अवगत करणे. लसीकरणाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करणे अशा सूचना दिल्या आहेत. केंद्रीय पथक सदर अहवाल शासनाकडे सादर करणार आहे.

लसीकरण करून घ्या - मुंबईमधील झोपडपट्टी विभाग असलेल्या मानखुर्द गोवंडी एम ईस्ट, एम वेस्ट, जी नॉर्थ धारावी, कुर्ला एल वॉर्ड, पी नॉर्थ मालाड येथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असून या याठिकाणी रुग्णसंख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. विशेष करून गोवंडी विभागात रुग्णांची संख्या अधिक असल्याने मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येत आहे. मुंबईकरांनी लहान मुलांचे वेळीच मिसेल रुबेलावरील लस द्यावी असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

या केल्या जात आहेत उपाययोजना - आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत घरोघरी जाऊन गोवर संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत असून संशयित रुग्णांना जिवनसत्व "अ" देण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास जवळच्या महापालिका रुग्णालयात उपचारासाठी संदर्भित करण्यात येत आहे. तसेच ९ महीने व १६ महिन्यांच्या बालकांसाठी लसीकरणाचे अतिरिक्त सत्रे आयोजित करण्यात येत असून वैद्यकीय अधिकार्‍यामार्फत बालकांची तपासणी करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.