ETV Bharat / state

Mumbai Cyber Crime : प्रलोभनाने भुलवून ओढतात सायबर क्राईमच्या विळख्यात, लॉकडाऊन नंतर नोकरी फसवणुकीच्या प्रमाणात वाढ - ऑनलाइन फसवणूक

Mumbai Cyber Crime : लॉकडाउनच्या काळात मोबाइलचा वापर वाढला आहे. या गोष्टीचा फायदा सायबर गुन्हेगार घेत असून, या माध्यमावर नव्यानं प्रवेश करणाऱ्यांना ते 'लक्ष्य' करत आहेत. यामुळेच या कालावधीत मुंबईतील सायबर गुन्ह्यांमध्ये (Cyber Fraud) वाढ झाली आहे. यात आर्थिक फसवणुकीची प्रकरणं आघाडीवर आहेत. 2021 पासून सुरू झालेला नोकरीच्या फसवणुकीचा ट्रेंड अजूनही सुरूच आहे. वाचा हा विळखा कसा घट्ट होत आहे.

Cyber Crime
सायबर क्राईमचे बळी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2023, 7:59 PM IST

Updated : Nov 13, 2023, 9:35 PM IST

मुंबई Mumbai Cyber Crime : लोभापायी लोक सायबर फसवणुकीचे बळी ठरत आहेत. लॉकडाऊननंतर नोकरीच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये (Cyber Fraud) वाढ झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात एकीकडे लोक बेरोजगार होत होते. तर काही लोक अर्धवेळ नोकरी करून पैसे मिळवण्याचा मार्ग शोधत होते. तर दुसरीकडे ऑनलाइन फसवणूक करणारे गोड बोलून लोकांची फसवणूक करत होते. फसवणूक करणाऱ्यांची एक मोठी टोळी असून त्यात महिला आणि पुरुष दोघेही सामील आहेत. त्यांची बोलण्याची पद्धत अशी आहे की, पीडितांना सर्वकाही खरे आहे असं वाटतं आणि ते त्यांच्या जाळ्यात अडकतात. सायबर क्राइम ब्रँचशी संबंधित एका महिला अधिकाऱ्यानं सांगितलं की, पश्चिम बंगाल आणि राजस्थानचे भरतपूर आणि मुर्गा मुंडा, नेपाळ बॉर्डर आणि पश्चिम बंगाल बॉर्डर हॉटस्पॉट बनले आहेत.

नोकरीची अशा दाखवून केली फसवणूक : 17 मार्चला वी फ्लाय यूट्यूब मार्केटिंग कंपनीची कर्मचारी म्हणून, पीडितेला टेलीग्राम युझर आयडीवरून +63 क्रमांकासह अर्धवेळ नोकरीची माहिती पाठवण्यात आली. तिला खूप मोठे कमिशन आणि बोनस दिला जाईल अशी बतावणी करण्यात आली. YouTube चॅनेलची सदस्यता घेतल्यावर पीडितेला प्रथम वर्गणीच्या नावावर कमिशन देण्यात आलं. परंतु लाखो कमावण्याचे लालच दाखवून पीडितेला हळूहळू 10 लाख 67 हजार 220 गुंतवायला लावले. त्यानंतर अचानक फसवणूक करणाऱ्यांचा पीडितेशी संपर्क तुटला आणि स्वत:ची फसवणूक झाल्याचं समजून पीडितेनं सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सायबर विभागाचे पोलिस निरीक्षक मौसमी पाटील आणि सहायक पोलीस निरीक्षक नितीन गच्छे यांनी कांजूरमार्ग परिसरात राहणाऱ्या सुमित सतीशचंद्र गुप्ताला अटक केली. तर देशभरात आरोपी आणि त्याच्या साथीदारांवर 80 गुन्हे दाखल आहेत.

टेलीग्राम अकाउंटवर फसवणूक : सायबर पश्चिम विभागात ८ मार्चला तक्रार नोंदवण्यात आली होती. ज्यात एका महिलेने पार्ट टाईम जॉबच्या नावावर टेलीग्राम अकाउंट @payrollofficer Surendr द्वारे +60 नंबरवरून पैसे गुंतवले होते. त्यानंतर वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी रक्कम अदा करून एकूण 13 लाख 26 हजार 480 रुपयांची फसवणूक करण्यात आली. तक्रार मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त डॉ डी एस स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे यांनी एक पथक तयार केलं. पोलिसांनी चेन्नई येथील रफिक मोहम्मद आणि तामिळनाडू येथील उदय रंजीत राजा यांना अटक केली. दोघांकडून ७ जुने मोबाईल जप्त केले.

जवळच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधा : मुंबई सायबर विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ. डी.एस.स्वामी यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितलं आहे की, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) करणाऱ्यांपासून खासकरून दूर राहावे आणि मोबाईल फोनवर कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बँक खाते क्रमांक सांगू नये. तसेच पासवर्ड, OTP, KYC, डेबिट कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर आणि इतर कोणतीही संवेदनशील माहिती शेअर करू नका. असं करण्यासाठी कोणी तुमच्यावर दबाव आणत असेल तर तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवा. कोणाच्याही सल्ल्यानुसार कोणतेही मोबाइल ॲप डाउनलोड करू नका किंवा कोणतीही लिंक उघडू नका, तुमच्यासोबत कोणतीही सायबर फसवणूक झाली असेल तर तुम्ही 1930 वर कॉल करू शकता. तुम्ही जवळच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधू शकता किंवा https://cybercrime.gov.in वर ऑनलाइन तक्रार देखील करू शकता.

सायबर फसवणूक पद्धती : यामध्ये पीडितेला काही पैसे खात्यात गुंतवायला लावले जातात आणि नंतर त्याला वेगळे टास्क दिले जाते. ते पूर्ण केल्यावर फसवणूक करणारा दुसरा लालच दाखवून सापळा टाकतो. पैसे डबल करून देण्याची लालच दाखवली जाती.

ऑनलाइन नोकरी फसवणूक : तुम्हाला एका विशिष्ट कंपनीत लाखो रुपयांची नोकरी मिळत आहे. मात्र यामध्ये कागदपत्रे, मेडिकल, पोलिस व्हेरिफिकेशनच्या नावाखाली पैशांची मागणी केली जाते. पण पीडितेला कधीच नोकरी मिळत नाही.

लाईट बिल फसवणूक : यामध्ये, फसवणूक करणारे मुख्यतः 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लक्ष्य करतात. त्यांना फोन करून तुमचे वीज बिल थकले आहे आणि उद्यापर्यंत ते भरले नाही तर वीज खंडित होईल असे सांगितलं जातं. त्या व्यक्तीने उपाय विचारताच, फसवणूक करणारा त्याला एक लिंक पाठवतो आणि त्यात ओटीपी भरण्यास सांगतो. तुम्ही लिंक उघडताच तुमच्या खात्यातून पैसे गायब होतात.

लैंगिक शोषण फसवणूक (सेक्सटॉर्शन) : सोशल मीडियावर तुमची मैत्री होताच सुंदर स्त्रीच्या फोटोसह फ्रेंड रिक्वेस्ट येते. चॅटिंग सुरू होतं आणि मग प्रकरण व्हिडिओ कॉलपर्यंत येतं. व्हिडिओ कॉल उचलताच एक विवस्त्र महिला दिसते, त्यानंतर सायबर गुन्हेगार मोबाईल स्क्रीनचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेलिंग सुरू करतात.

कस्टम फसवणूक : सोशल मीडियावर मैत्री केल्यानंतर, फसवणूक करणारा परदेशात असल्याची बतावणी करून तेथून तुम्हाला करोडो रुपयांची महागडी भेटवस्तू पाठवण्याचे आश्वासन देतो. त्यानंतर कस्टम क्लिअरन्सच्या नावाखाली पैसे उकळायला सुरू करतो. कोट्यवधींच्या भेटवस्तू मिळविण्यासाठी, पीडितेला 20-25 लाख रुपये दिले जातात आणि नंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येतं.

OLX फसवणूक : OLX या साइट्सवर, सायबर गुन्हेगार मोठ्या सरकारी अधिकाऱ्याचे तपशील पोस्ट करतात, जेणेकरून लोकांचा त्याच्यावर विश्वास बसेल. खरेदीदार मुंबईचा असेल तर तो आसामचा असल्याचे भासवून फसवणूक करतो. त्यामुळे तो माल इथे पोहोचला आणि तिथे पोहोचला, अशी बतावणी करून तुमच्याकडून पैसे उकळत राहतो.

कर्ज ऍप फसवणूक : कर्ज मिळवण्यासाठी, एखादी महिला किंवा पुरुष लोन ॲप डाउनलोड करताच, ॲप पूर्ण परवानगी घेतो, ज्यामुळे तुमचा संपर्क क्रमांक आणि गॅलरीतील फोटोंचा संपूर्ण प्रवेश फसवणूक करणाऱ्याकडे जातो, त्यानंतर तो तुमचे मोबाईलमधील फोटो काढून अश्लील असल्याप्रमाणे मॉर्फ करून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करतो. नंतर मोठ्या प्रमाणावर पैसे उकळण्यास सुरुवात केली जाते.

हेही वाचा -

  1. Govt Officials Fake FB Account : शाहरुख खानचा कारनामा; शासकीय अधिकाऱ्यांचे बनावट अकाउंट बनवून फसवणूक
  2. Cyber Crime Pune : पुण्यात सायबर गुन्ह्यात वाढ, 8 महिन्यात विविध गुन्ह्यांमध्ये कोट्यवधींचा गंडा
  3. Nashik Cyber Crime : इन्स्टाग्रामवरील 'ड्रीम गर्ल'कडून तरुणाची २ लाखांची फसवणूक, 'हे' टाळा अन्यथा तुम्हालाही वाटेल पश्चाताप

Last Updated : Nov 13, 2023, 9:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.