ETV Bharat / state

Ting Tong Online App: झोपडपट्टीतील बेरोजगार तरुणांसाठी त्याने बनवले टिंग टॉंग ॲप, हजारोंनी रोजगार देण्याचे तरुणाचे स्वप्न - Ting Tong Online App In Mumbai

झोपडपट्टीतली मुले ही व्यसनाच्या आहारी गेलेली असतात. परंतु आज झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांना रोजगार मिळावा म्हणून, एक मराठी युवक उद्योग क्षेत्रात उभा राहिला आहे. त्याने मुंबईच्या झोपडपट्टीतील तरुणांसाठी 'टिंग टाँग' ऑनलाईन ॲप तयार केले आहे.

Ting Tong Online App
टिंग टॉंग ॲप
author img

By

Published : Apr 26, 2023, 7:40 PM IST

Updated : Apr 26, 2023, 7:56 PM IST

तरुणांनसाठी टिंग टाँग ऑनलाईन ॲप तयार केले

मुंबई: मुंबई म्हटले की, सर्वांच्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे मोठमोठ्या इमारती, मोठमोठे बिजनेस पार्क, एक अतिशय पॉश शहर अशी प्रतिमा. देशाच्या आर्थिक राजधानीची ओळख अशी देखील या शहराची ओळख आहे. मात्र, आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी धारावीदेखील याच मुंबईत आहे. धारावीसारख्या अनेक लहान-लहान झोपडपट्ट्या या मुंबईच्या कुशीत वसल्या आहेत. झोपडपट्टी म्हटले की, अनेकांच्या डोळ्यासमोर येते ती इथली गुन्हेगारी पार्श्वभूमीची तरुण मुले. हेच एखाद्याच्या मनात येते. मुंबईच्या झोपडपट्टीतील तरुणांची ही ओळख पुसण्यासाठी आता याच झोपडपट्टीतून मोठा झालेला एक तरुण उद्योजक सरसावला आहे.

झोपडपट्टीतून पुढे आलेला उद्योजक उदय पवार : झोपडपट्ट्यांमध्ये राहणारी ही मुले गुन्हेगारी व व्यसनाच्या आहारी जाण्याचे मुख्य कारण म्हणजे बेरोजगारी. या मुलांच्या अंगात कला आहे, मात्र शिक्षण नाही. यांच्या कलेनुसार एखादे काम मिळेल अशी सोय नाही. त्यामुळे या मुलांच्या मदतीसाठी मुंबईच्या जिजामाता नगर येथील झोपडपट्टीत राहणारा एक तरुण उद्योजक पुढे आला आहे. उदय पवार असे या तरुण उद्योजकाचे नाव आहे. ते मुलांच्या उज्वल भविष्यासाठी प्रयत्न करत आहेत. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांना रोजगार मिळावा म्हणून उदय पवार या तरुणाने टिंग टॉंग नावाचे ॲप तयार केले. तर या ॲपद्वारे या तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मोठ्या प्रमाणात बेरोजगारी : याबाबत माहिती देताना उदय यांनी सांगितले की, जिजामाता नगरच्या झोपडपट्टीतून ते लहानाचे मोठे झाले. मात्र, जेव्हा ते सांगायचे की, आम्ही अशा अशा ठिकाणी राहतो तेव्हा मात्र लोकांच्या बघण्याच्या नजरा बदलायच्या. अनेकांना वाटतं की झोपडपट्टीत राहणारे म्हणजे सर्वच बिघडलेले असतात. मात्र, तसे नाही. इथे राहणाऱ्या प्रत्येकाकडे विविध कला, गुण आहेत. मात्र, त्या आम्हाला दिसतात आणि बाहेर राहणाऱ्यांना दिसत नाहीत हाच काय तो फरक. उदय यांना हे चित्र बदलायचे होते. त्यांनी तरुण वयातच सामाजिक कामात स्वतःला झोकून दिले. त्यावेळी अनेकांचे आई-वडील, पत्नी भावंड सांगायची, माझा भाऊ बहीण बेरोजगार आहे. माझा पती बेरोजगार आहे. त्यांना कुठे काम असेल तर सांगा. आता या प्रत्येकाला काम देऊ शक्य नव्हते. त्यावेळी मनात एक बिझनेस ॲप बनवण्याची संकल्पना आली, असे ते म्हणाले.

आयटी इंजिनियर मित्रांनी मदत केली : माझे शिक्षण कमी झाले आहे. त्यामुळे ॲप बनवण्याची संकल्पना काही मित्रांना सांगितली. त्यामुळे मित्रांची मदत घेणे आवश्यक होते. ही संकल्पना माझ्या आयटी इंजिनियर मित्रांना आवडली आणि त्यांनी मला मदत केली. या ॲपमध्ये आम्ही मुंबई सोबतच इतर शहरांमधील देखील व्यावसायिकांना जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. या टिंगटॉंग ऑनलाइन ॲपमध्ये तुम्हाला दैनंदिन वापरासाठी किंवा मदतीसाठी जे काही लागते ते सर्व मिळणार आहे.

मुंबईतील वेंडरचे सध्या रजिस्ट्रेशन सुरू : या ॲपबाबत माहिती सांगताना उदय पवार यांनी सांगितलं की, तुम्हाला रोजच्या दैनंदिन जीवनात गरजेसाठी जे काही आवश्यक असते ते तुम्हाला या ॲपमध्ये मिळेल. म्हणजे तुमच्या घरात एखादी व्यक्ती आजारी असल्यास तुम्हाला नजीक कोणता दवाखाना, हॉस्पिटल आहे याची माहिती हवी असेल तर ती या ॲपमध्ये मिळेल. तुम्हाला प्लंबर, इलेक्ट्रिशन इतकच काय वकील, सीए अशा सर्वच गोष्टी तुम्हाला या ॲपमध्ये मिळतील. तुम्हाला तुमच्या घराजवळ एखादा पाणीपुरीवाला आहे का? याची माहिती देखील तुम्हाला या ॲपमध्ये मिळणार आहे. त्यासाठी आम्ही मुंबईतील या वेंडरच रजिस्ट्रेशन आमच्या ॲपमध्ये करत आहोत. त्यामुळे अनेकांना घरबसल्या रोजगार मिळत आहे. तसेच हे ॲप मोबाईल मध्ये प्ले स्टोअर उपलब्ध आहे.

दिवसाला फक्त 1 रुपया रजिस्ट्रेशन फी : उदय पवार यांनी सांगितले की, मला माहिती आहे की, मी ज्या प्रकारचे एप्लीकेशन तयार केले अशाच प्रकारची मोठमोठ्या कंपन्यांची ऍप्लिकेशन मार्केटमध्ये आहेत. मात्र, या कंपन्यांच्या ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला तुमचा व्यवसाय रजिस्टर करायचा झाल्यास त्यासाठी लागणारे चार्जेस अधिक आहेत. सोबतच या कंपन्यांकडून तुम्हाला काम मिळाल्यास त्यांना कमिशन देखील द्यावे लागते. एकतर छोटे वेंडर आणि त्यांची कमाई ही अतिशय कमी असते. त्यात झोपडपट्टीत राहणाऱ्या स्ट्रीट वेंडरची कमाई तर अतिशय तुटपुंजी असते. मग त्यांचे कामाचा मोबदला हा जर या कंपन्यांच्या रजिस्ट्रेशन आणि कमिशनमध्ये जात असेल तर त्याचा त्याला फायदा होत नाही. म्हणून या ॲपमध्ये कोणतेही कमिशन ठेवलेले नाही. इथे तुम्हाला रजिस्ट्रेशनची देखील एकदम माफक फी आहे. तुम्हाला दिवसाचा एक रुपया म्हणजेच वर्षाचे फक्त 365 रुपये इथे रजिस्ट्रेशन फी आहे. त्यामुळे हे सर्वांना परवडणार एप्लीकेशन आहे.

हेही वाचा: Mumbai News राष्ट्रीय हरित लवादाचा महत्त्वाचा निर्णय खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या बिल्डरला पंधराशे झाडे लावण्याचा दंड

Last Updated : Apr 26, 2023, 7:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.