मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणामध्ये 54 वर्ष विविध पदांवर काम केले आहे मात्र त्याशिवाय शरद पवार हे क्रीडा विश्व आणि साहित्य विश्वातही तितकेच लोकप्रिय आहेत. खेळाडूंसाठी आणि साहित्यिकांसाठी अनेकदा प्रयत्न करताना शरद पवार दिसत आहेत. मातीतल्या खेळाविषयी शरद पवारांना विशेष आकर्षण आहे म्हणूनच त्यांनी कबड्डी खो-खो आणि कुस्ती या क्रीडा प्रकारातील खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन दिले. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद असेल कबड्डीची संघटना असेल अथवा खो-खो संघटनेच्या पदांवर शरद पवारांनी काम केले आहे.
क्रिकेटमध्येही पवार : शरद पवारांनी क्रिकेट या लोकप्रिय खेळाकडेही आपला मोर्चा वाढवला. ते 2001 ते 2016 दरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी विराजमान होते २०१० ते २०१२ या दोन वर्षांचा कालावधी वगळता ते सलग चौदा वर्ष अध्यक्षस्थानी होते या काळात त्यांनी क्रिकेटपटूंसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
क्रिकेटपटूंना पेन्शन सुरू करण्यामध्ये आणि ती योग्य देण्यामध्ये शरद पवारांचा महत्त्वाचा वाटा आहे.
बीसीसीआय ते आयसीसी पवार : 2004 मध्ये झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवडणुकीत शरद पवारांना पहिल्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला दालमिया विजयी झाले मात्र त्यानंतर पुढच्याच वर्षे त्यांनी दालमियांचा पराभव करत बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान झाले त्यानंतर शरद पवार आणि त्यांच्या गटाचा भारतीय क्रिकेट नियमक मंडळावर बरीच वर्ष वर चष्मा राहिला.
आयसीसीचेही अध्यक्ष : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष राहिलेल्या शरद पवार यांना 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळायला मिळाली. टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सुरू असलेली अत्यंत लोकप्रिय अशी इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आयपीएलही शरद पवार यांच्याच कारकिर्दीत सुरू झाली
शरद पवार साहित्य संस्थामध्येही : शरद पवार हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेतच याशिवाय शरद पवार हे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे ही अध्यक्ष आहेत. अनेक साहित्यिक संस्थांमध्येही शरद पवारांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.