ETV Bharat / state

राज्यात गेल्या 24 तासांत 5 पोलिसांना कोरोनाची लागण, एकाचा मृत्यू - Mumbai police corona treatment

दुर्दैवाने राज्यात मुंबई पोलीस दलातील 22 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला मुंबई पोलीस खात्यातील 516 पोलीस कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत, तर तब्बल 224 पोलीस रुग्णालयात दाखल आहेत. 33 पोलिसांना घरातच क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मुंबई पोलीस महत्त्वाची बातमी
मुंबई पोलीस महत्त्वाची बातमी
author img

By

Published : Jun 12, 2020, 1:41 PM IST

मुंबई - कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी लॉकडाऊनचा 5 वा टप्पा लागू करण्यात आला आहे. राज्य पोलीस दलात गेल्या 24 तासांत 5 कोरोनाग्रस्त पोलीस अधिकारी आढळून आले . दुर्दैवाने कोरोनामुळे आणखीन एका पोलिसाचा मृत्यू झाल्याने मृत पोलिसांचा आकडा 36 वर गेला आहे. राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात अजूनही 1 हजार 388 कोरोनाबधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. यात 196 पोलीस अधिकारी तर, 1192 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात कलम 188 नुसार तब्बल 1 लाख 27 हजार 846 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मुंबई वगळता क्वारंटाईनचा नियम मोडणाऱ्या 730 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. राज्यभरात या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 263 घटना घडल्या आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 846 जणांना अटक झालेली आहे. कोविड-19 च्या संदर्भात तब्बल 1 लाख 2 हजार 205 कॉल पोलीस नियंत्रण कक्षावर आले असून अवैध वाहतुकीच्या 1 हजार 333 प्रकरणात 25 हजार 741 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 81 हजार 488 वाहने जप्त करण्यात आली असून तब्बल 7 कोटी 16 लाख 36 हजारांचा दंड पोलिसांनी ठोठावला आहे. राज्यात वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 49 घटना घडल्या असून 86 पोलीस जखमी झाले आहेत.

मुंबई पोलीस खात्यात सर्वाधिक मृत्यू

लॉकडाऊन काळात रस्त्यावर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या मुंबई पोलीस खात्यातील 2 हजार 28 पोलीस कोरोना संक्रमित झाले असून यात 290 पोलीस अधिकारी, तर 1 हजार 738 पोलीस कर्मचारी आहेत. सध्या 795 पोलिसांवर उपचार सुरू असून यापैकी एकूण 1 हजार 233 पोलीस कोरोनातून बरे झाले आहेत. दुर्दैवाने राज्यात मुंबई पोलीस दलातील 22 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला मुंबई पोलीस खात्यातील 516 पोलीस कोविड सेंटर मध्ये उपचार घेत आहेत. तर, तब्बल 224 पोलीस रुग्णालयात दाखल आहेत. 33 पोलिसांना घरातच क्वारंटाईन करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.