ETV Bharat / state

झेब्राच्या बदल्यात मुंबईच्या राणीबागेला मिळणार 'हे' प्राणी - गुजरात बातमी

फेब्रवारीमध्ये गुजरात, इंदूरमधील प्राणिसंग्रहालयातून सिंह, अस्वल, लांडगा हे प्राणी आणले जाणार आहेत. त्यासाठी थायलंडमधून झेब्राच्या दोन जोड्या घेऊन संबंधित प्राणीसंग्रहालयांना देण्यात येणार आहे. तसा करार महापालिका प्रशासनाने केला आहे.

राणी बाग
राणी बाग
author img

By

Published : Dec 28, 2020, 8:58 PM IST

मुंबई - बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण असलेल्या राणीबाग म्हणजेच वीर जिजामाता भोसले उद्यान येथे फेब्रवारीमध्ये गुजरात, इंदूरमधील प्राणिसंग्रहालयातून सिंह, अस्वल, लांडगा हे प्राणी आणले जाणार आहेत. त्यासाठी थायलंडमधून झेब्राच्या दोन जोड्या घेऊन संबंधित प्राणीसंग्रहालयांना देण्यात येणार आहे. तसा करार महापालिका प्रशासनाने केला आहे.

प्राण्यांची देवाण-घेवाण

वीर जिजामाता भोसले उद्यान हे मुंबईचे वैभव आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे भेटी देतात. गर्दीने घुसमटलेल्या मुंबईकरांचे हे विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण आहे. परदेशी पेंग्विन, वाघ, बिबट्या, कोल्हे, अस्वल, देशी-विदेशी शंभर प्रकारचे पक्षी आणले आहेत. प्राणी-पक्षांमुळे पर्यटक, मुंबईकरांचे आकर्षण वाढले आहे. सध्या राणीबागेचा कायापालट सुरू आहे. अत्याधुनिक सुधारणा आणि सौंदर्यीकरणावर भर दिला आहे. यातील पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली आहेत. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये विविध प्राण्यांसाठी पिंजरे बांधली जात आहेत. गुजरातमधील जुनागढ येथील साकरबाग प्राणिसंगहालयातून प्रख्यात आशियाई सिंहाच्या दोन जोडी आणली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंजऱ्याचे बांधकाम सुरू आहे. लपण्यासाठी छोटी झुडपे, सावलीच्या जागा, मोठी झाडे, पाण्याचा छोटा जलाशय, तसेच बसण्याकरिता मोठे दगडांची व्यवस्था केली जाणार आहे. तर प्रदर्शनासाठी गीर 'मलधारी' आदिवासी प्रजातींच्या घरांची रचना केली आहे. आशियाई सिंहाच्या दोन जोड्यांच्या बदल्यात साकरबाग प्राणिसंग्रहालयाला दोन झेब्रा जोडी दिली जाणार आहे. तर इंदूरमधील कमला नेहरू प्राणिसंग्रहालयाला एक झेब्रा जोडी देऊन त्यांच्याकडून अस्वल, सिंह आणि लांडगा या तीन प्रजातींच्या प्रत्येकी एक जोडी घेतली जाणार आहे. महापालिकेने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला तसा पत्रव्यवहार केला आहे. मे. गोवाट्रेड फार्मिंग कंपनी लि.थायलंड या कंपनीला अटी-शर्तीवर हे काम दिले आहे. ही कंपनी गुजरात आणि इंदूरसह राणीबागेत सुस्थितीत प्राणी पोहोचविणार आहे. त्यासाठी 84 लाख 68 हजार 196 रुपये देण्याबाबत पालिकेचा करार झाला आहे. स्थायी समितीच्या पटलावर या संदर्भातील प्रस्ताव मंजूरीसाठी सादर करण्यात आला आहे.

अशा आहेत अटी-शर्ती

झेब्राच्या दोन जोड्या (एक नर-एक मादी) 6 महिन्यांच्या कालावधीत परदेशातून आयात कराव्या लागतील. त्यापैकी एक जोडी गुजरात आणि एक जोडी इंदूर प्राणिसंग्रहालयाला द्यावी लागेल. राणीबागेलाही याच कालावधीत सिंह, लांगडा आणि अस्वलची एक जोडी देण्याचा करार झाला आहे. करारनुसार 50 टक्के रक्कम पहिली तर उर्वरित संबंधित प्राण्यांची देवाण-घेवाण पूर्ण झाल्यावर दिली जाणार आहे. साकरबाग प्राणिसंग्रहालयाला 10 फेब्रवारी, 2021 पर्यंत प्राण्यांचा पुरवठा करण्याबाबत कालावधी निश्चित केला आहे.

हेही वाचा - संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने पाठविलेल्या नोटीसचे नारायण राणे यांच्याकडून समर्थन

हेही वाचा - 'ईडी नोटीस'प्रकरणी राऊत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.