ETV Bharat / state

मुंबईत वाहनांसाठी कलर कोड लागू; नागरिक स्वतःही स्टिकर चिटकू शकतात, मात्र खोटी माहिती असल्यास कारवाई - मुंबईत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना स्टिकर

पिवळा, लाल आणि हिरव्या रंगाचे स्टिकर वाहनांना लावण्यात येणार आहेत. त्यामुळे नाका-बंदी या अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना वाहतूक कोंडीत थांबण्याची गरज भासणार नाही. लाल रंग वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी असेल. हिरवा रंग भाजीपाला व या प्रकारच्या वाहनांसाठी असेल तर पिवळा रंग अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या वाहनांसाठी असेल.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Apr 18, 2021, 4:32 PM IST

मुंबई - अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, याकरिता मुंबई पोलिसांनी तीन रंगाचे स्टिकर वाटण्यास सुरुवात केली आहे. आज मुलूंडनगर टोल नाका येथे देखील पोलिसांनी काहीच स्टिकर वाटले. यावेळी पोलीस आयुक्त नगराळे यांनी देखील या ठिकाणी पाहणी केली.

वाहनांसाठी कलर कोड लागू

पिवळा, लाल आणि हिरव्या रंगाचे स्टिकर वाहनांना लावण्यात येणार आहेत. त्यामुळे नाका-बंदी या अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना वाहतूक कोंडीत थांबण्याची गरज भासणार नाही. लाल रंग वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी असेल. हिरवा रंग भाजीपाला व या प्रकारच्या वाहनांसाठी असेल तर पिवळा रंग अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या वाहनांसाठी असेल.

मुलुंड चेक नाका येथे पोलिसांतर्फे गाड्यांवर स्पीकर फिट करण्यात येत आहेत. मुंबई पोलीस आयुक्त हेंमत नगराळे यांनी ही भेट देत गाड्यांवर स्टिकर चिटकवले तर नागरिकांनी स्वतः ही प्रिंट करून सहा इंच व्यासाचे स्टिकर चिटकू शकता. मात्र, या गाड्यांचीही तपासणी होऊ शकते आणि जर कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली. या स्टिकरचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल तर हे स्टिकर मुंबईपर्यंत वैध राहील.

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना स्टिकर

मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना आता तीन रंगाचे स्टिकर लावण्यात येत आहेत. मुंबईमधील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी आणि विनाकारण बाहेर फिरण्यावर आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. यासाठी आता मुंबईतील पोलीस आयुक्त पुढे येऊन अगदी तातडीने या कामाला लागलेले दिसत आहेत. परिमंडळ 7 चे उपायुक्त प्रशांत कदम यांनी स्वतः मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या आनंदनगर टोल नाक्यावर या मोहिमेला सुरुवात केली आहे. प्रत्येक वाहन तपासून त्यांना हे स्टिकर लावले जात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.