मुंबई - येथील ईडी (सक्तवसुली संचनालय) कार्यालयासमोर टॉप सिक्युरिटीच्या कर्मचाऱ्यांनी येऊन त्यांना न मिळालेल्या वेतनाबाबत हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. मागील काही महिन्यांपासून टॉप सिक्युरिटीच्या माध्यमातून काम करणाऱ्या सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांना त्यांचे मासिक वेतन न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
टॉप सिक्युरिटीचा मुळ मालक राहुल नंदा हा देशातून फरार झाला असून दुबईमध्ये जाऊन बसला आहे. मात्र, वेतन देण्याच्या नावाखाली कुठलेही उत्तर कंपनीकडून मिळत नसल्यामुळे आम्हाला आमचा हक्क मिळवून द्यावा, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी ईडीकडे केली आहे.
दरम्यान , टॉप सिक्युरिटीचा मालक अमित चांदोले याला ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे. एमएमआरडीएला सुरक्षारक्षक पोहोचण्याच्या कंत्राटामध्ये 175 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप अमित चांदोले याच्यावर करण्यात आलेला आहे सध्या अमित चांदोले हा ईडी ताब्यात आहे.
हेही वाचा - संजय राऊत यांच्यावर उद्या होणार 'अँजिओप्लास्टी'
हेही वाचा - दुःखद : मुंबईत फुग्याचा तुकडा घशात अडकल्याने लहानग्याचा मृत्यू