BUDGET 2019 : निर्मला सीतारामण आज सादर करणार केंद्राचा अर्थसंकल्प
नवी दिल्ली - मोदी सरकारच्या दुसऱ्या पंचवार्षिकीमधील पहिला अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. देशाला लाभलेल्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पा'कडे सर्वांचे लक्ष असून, अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी अर्थमंत्री सीतारामण कोणते निर्णय घेतात याविषयी उत्सुकता आहे. वाचा सविस्तर...
Modi 2.0 BUDGET 2019 : संपत्तीचे केंद्रीकरण रोखण्यासाठी श्रीमंतांवर संपत्ती कर लागू करावा ; जनता दलाची मागणी
मुंबई - शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रांवरील खर्च वाढविण्याबरोबरच संपत्तीचे केंद्रीकरण रोखण्यासाठी देशातील श्रीमंतांवर संपत्ती कर व वारसा कर पुन्हा लागू करण्यात यावा, अशी मागणी जनता दल (से) महाराष्ट्र तसेच या पक्षाशी संलग्न लोकायत संघटनेने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे केली आहे. वाचा सविस्तर...
BUDGET 2019 : आधार भावात केलेली वाढ तुटपुंजी, किसान सभा उतरणार रस्त्यावर !
मुंबई - मोदी सरकारने यंदाच्या खरीप हंगामासाठी प्रमुख पिकांच्या किमान आधार भावात अत्यंत कमी वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमांवर पुन्हा एकदा मीठ चोळले आहे. त्यामुळे किसान सभा शेतकऱ्यांवरील या अन्यायाचा तीव्र शब्दात धिक्कार करत असून या विरोधात संघर्षासाठी राज्यभर रस्त्यावर आंदोलन करण्याची घोषणा करत आहे, असे अखिल भारतीय किसान सभेचे महाराष्ट्राचे महासचिव डॉ. अजित नवले यांनी ईटिव्ही भारतशी बोलताना सांगितले. वाचा सविस्तर...
गाझियाबाद : वडिलांसह २ मुलांचे आढळले मृतदेह, पित्यानेच हत्या केल्याचा संशय
लखनौ - उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील शताब्दीपुरम येथे वडिलांसह दोन मुलांचे मृतदेह अढळून अल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुलांसह पतीचा मृतदेह पाहताच पत्नीची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाचा सविस्तर...
लव्हबर्ड्स अर्जुन-मलायकाने न्युयॉर्कमध्ये घेतली ऋषी कपूर यांची भेट
मुंबई - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हे सध्या न्युयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या तब्बेतीत बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. आत्तापर्यंत कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी त्यांची भेट घेतली. नीतू कपूर त्यांचे काही फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच लव्हबर्ड्स मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनीदेखील ऋषी कपूर यांची भेट घेतली. त्यांचा फोटोदेखील नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. वाचा सविस्तर...
बातमी, सर्वांच्या आधी
www.etvbharat.com/marathi/maharashtra