ETV Bharat / state

आज...आत्ता...एका क्लिकवर दुपारी ३ पर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या - etv bharat

१st Semifinal INDvsNZ LIVE : नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा फलंदाजीचा निर्णय. पद्मसिंह पाटलांनी मला मारण्याची सुपारी दिली होती - अण्णा हजारे. 'बेस्ट'ची भाडेकपात; मुंबईच्या लाईफलाईनचे प्रवासी वाढले. रेल्वेचेही खासगीकरण ? 'या' मार्गावर धावणार देशातील पहिली खासगी रेल्वे. पुण्यातून नऊ वर्षांपासून बेपत्ता असलेला तरूण छत्तीसगडमध्ये 'माओवादी कमांडर'

महत्त्वाच्या बातम्या
author img

By

Published : Jul 9, 2019, 3:23 PM IST

१st Semifinal INDvsNZ LIVE : नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा फलंदाजीचा निर्णय

मँचेस्टर - सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना आज रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंडमध्ये हा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार असून स्पर्धेमध्ये हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्याला दुपारी ३ वाजता सुरुवात होईल. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला आजच्या सामन्यातही संघात स्थान दिलेले नाही.तर, चहलने कुलदीप यादवच्या जागी संघात पुनरागमन केले आहे. वाचा सविस्तर...

पद्मसिंह पाटलांनी मला मारण्याची सुपारी दिली होती - अण्णा हजारे

मुंबई - पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी सीबीआय न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची साक्ष घेण्यात आली आहे. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील आरोपी पद्मसिंह पाटलांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती, एवढेच नाही, तर त्यांनी मझी सुपारीही दिली होती, असे अण्णा हजारे यांनी आपल्या साक्षीत म्हटले आहे. वाचा सविस्तर...

'बेस्ट'ची भाडेकपात; मुंबईच्या लाईफलाईनचे प्रवासी वाढले

मुंबई - शहराची दुसरी लाईफलाईन समजली जाणारी 'बेस्ट' बस आर्थिक संकटात आहे. या संकटातून बेस्टला बाहेर काढण्यासाठी भाडे कपात करण्याचा सल्ला पालिकेने दिला आहे. याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाल्याने बेस्टच्या प्रवाशांची संख्या वाढल्याचे बघायला मिळत आहे. वाचा सविस्तर...

रेल्वेचेही खासगीकरण ? 'या' मार्गावर धावणार देशातील पहिली खासगी रेल्वे

लखनौ - बहुतांश सर्वच क्षेत्रात खासगीकरण होत असताना रेल्वे सेवा अजूनही संपूर्णपणे सरकारी अधिपत्याखाली आहे. मात्र लखनौ ते दिल्लीदरम्यानची तेजस एक्स्प्रेस सरकार खासगी कंपनीला चालविण्यासाठी देणार आहे. ही देशातील पहिली खासगी रेल्वे असणार आहे. वाचा सविस्तर...

पुण्यातून नऊ वर्षांपासून बेपत्ता असलेला तरूण छत्तीसगडमध्ये 'माओवादी कमांडर'

पुणे - नऊ वर्षांपूर्वी पुण्यातून बेपत्ता झालेला युवक माओवादी झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष वसंत शेलार उर्फ विश्वा, असे या तरुणाचे नाव आहे. छत्तीसगड येथील माओवादी संघटनेत तो सहभागी झाला आहे. पुण्यातील भवानी पेठेतील कासेवाडी भागात तो राहत होता. वाचा सविस्तर...

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.