ETV Bharat / state

Supriya Sule News : सुप्रिया सुळे आहेत राष्ट्रवादी अध्यक्ष पदाकरिता सर्वात प्रबळ दावेदार, जाणून घ्या राजकीय कारकीर्दीमधील महत्त्वाच्या घटना

राज्यातील राजकारणात घराणेशाहीला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्राचे कणखर नेते आणि दिल्लीला हादरा देण्याची ताकद असलेले एकमेव नेते शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदातून पायउतार होण्याची घोषणा केली आहे. शरद पवारांचा उत्तराधिकारी कोण? यावरून सध्या चर्चेचे फड रंगले आहेत. अनेकांना सुप्रिया सुळेंकडे पक्षाची कमान जावी, इच्छा आहे. सुप्रिया सुळे नेमके आहेत तरी कोण? त्यांची राजकीय कारकीर्द कशी घडली? कोणत्या महत्त्वाच्या घटना त्यांच्या राजकीय जीवनात घडल्या याबाबत टाकलेला दृष्टिक्षेप..

author img

By

Published : May 4, 2023, 8:27 AM IST

Supriya Sule News
सुप्रिया सुळे न्यूज

मुंबई - राजकारणातील चाणक्य मानले जाणारे शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी अध्यक्ष पदासाठी सर्वात प्रबळ दावेदार मानल्या जातात. त्यांची एकुलती एक कन्या सुप्रिया सुळे यांचा जन्म 3 जून 1969 रोजी झाला. शरद पवारांनी पत्नी प्रतिभा यांना मुलगी झाली असताना विशेषतः समाज पुढारीलेला नसताना, कुटुंब नियोजनाचा धाडसी निर्णय घेतला. मुंबईतील जय हिंद महाविद्यालयात सुप्रिया सुळे यांनी मायक्रो बायोलॉजी विषयात बी. एस. सी पूर्ण केली. कॅलिफॉर्निया च्या बर्कले विद्यापीठातून वॉटर पॉल्युशन या विषयातून मास्टर डिग्रीचे शिक्षण पूर्ण केले. राज्याचे विरोधी पक्षनेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांचे चुलत भाऊ आहेत. तर आमदार रोहित पवार हे आहेत.

बाळासाहेबांमुळे राजकारणात- सुप्रिया सुळे यांच्या राजकीय कारकीर्दीला बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. 2006 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर त्या निवडून गेल्या. 2009 मध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत साडेतीन लाख मतांनी विजय मिळवला. लोकसभा मतदार संघातून निवडून जाण्याचे सातत्य त्यांनी कायम राखले आहे. राजकारणात पाऊल टाकलेल्या सुप्रिया सुळे यांना सर्वाधिक पाठिंबा आई प्रतिभा, शरद पवार यांच्याप्रमाणे त्यांचे पती सदानंद सुळे यांनी दिला. सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्यापेक्षा पाचपट श्रीमंत आहेत. एडीआरच्या अहवालानुसार सुळे यांच्या संपत्ती 89 कोटींची वाढ झाली आहे. 2019 च्या प्रतिज्ञापत्रकानुसार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती, मुले यांच्याकडे सुमारे 165.4 कोटीची मालमत्ता आहे. सुळे कुटुंब यांचे सरासरी उत्पन्न 6.41 कोटी पेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे.

सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न- शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेल्या सुप्रिया सुळे सध्या राष्ट्रीय राजकारणात सक्रीय आहेत. 2011 मध्ये सुप्रिया सुळे आणि स्त्री भ्रूणहत्या विरोधात राज्यव्यापी मोहीम राबवली होती. 2012 ला काँग्रेसच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त तरुणींना राजकारणात येण्याची आवड निर्माण व्हावी, यासाठी मुंबईत राष्ट्रवादी युवती काँग्रेस नावाचे व्यासपीठ सुरू केले. या व्यासपीठाची देशभरात कौतुक करण्यात आले. सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महिलांची बाजू सरकार पुढे मांडण्याचा आणि सर्व समाजातील घटकांना न्याय देण्याचा, त्यांच्या मिसळून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करताना दिसून येतात.

शरद पवारांच्या पावलावर पाऊल- शरद पवार यांच्याप्रमाणेच राजकारण, समाजकारण याची सुप्रिया सुळे यांना पुरेपूर जाणीव आहे. मराठी हिंदी इंग्रजी या भाषांवर उत्तम प्रभुत्व आहे. शरद पवार यांच्याप्रमाणे त्यांना वाचण्याची मोठी आवड आहे. त्यात संयमी आणि अभ्यासू वृत्तीने संसदेत केलेल्या भाषणातून सोळाव्या लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राकडून सर्वाधिक प्रश्न संसदेत उपस्थित करत एक उत्कृष्ट संसदपट्टू म्हणून नावलौकिक मिळवला आहे. पवार यांच्या नावाचा कधीही त्यांनी दुरुपयोग किंवा गैरफायदा करून घेतला नाही. आजही राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठा त्यांनी स्वतःच्या हिमतीवर मिळवल्याचे दिसून येते.

मुलांची जबाबदारी निभावतात- शरद पवार यांना एक मुलगी असली तरी आई-वडिलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहतात. शरद पवार यांच्या आजारपणात सुप्रिया सुळे त्यांना भक्कम साथ देताना दिसतात. त्यांच्या खाण्यापिण्यापासून त्यांचे पथ्य पाळण्याची जबाबदारी एक मुलगी म्हणून सुप्रिया सुळे उत्तमरीत्या पार पाडतात. बाबा अत्यंत कठोर स्वभावाचे असल्याचा सर्वांचा समज आहे. परंतु ते आतून खूप हळवे आहेत, अशी ओळख करून देतात. मात्र संयम आणि भावनांवर ताबा ठेवण्याची त्यांची कृती या सर्वांना अपवाद ठरते. हाच गुण सुप्रिया सुळे जपत आहेत. पंढरपूरच्या प्रतिष्ठेच्या पोटनिवडणूक आणि शरद पवार यांची तब्येत बिघडली असताना, रुग्णालयाच्या गेट बाहेरून पंढरपुरातील मतदारांशी ऑनलाइन संवाद साधला. एखादी स्त्री वेळ पडल्यास किती मल्टी टास्किंग असू शकते, याचा प्रत्यय आणून दिला होता. महाविकास आघाडी सरकार बनवताना सुप्रिया सुळे यांचाही यात मोठा हातभार असल्याचे दिसून आले आहे.

भाजपची कोंडी- महाविकास आघाडी सरकारच्या काळात खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात केलेल्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. विरोधकांनी यावर नाराजी व्यक्त करत टीकास्त्र सोडले. सुप्रिया सुळे यांनी यावेळी त्याच भाषेत विरोधकांना फटकारले होते. भाजपने जीएसटी, आधार यूआयडी, मनेरेगा सारख्या योजनांना सत्तेत नसताना प्रखर विरोध केला होता. मात्र भाजप सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यु टर्न घेत सगळ्या योजना पुन्हा राबवल्या, असा हल्लाबोल करत सुप्रिया सुळे यांनी संसदेत पंतप्रधान मोदी यांची कोंडी केली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाही यावेळी खडसावले होते.

शिवसेना फुटली याची खंत- केंद्र सरकारकडून राज्य असतील करण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचा सासेमिरा सुरू केला. यावरूनही सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती. ईडीसारख्या यंत्रणेकडे गमतीने बोलले जाते. राज्यात झालेली सत्तापालट आणि शिवसेनेत पडलेल्या फुटींवर सुप्रिया सुळे भावनिक झाल्या होत्या. बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना अशी दुभंगेल अस वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली होती. पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारचे राजकारण कधीही घडले नव्हते, अशी खंत ही त्यांनी व्यक्त केली होती. महाराष्ट्राचे राजकारण चुकीच्या दिशेने सुरू असल्याचे देखील त्या म्हणाल्या होत्या. तसेच देशात दोन भूकंप होतील, असे सूचक विधान त्यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर अजित पवार भाजप सोबत जाऊन राज्यात मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा रंगली. मात्र, पवार यांनीच राजीनामा देण्याची घोषणा केल्याने अजित पवार यांच्यासह बंडखोरीचे निशाण फडकवलेल्या आमदारांना अप्रत्यक्षपणे चपराक बसली आहे.

बहीण भावाचे नाते- सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करावे अशी मागणी, राष्ट्रवादी काँग्रेसमधून आता जोर धरू लागली आहे. दिल्लीतील राजकारणाचा अनेक वर्षाचा अनुभव सुप्रिया सुळे यांच्या गाठीशी आहे. पक्षातल्या नेत्यांमध्ये सर्वसामान्य नेतृत्व म्हणून सुप्रिया सुळे यांच्याकडे पाहिले जाते. देशातील सर्व मंत्री, सर्व पक्ष आणि दिग्गज नेत्यांशी सुप्रिया सुळे यांचे सलोख्याचे संबंध आहेत. वागण्यात, बोलण्यात विश्वास आणि आदरपूर्वक नम्रपणा सुप्रिया सुळेंकडे आहे. परखड आणि अभ्यासू भाषण करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. विशेषतः त्या सर्व पक्षातील पदाधिकारी नेते आणि कार्यकर्त्यांना विश्वासू वाटतात. मात्र, सुप्रिया सुळे नेहमीच अजित पवार यांची बाजू घेताना पाहायला मिळतात. भाऊ बहिणीच्या नात्याबद्दल सांगताना अजित पवार यांना तुम्ही ओळखले नाही. माझ्यापेक्षा ते दहा पटीने इमोशनल आहेत, अशा शब्दांत कौतुक करतात.

हेही वाचा-Supriya Sule : राष्ट्रवादीची सुत्रे सुप्रिया सुळेंकडे? कसा आहे सुळे यांचा कॅलिफोर्निया ते खासदारकीपर्यंतचा प्रवास?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.