1) मुंबई विद्यापीठाच्या पदवी पदव्युत्तर प्रवेशास ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, या लिंकवरून भरा फॉर्म..
मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त संस्थेच्या जुलै सत्राच्या एकूण २४ अभ्यासक्रमाच्या प्रवेशास ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आयडॉलमध्ये प्रवेश घेण्यासाठी ही अंतिम मुदतवाढ आहे. आत्तापर्यंत या सत्रात ४२ हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
एमएमएस व एमसीएच्या प्रवेश परीक्षेच्या अर्जास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ: यूजीसीने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात आयडॉलच्या पदव्युत्तर मानसशास्त्र, पत्रकारिता व जनसंपर्क या तीन नव्या अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. या तिन्ही अभ्यासक्रमाचेही प्रवेश ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत होतील. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांसाठी एआयसीटीई व यूजीसीने आयडॉलला मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमएमएस) या अभ्यासक्रमासाठी ७२० जागांची मान्यता दिली आहे. हा अभ्यासक्रम आयडॉलमधून दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून सुरु आहे. हा अभ्यासक्रम एमबीए या अभ्यासक्रमाच्या समकक्ष आहे. तसेच आयडॉलमध्ये मास्टर ऑफ कॉम्प्युटर अँप्लिकेशन (एमसीए ) हा दोन वर्षाचा सुधारित अभ्यासक्रम आहे. यापूर्वी हा अभ्यासक्रम तीन वर्षाचा होता. या अभ्यासक्रमासाठी एआयसीटीई व यूजीसीने २००० जागांना मान्यता दिली आहे. याच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेच्या अर्जाची तारीखही २० ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. दूरस्थ माध्यमातून असलेल्या आयडॉलच्या एमएमएस व एमसीए या प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्याची ऑनलाईन लिंक forms.epravesh.com/MumbaiUniversity/Default.aspx ही आहे.
या अभ्यासक्रमांसाठी 31 ऑक्टोबर पर्यंत मुदत: पदवीस्तरावरील बीए, बीकॉम, बीकॉम अकाउंट्स अँन्ड फायनान्स, बीएस्सी आयटी,बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स हे अभ्यासक्रम व पदव्युत्तर स्तरावरील एमए इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, मराठी,हिंदी, इंग्रजी, एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी, एमएस्सी कॉम्पुटर सायन्स व पदव्युत्तर पदविका पीजी डीएफएम या अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू असून प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत आहे. हे प्रवेश ऑनलाईन असून, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विभागीय उपकेंद्रावर मार्गदर्शन व अध्ययन साहित्य वितरण: आयडॉलचे चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथे विभागीय केंद्रे असून याठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे. पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरू होणार आहे.
अभ्यासक्रम निहाय आजपर्यंत प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या
१) प्रथम वर्ष बीए - ४५५०
२) प्रथम वर्ष बीकॉम - ५९००
३) प्रथम वर्ष बीकॉम, अकाउंट्स अँन्ड फायनान्स (बॅफ) - ६१०
४) प्रथम वर्ष एमए - ३५७०
५) प्रथम वर्ष एमकॉम - ६८५१
2) सरळ सेवा भरती परीक्षा संगणक प्रणालीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय
मुंबई: आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सरळ सेवा भरती संदर्भातल्या परीक्षा संगणक प्रणाली द्वारे होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने याबाबतीत विचारमंथन सुरू होतं आणि आता त्याबद्दल निर्णय घेण्यात आला आहे.
तंत्रज्ञानाच्या आधारे एम.पी.एस.सी च्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोग आग्रही होता. सरळ सेवा भरती संदर्भात या परीक्षा शासन अधिकृत करेल. यामध्ये एकच पेपर त्यामध्ये असतो आणि त्यानंतर थेट मुलाखत होते व उमेदवारांना नोकरीवर घेण्यात येते. यामध्ये ग्रुप अ ब क ड हे नसणार आहेत. त्यांना बघून ही संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा घेतली जाणार असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे.
3) पदवी आणि पदवीनंतरचे सायबर सिक्युरिटी कोर्स आता करता येणार
मुंबई: सायबर जागरुकता दिवसाच्या निमित्ताने विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) पदवीपूर्व आणि पदव्युत्तर स्तरांवर सायबर सुरक्षा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमामुळे उच्च शिक्षणामधील सायबर धोका विद्यार्थ्यांना यापुढे ओळखता येईल. या अभ्यासक्रमाचा उद्देश अधिक जागरूक, प्रतिसादात्मक आणि जबाबदार डिजिटल तयार करणे आहे. नागरिक त्याद्वारे एकंदर निरोगी सायबर सुरक्षिततेसाठी प्रभावीपणे योगदान देऊ शकतात. इकोसिस्टम सायबर सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन सायबर स्वच्छतेचा प्रचार करण्यासाठी अधिकृत प्रतिष्ठित विद्यापीठाच्या सर्व प्रवाहांमध्ये अंडरग्रेजुएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट स्तरावरील सायबर सुरक्षा अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक पावले उचलावीत, असे विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव यांनी सांगितलेले आहे. खालील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुक विद्यार्थ्यांनी भेट द्यावी अधिक माहिती पहावी.
https://www.uge.ac.in/e book/Cyber security/mobile/index.html)