ETV Bharat / state

Breaking News : धावत्या रेल्वेतून पडून पीएसआय मनोज भोसले यांचा मृत्यू; पवर्ई पोलीस ठाण्यात होते कार्यरत - ईटीव्ही भारत न्यूज

Breaking News
Breaking News
author img

By

Published : Jan 7, 2023, 6:53 AM IST

Updated : Jan 7, 2023, 10:47 PM IST

22:46 January 07

धावत्या रेल्वेतून पडून पीएसआय मनोज भोसले यांचा मृत्यू; पवर्ई पोलीस ठाण्यात होते कार्यरत

ठाणे - कळवा स्थानकात उतरण्याच्या प्रयत्नात धावत्या ट्रेनमधून पडल्याने मनोज भोसले नावाच्या पवई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या मुंबई पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला. ठाणे रेल्वे पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

21:01 January 07

मुबईमधील अब्दुल रहेमान स्ट्रीट येथील दुकानांना आग

मुंबई - मस्जिद बंदर येथील सर्वाधिक गर्दीचा भाग म्हणून अब्दुल रहेमान स्ट्रीट ओळखली जाते. या रोडवरील सात ते आठ दुकानांना आग लागली आहे. हा विभाग होलसेल मार्केट म्हणून ओळखला जातो. यामुळे या विभागात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी सामान ठेवले जाते. आग लागल्याने दुकानातील सामानाचे नुकसान झाले आहे. दरम्यान अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून ४ फायर इंजिन आणि ३ जंबो टँकरद्वारे आग विझविण्याचे काम सुरू आहे. या घटनेत अद्याप कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या अग्निशमन दल तसेच आपत्कालीन व्यवस्थापन विभाकडून देण्यात आली आहे.

18:23 January 07

शूटिंगदरम्यान जखमी रोहित शेट्टीवर किरकोळ शस्त्रक्रिया

हैदराबाद : दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टीला त्याच्या आगामी वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाल्याने अलीकडेच हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रोहितच्या प्रवक्त्याने सांगितले की, काल रात्री रोहित शेट्टीला त्याच्या आगामी वेब सिरीज इंडियन पोलिस फोर्ससाठी एक सीन करत असताना बोटाला किरकोळ दुखापत झाली. या दुखापतीवर तातडीने उपचार करण्यात आले. त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली. घटनेनंतर लगेचच त्याने त्याचे शूटिंग पुन्हा सुरू केले.

17:32 January 07

मुंबईत बारवर छापा, ४४ ग्राहकांसह ६९ जणांना अटक

मुंबई - पहाटे सांताक्रूझ येथील एका बारवर छापा टाकून 69 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये 44 ग्राहक, 21 कर्मचारी आणि चार कलाकारांचा समावेश आहे. यावेळी चौदा महिलांची सुटका करण्यात आली. साडेतीन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेने तेथील आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप मिळाल्यानंतर छापा टाकला होता.

17:17 January 07

शीझान खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता सोमवारी

पालघर - तुनिषा शर्माच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला अभिनेता शीझान खान याच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयाने ९ जानेवारीपर्यंत तहकूब केली. आता सोमवारी पुढील सुनावणी होईल.

17:14 January 07

यात्रेनिमित्त खासदार नवनीत राणा यांची लाडू तुला

अमरावती - मेळघाटात धारणी तालुक्यात टिटंबा गावात पौष महिन्यानिमित्त मोती माता यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या यात्रा महोत्सवात खासदार नवनीत राणा आज सहभागी झाल्या. टिटंबा येथील आदिवासी बांधवांनी यात्रेनिमित्त खासदार नवनीत राणा यांची लाडू तुला केली.

17:02 January 07

ठाण्यात लिव्ह इन रिलेशनशिपच्या वादातून तरुणीची हत्या

ठाणे - शहापूर तालुक्यातील कसारा नजीकच्या जंगलात एका तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला असता, दोन आरोपीना २४ तासातच अटक करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपच्या वादातून त्या २२ वर्षीय तरुणीची प्रियकराने मित्राशी संगनमत करून निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. रिजवान आणि अर्शद अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

16:03 January 07

लघुशंका प्रकरण - शंकर मिश्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली - एअर इंडियाच्या प्रवाशाने नोव्हेंबरमध्ये सहप्रवाशावर लघुशंका केल्या प्रकरणी कोर्टाने आरोपीला कोठडी सुनावली आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने आरोपी शंकर मिश्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

15:16 January 07

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण; शीझान खानच्या जामीन अर्जावर 9 जानेवारीला सुनावणी

तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणी आरोपी शीझान खानच्या जामीन अर्जावर वसई कोर्टाने स्थगिती दिली आहे. तसेच पुढील सुनावणी 9 जानेवारीला होणार आहे.

13:50 January 07

घे भरारी मोहिमेअंतर्गत मनसेची कुंभार वाडा दादर येथे जाहीर सभा

मुंबई - मनसेच्या 'घे भरारी' मोहिमेअंतर्गत नितीन सरदेसाई, प्रकाश महाजन, संदीप देशपांडे हे नेते आज सायंकाळी ६ वाजता केशवराव दाते मैदान, पोर्तुगीज चर्चच्या मागे, कुंभार वाडा दादर येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.

13:45 January 07

ऋषभ पंतच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबई - क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या गुडघ्यावर काल मुंबईतील खासगी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तो वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. तसेच त्याची प्रकृती वेगाे सुधारत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

13:40 January 07

लघुशंका प्रकरणी चार केबिन क्रू आणि एका पायलटला नोटीस

मुंबई - विमानात महिलेच्या संदर्भात दुष्कृत केल्याप्रकरणी एअर इंडियाने चार केबिन क्रू आणि एका पायलटला कारणे दाखवा नोटीस दिली आहे. डिजीसीएमार्फत अंतर्गत समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

12:50 January 07

शिवसेना महावृक्ष, शिंदे गटात कचरा - संजय राऊत

मुंबई - शिवसेना हा महावृक्ष आहे, तर शिंदे गटात कचरा गेल्याचे खा. संजय राऊत यानी सांगितले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

12:44 January 07

शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पत्नीची हत्या

यवतमाळ - शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीची हत्या केली आहे. सोयाबीनच्या भुश्यामध्ये तिचा मृतदेह नंतर या पतीने जाळून टाकला.

12:41 January 07

बीडच्या धामणगावमध्ये मेजर अजिनाथ काळे यांना अखेरचा निरोप

बीड - धामणगाव येथील CRPF मधील 38 वर्षीय मेजर असणाऱ्या सैन्यातील अधिकाऱ्याचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. अजिनाथ काळे असे त्यांचे नाव आहे. ते छत्तीसगड येथे कर्तव्यावर होते. कर्तव्य बजावत असताना त्यांना डेंग्यूची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होता. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालावली.

12:20 January 07

प्रताप सरनाईक यांनी स्थानिक नागरिकांना घेऊन बंद रस्ता केला सुरू

ठाणे - प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांच्या समस्येबाबत आंदोलन करण्यात येत आहे. ठाणे महापालिकेवर प्रशासकीय राजवट असून प्रशासनाची हुकूमशाही असल्याचा सरनाईक यांचा आरोप आहे. प्रताप सरनाईक यांनी स्थानिक नागरिकांना घेऊन बंद केलेला रस्ता सुरू केला आहे.

12:09 January 07

मुंबईत 8 जानेवारी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत मेट्रो सेवा बंद राहणार

मुंबई - एकात्मिक सिग्नल यंत्रणा दुरुस्ती तसेच चाचणीसाठी मेट्रो सेवा बंद राहणार आहे. उद्या दि. 8 जानेवारीला सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात मेट्रो मार्ग २अ आणि ७ च्या डहाणूकरवाडी ते आरे दरम्यान पहिल्या टप्प्यात सुरू असलेली मेट्रो सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध नसेल.

12:06 January 07

राहुल गांधींना राम मंदिराबद्दल काहीच माहीत नाही - फडणवीस

मुंबई - राहुल गांधींना अचानक जुन्या गोष्टी आठवू लागतात. ते असा प्रश्न विचारत आहेत, जो त्यांनी 10 वर्षांपूर्वी विचारायला हवे होते. मंदिराचे बांधकाम जोमात सुरू आहे हे कदाचित त्यांना माहीत नसेल. मंदिर पूर्ण झाल्यावर त्यांनाही दर्शनासाठी आमंत्रित केले जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

11:52 January 07

ट्रॅव्हल व एसटीवर दगडफेक, प्रवाशांना लुटीचा प्रयत्न

औरंगाबाद - गंगापूर वैजापूर मार्गावर चोरट्याकडून ट्रॅव्हल व एसटीवर दगडफेक करण्यात आली. तसेच प्रवाशांना लुटीचा प्रयत्न करण्यात आला.

11:44 January 07

मिरजमध्ये अतिक्रमणाला विरोधच केला, पडळकर यांचा दावा

कोल्हापूर - मिरजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मार्गाचे काम सुरू आहे. त्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे काम पालिकेच्या वतीने सुरू आहे. त्या ठिकाणी भावाच्या नावावर जो प्लॉट आहे त्यावर अतिक्रमण झाले होते ते काढून घेतले, अशी माहिती गोपिचंद पडळकर यांनी दिली आहे. आम्ही महानगरपालिकेला मदत केली आहे, असा दावा त्यांनी केला आहे. मात्र पोलिसांनी कशा पद्धतीने गुन्हे दाखल केले हे सांगलीत गेल्यावर पाहिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

10:10 January 07

Breaking News : ट्रकवर दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू

अमरावती - एका नादुरस्त ट्रकवर दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना काल रात्री उशिरा अमरावती -परतवाडा मार्गावर वायगावजवल घडली आहे.

06:42 January 07

Breaking News : अमेरिकेकडून युक्रेनसह युरोपियन मित्र राष्ट्रांसाठी 3.75 अब्जपेक्षा जास्त किमतीची लष्करी मदत जाहीर

दिल्ली - अमेरिकेकडून युक्रेनसह युरोपियन मित्र राष्ट्रांसाठी 3.75 अब्जपेक्षा जास्त किमतीची लष्करी मदत जाहीर केली आहे.

Last Updated : Jan 7, 2023, 10:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.