ETV Bharat / state

Breaking News : महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचे उदयनराजेंकडून अभिनंदन, विजेता, उपविजेत्यास दिल्या शुभेच्छा - भारतातील महत्वाच्या घडामोली़

Breaking  News
Breaking News
author img

By

Published : Jan 14, 2023, 7:06 AM IST

Updated : Jan 14, 2023, 10:36 PM IST

22:31 January 14

महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचे उदयनराजेंकडून अभिनंदन, विजेता, उपविजेत्यास दिल्या शुभेच्छा

सातारा - पुण्याचा पैलवान शिवराज राक्षे याने यंदाची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली आहे. हा किताब जिंकल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी राक्षे याचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षे आणि उपविजेता महेंद्र गायकवाड या दोघांचेही अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

20:59 January 14

अपघातात भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा पुतण्या ठार

माजलगाव (बीड): येथील भाजपाचे नेते व छत्रपती कारखान्याचे चेअरमन मोहनराव जगताप यांचे पुतणे विश्वजीत जगताप हे अन्य एका मित्रा समवेत औरंगाबाद कडुन माजलगावकडे चारचाकी गाडीने जात होते. याचदरम्यान गेवराई नजीक विश्वजीत जगताप यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्यांची क्रेटा गाडी समोर असलेल्या आयसर टेम्पोवर धडकल्याने भिषण अपघात झाला. याच अपघातात विश्वजीत जगताप यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

19:11 January 14

युद्ध भडकणार.. युक्रेनवर रशियाने केला मिसाईल हल्ला.. ब्रिटन युक्रेनला देणार रणगाडे

लंडन: मॉस्कोने युक्रेनची राजधानी आणि इतर शहरांना लक्ष्य करून नूतनीकरण केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांदरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी शनिवारी युक्रेनला रणगाडे आणि तोफखाना यंत्रणा पुरविण्याचे आश्वासन दिले.

सुनकच्या डाउनिंग स्ट्रीट कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी शनिवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी बोलल्यानंतर चॅलेंजर 2 रणगाडे आणि इतर तोफखाना यंत्रणा प्रदान करण्याचे वचन दिले.

18:26 January 14

महेंद्र गायकवाड व शिवराज राक्षे यांच्यात होणार महाराष्ट्र केसरी साठी झुंज.. दोघेही काका पवारांच्या तालीमीचे पैलवान..

पुणे:- 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची फायनल ही काका पवार यांच्या तलीमीच्या पैलवनांमध्ये थोड्याच वेळात होणार आहे. या स्पर्धेत सेमीफायनल हर्षवर्धन सदगिर आणि शिवराज राक्षे यांच्यात झाली यात 8 - 1 ने शिवराज राक्षे हा विजयी झालं आहे तर दुसरी सेमी फायनल स्पर्धा ही सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात रोमहर्षक झाली आहे.यात महेंद्र गायकवाड याने 6 - 4 ने जिंकली आहे. यातील विशेष बाब म्हणजे यंदाच्या या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत हर्षवर्धन सदगिर,शिवराज राक्षे,महेंद्र गायकवाड हे काका पवार यांच्या तालमीचे असून फायनल मध्ये दाखल झालेले दोन्ही पैलवान हे महेंद्र गायकवाड व शिवराज राक्षे हे देखील काका पवार यांच्या तालीमीचे पैलवान आहे.

मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने ६५ व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशनाचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. आज स्पर्धेत माती विभागातून महेंद्र गायकवाडनं सिकंदर शेखवर ६-४ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर व शिवराज राक्षे या दोन मित्रांची लढत झाली.

सुरुवातीपासून शिवराज राक्षे यानं सामन्यावर पकड मिळवली आहे. हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे हे दोघेही काकासाहेब पवार आंतराष्ट्रीय कुस्ती संकुल या एकाच तालमीतील पैलवान आहोत. हर्षवर्धन सदगीरवर शिवराज राक्षेनं एकतर्फी विजय मिळवला. शिवराज राक्षेनं ८-१ असा हर्षवर्धन सदगीरवर विजय मिळवला.

अंतिम फेरीत शिवराज राक्षे विरुद्ध महेंद्र गायकवाड लढत होणार आहे.

15:38 January 14

Breaking News : गोकुळ शिरगाव येथे पेट्रोलियम कंपनीला भीषण आग

सातारा : गोकुळ शिरगाव पेट्रोलियम कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशामन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

12:20 January 14

Breaking News : नाशिक पदवीधर मतदार संघात झालेल्या गडबडीनंतर ठाकरे गटाची मातोश्रीवर बैठक

मुंबई : नाशिक पदवीधर मतदार संघात झालेल्या गडबडीनंतर ठाकरे गटाने मातोश्रीवर बैठक आयोजीत केली आहे. पदवीधर निवडणुकीत नाशिक विभागातून काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांना उमेदवारी मिळालेली असाताना त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हे सगळे अचानक झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाने सावधगिरीची भूमिका घेत मातोश्रीवर बैठक बोलावली आहे.

11:52 January 14

Breaking News : महाबळेश्वरमध्ये ४० मजुरांच्या टेम्पोला अपघात, दोन लहान मुलांसह ११ मजूर जखमी

सातारा : महाबळेश्वर तालुक्यात मजुरांच्या टेम्पोला भीषण अपघात झाला आहे. बुलढाणा व अकोला भागातून मजूर घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा मुकदेव गावानजीक तीव्र उतारावर अपघात होऊन दोन लहान मुलांसह ११ मजूर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. टेम्पोमध्ये एकूण ४० लोक होते. जखमीपैकी काही मजुरांना तळदेव आणि महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन गंभीर जखमी मुलांना उपचारासाठी सातारला पाठविण्यात आले आहे. रस्ते कामासाठी हे मजूर महाबळेश्वर येथे आले होते. सह्याद्री ट्रेकर्सचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी जखमींना मदत केली.

10:52 January 14

Breaking News : अज्ञात व्यक्तीकडून पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी

पुणे : पुणे शहरात आगामी होत असलेली अंतराष्ट्रीय जी-२० परीषद, त्याच प्रमाणे प्रजासस्ताक दिना निमीत्त कोणताही अनुचीत प्रकार घडू नये याकरीता पुणे शहर पोलिसांकडून शहरभर कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. अशातच पुणे रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडली होती. याता पुन्हा एकदा एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून ही धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

10:46 January 14

Breaking News : भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून वर्धा पोलिसांत तक्रार

वर्धा : भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने वर्धा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

06:52 January 14

Breaking News : महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचे उदयनराजेंकडून अभिनंदन, विजेता, उपविजेत्यास दिल्या शुभेच्छा

ओडिसा : येथील कटक शहराजवळील घनदाट जंगलात महिला क्रिकेटर राजश्री स्वेनचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ती 11 जानेवारीपासून बेपत्ता होती. तिच्या प्रशिक्षकाने याबाबत 12 जानेवारी रोजी तक्रार दाखल केली होती अशी माहिती पोलीस उपायुक्त पिनाक मिश्रा यांनी दिली आहे.

Last Updated : Jan 14, 2023, 10:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.