मुंबई : मुंबईतील पवई जलाशयाच्या पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवर गळती दुरुस्तीचे तसेच वेरावली जलाशय १ व २ साठी नवीन पाईपलाईन जोडणीसाठी २९ व ३० नोव्हेंबर रोजी दुरुस्ती काम केले जाणार (Impact on water supply on November 29 and 30) आहे. या कालावधीत मुंबईत काही विभागात पाणी पुरवठा बंद राहणार (Impact on water supply in Mumbai) आहे. तर काही विभागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. नागरिकांनी यावेळी पाण्याचा साठा करावा तसेच पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेने केले आहे.
या विभागात पाणी बंद : बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पवई जलाशयाच्या १२०० मिलीमीटर आगम वाहिनीवरील ३०० मिलीमीटर बायपास जल वाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम, तसेच वेरावली जलाशय १ व २ साठी १८०० मिलीमीटर व्यासाची नवीन वाहिनीच्या (इनलेट) जोडणीसाठी मंगळवार, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवार, दिनांक ३० नोव्हेंबर सकाळी ८.३० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत म्हणजेच मंगळवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत के पूर्व, एच पूर्व, एच पश्चिम, पी दक्षिण, एस, एल आणि एन या विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा खंडित (Water Supply In Mumbai) राहील.
कमी दाबाने पाणी पुरवठा : तसेच के पश्चिम विभागातील परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित (बंद) राहील. के पूर्व, जी उत्तर, पी दक्षिण विभागातील काही परिसरात दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. एच पश्चिम विभागातील काही परिसरात दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ रोजी पाणीपुरवठा कमी कालावधीसाठी होईल. काही परिसरात दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ पाणीपुरवठा कमी दाबाने होणार (water supply in Mumbai on November 29 and 30) आहे.
पाणी जपून वापरा : संबंधीत परिसरातील नागरिकांनी नमूद कालावधीत पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले (Water Supply) आहे.