ETV Bharat / state

'निसर्ग'ने घेतले रौद्ररुप, हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ काय म्हणाल्या वाचा... - IMD Mumbai on cyclone

निसर्ग चक्रीवादळ हे सध्या मुंबईपासून १९० तर अलिबागपासून १४० किलोमीटर अंतरावरावर असून, ते रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या दिशेने येत आहे. रौद्ररुप घेतलेले हे चक्रीवादळ दुपारी १ ते ३ वाजण्याच्या दरम्यान अलिबागच्या दक्षिण दिशेला धडकणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भूते यांनी ही माहिती दिली.

IMD Mumbai Scientist Shubhangi Bhute said nisarga Cyclone is likely cross south of Alibag between 1pm to 3pm
'निसर्ग'ने घेतले रौद्ररुप, हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ काय म्हणाल्या वाचा...
author img

By

Published : Jun 3, 2020, 11:11 AM IST

मुंबई - निसर्ग चक्रीवादळ हे सध्या मुंबईपासून १९० तर अलिबागपासून १४० किलोमीटर अंतरावरावर असून, ते रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या दिशेने येत आहे. रौद्ररुप घेतलेले हे चक्रीवादळ दुपारी १ ते ३ वाजण्याच्या दरम्यान अलिबागच्या दक्षिण दिशेला धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भूते यांनी दिली. दरम्यान, यावेळी वाऱ्यांचा वेग १०० ते ११० असण्याची शक्यता आहे. तसेच मुसळधार पाऊस पडणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.

निसर्ग चक्रीवादळाची माहिती देताना हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भूते....

सध्या अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे निसर्ग हे चक्रीवादळ कोकण किनापट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे मुंबई, ठाणेसह कोकण किनारपट्टीवर एनडीआरएफच्या २० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण किनारपट्टीवर राहणाऱ्या सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. सर्व मच्छीमार सुखरुप आपापल्या घरी परतले आहेत. लोकांनी दोन दिवस घरातून बाहेर पडू नये. चक्रीवादळ असल्याने उघड्यावर कोणतेही महत्त्वाचे साहित्य ठेवू नये, घराबाहेर कोणीच पडू नका, असे आवाहन ठाकरे यांनी केले होते.

या वादळामुळे मुंबईत पालिका, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, नौदल आदी विभाग समुद्रकिनारी तैनात आहेत. मुंबईत समुद्र किनारी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, या वादळाची गती कमी झाल्याने हे वादळ आता दुपारी १ ते ३ वाजण्याच्या दरम्यान मुंबईत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. समुद्राच्या भरतीची वेळ सकाळी दहाची होती. यावेळी हे वादळ आले असते तर मुंबईला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला असता. आता वादळ दुपारी येणार असल्याने ही धोक्याची तीव्रता बऱ्याच अंशी कमी झाली आहे.

हेही वाचा - 'निसर्ग' चक्रीवादळाची मुंबईकडे कूच, प्रशासनाचा रेड अलर्ट

हेही वाचा - निसर्ग चक्रीवादळ : मुंबईसह कोकणात एनडीआरएफच्या 20 तुकड्या तैनात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.