ETV Bharat / state

कोरोनाबाबत नागरिक बेफिकीर, सरकार उदासीन; परिस्थिती रोद्र रुप धारण करणार - आयएमए

author img

By

Published : Sep 7, 2020, 7:57 PM IST

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा वाढता आकडा पाहता राज्यात समूह संसर्गाचा कहर सुरू झाल्याचा दावा इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केला आहे. तर, सरकार मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नसून नागरिकांमध्येही बेफिकीर वाढली आहे. तेव्हा आता कोरोना रौद्ररुप धारण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांची प्रतिक्रिया

मुंबई : मार्चपासून मुंबईत-पुण्यात कोरोनाचा कहर सुरू होता. पण, जुलै-ऑगस्टमध्ये येथील परिस्थिती सुधारताना दिसत होती. रुग्णसंख्येचा वाढता आलेख खाली येत होता. मात्र, सप्टेंबरमध्ये अचानक कोरोनाने हाहाकार उडवला आहे. 10 ते 15 हजारांच्या घरात असणारा रुग्णांचा आकडा सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात 16-17 हजार पार करत थेट 23 हजारांच्या पल्याड गेला आहे. हा आकडा पोटात गोळा आणणारा आहेच. पण त्याचवेळी जी मुंबई कोरोना नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने एक-एक पाऊल पुढे जात होती, ती मुंबई पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

अनलॉकमध्ये अगदी सर्वच वयोगटातील नागरिकांनी सर्व नियम पाळत आपले दैनंदिन व्यवहार सुरू करणे अपेक्षित होते. पण, शहरी भाग असो की ग्रामीण भाग, अशिक्षित असो की सुशिक्षित, वृद्ध असो की तरुण कुणीही, कुठेही कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. तर या नियमांचे पालन होते का याकडे सरकारचे लक्षच नाही. त्यामुळे आता रुग्णांची संख्या 10 ते 15 हजारावरून थेट 23 हजारापर्यंत जात असल्याचे म्हणत इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आता एखाद्या व्यक्तीला कुणाकडून कधी आणि कसा संसर्ग झाला आहे, हेच समजत नसून एकाचवेळेला मोठ्या संख्येने नागरिक पॉझिटिव्ह येत आहेत. याचा अर्थ असा की, आता राज्यात समूह संसर्गाचा कहर सुरू झाला आहे. तेव्हा हा समूह संसर्गाचा कहर रोखण्यासाठी राज्य सरकारकडून व्यापक स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत, पण ते होताना दिसत नाहीत असा, आरोप डॉ. भोंडवे यांनी केला आहे. मुंबईत 800, 1 हजार, 1 हजार 200 ऐवजी आता 1 हजार 900 पर्यंत रुग्णांचा आकडा जात आहे. एकूणच मुंबई आणि राज्याचा हा वाढता आकडा पाहता राज्यात समूह संसर्गाचा कहर सुरू झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर, सरकार मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नसून नागरिकांमध्येही बेफिकीर वाढली आहे. तेव्हा आता कोरोना रौद्ररुप धारण करणार असल्याचा इशाराही भोंडवे यांनी दिला आहे.

टेस्टिंग वाढवण्याची गरज

कोरोनाची साखळी तोडायची असेल तर ट्रेसिंग आणि टेस्टिंगवर भर द्यायला हवा पण, आज या दोन्ही बाबी होताना दिसत नाहीत. आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील केवळ 2 ते 3 जणांनाच ट्रेस करत त्यांची टेस्ट केली जाते. जेव्हा की त्याच्या थेट संपर्कात आलेल्या 20 जणांची तरी टेस्ट व्हायला हवी. मात्र, हे होत नसल्याने रुग्णांच्या संपर्कातील इतर लक्षणे नसलेले संसर्ग पसरत जातात असे म्हणत त्यांनी यावरही नाराजी व्यक्त केली आहे. तर, टेस्टची संख्या आजही म्हणावी तितकी वाढवण्यात आली नसून परिणामी संसर्ग वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

आजार अंगावर काढणं पडतंय महागात

सर्दी, खोकला, डोकेदुखी आणि थकवा अशी कोरोनाची लक्षणे आहेत. अशावेळी अनेकजण आता या लक्षणांना गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. ताप, सर्दीच आहे ना, म्हणत आजही नागरिक मेडिकलमधून औषध आणून त्याचे सेवन करत आहेत. तर सर्दी, तापाची औषधं डॉक्टरच्या प्रिस्क्रिपशनशिवाय विकली जात आहेत. याकडेही संबंधित यंत्रणाचे लक्ष नाही. एकूणच 'नागरिक बेफिकीर आणि सरकार उदासीन' असे चित्र असून हे चित्र घातक ठरू शकते असा इशारा डॉ. भोंडवे यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.