मुंबई - मलबार हिल परिसरात शनिवारी रात्री 70 हजार रूपयांचा अवैद्य दारू साठा जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी भारत जयराम वने, (वय 33) या आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सी.बी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचे मुंबई शहर निवडणूक विभागाकडून कळविण्यात आले आहे.
हेही वाचा - 'हिंमत असेल तर जाहीरनाम्यात कलम 370 परत लागू करण्याचा उल्लेख करा'
मुंबई शहर जिल्हा, राज्य उत्पादन शुल्क निरिक्षक गजानन राजूरकर, पोलीस अधिकारी विनय शिर्के, अविनाश धरत, जगदिश देशमुख, संताजी लाड यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला असता मलबार हिल परिसरात राहणारा भारत जयराम वने यांच्याकडे विदेशी मद्य, वाईन, बिअरचा साठा आढळून आला. त्याची किंमत अंदाजे 70 हजार रुपये आहे. या आरोपी विरूध्द मुंबई दारू बंदी कायदा 1949 चे कलम 65 (ई), 108 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आल्याचे मुंबई शहर निवडणूक विभागाकडून कळविण्यात आले आहे.
हेही वाचा - 'मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केल्यास भारी पडेल'