ETV Bharat / state

बेकायदा होर्डिंगबाजीमुळे मुंबईचं विद्रुपीकरण; राजकीय पक्ष आघाडीवर - hording

पालिकेने वर्षभरात बॅनरवर केलेल्या कारवाईची आकडेवारी पाहता शहर विद्रूप करण्यात राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

बेकायदा होर्डिंगबाजीमुळे मुंबईचं विद्रुपीकरण
author img

By

Published : Feb 18, 2019, 8:49 PM IST

मुंबई - शहर विद्रूप करण्यात राजकीय पक्ष आघाडीवर आहेत. पालिकेने वर्षभरात बॅनरवर केलेल्या कारवाईची आकडेवारी पाहता शहर विद्रूप करण्यात राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. वर्षभरात ११ हजार २०२ होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ६ हजार ५३५ होर्डिंग्ज हे राजकीय पक्षांचे असल्याचे समोर आले आहे.

शहरात मोकळ्या जागा व्यापल्या असताना त्यात आता विविध प्रकारची होर्डिंग लावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मुंबईत अनधिकृतपणे होर्डिंग लावण्यावर निर्बंध आहेत. राजकीय पुढाऱ्यांचे वाढदिवस, सभा, मोर्चे, आदी कार्यक्रमांच्या जाहिरातींचा या अनधिकृत होर्डिंग्जमध्ये भर पडली आहे. यातील बहुतांशी होर्डिंग्ज अनधिकृत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे नोंद आहेत. या तक्रारीनंतर पालिकेकडून असे होर्डिंग्ज काढले जातात, तरीही नियम धाब्यावर बसवून भले मोठे होर्डिंग लटकवून शहर विद्रूप केले जाते. विशेष म्हणजे कारवाई करण्यात येणाऱ्या होर्डिंग्जमध्ये राजकीय पुढाऱ्यांचीच सर्वाधिक होर्डिंग आहेत. पालिकेने जानेवारी २०१८ ते २०१९ या वर्षभरातील कारवाईचा अहवाल नुकताच आयुक्तांना सादर केला.

बेकायदा होर्डिंगबाजीमुळे मुंबईचं विद्रुपीकरण
undefined

त्यानुसार मुंबईतून ११ हजार २०२ होर्डिंग काढण्यात आले. यात ६५२५ राजकीय, १८७५ व्यावसायिक तर २७९२ हे इतर बॅनर होते. महापालिकेने याबाबत २२९५ जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार तर ६४० जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. जानेवारी २०१९ या एका महिन्यात केलेल्या कारवाईत १२५५ बॅनरपैकी ६३२ हे राजकीय पक्ष आणि नेत्यांचे असल्याचे समोर आले आहे. यामध्ये दक्षिण विभागात सर्वाधिक २७६ होर्डिंग काढली असून १२० होर्डिंग्ज ही राजकीत पक्ष आणि नेत्यांची होती.

त्या खालोखाल पूर्व विभागात १३८ पैकी ४८ होर्डिंग्ज पक्षांनी लावली होती. बेकायदेशीर होर्डिंग्ज लावण्यावर बंदी असताना राजकीय पक्ष आणि पुढारी बिनदिक्कतपणे होर्डिंग्जबाजी करत आहेत. त्यामुळे नियम धाब्यावर बसवणाऱ्यामध्ये त्यांचा पहिला क्रमांक लागत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

दरम्यान होर्डिंग्जबाबत प्रशासनाचे धोरण आहे. त्यानुसार होर्डिंग लावण्यास परवानगी दिली जाते. मात्र, बेकायदा होर्डिंग लावलेले आढळून आल्यास कारवाई करण्यात येते. सातत्याने लागणाऱ्या या होर्डिंग्जवर कारवाई करण्यास महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अडचणी येतात. बहुतांशवेळा दबाव टाकला जातो. राजकीय नेत्यांच्या या वृत्तीमुळे महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

undefined

जानेवारी २०१९ मध्ये काढलेले होर्डिंग्ज - अ विभाग ८८, बी विभाग ०४, सी विभाग ०८, डी विभाग २०, ई विभाग ११, एफ -साऊथ विभाग २३, एफ - नॉर्थ विभाग ४४, जी- साऊथ विभाग ७२, जी -नॉर्थ विभाग ३६, एच - पूर्व विभाग २३, एच- वेस्ट विभाग ०४, के- पूर्व विभाग १३८, के- पश्चिम विभाग ४२, एल विभाग ३४, एम - पश्चिम विभाग १५, एन विभाग ६७, पी - दक्षिण विभाग ४२, पी - उत्तर विभाग ०८, आर दक्षिण विभाग १७६, आर मध्य विभाग १२२, आर उत्तर विभाग १७, एस विभाग ०२, टी विभाग १६९.

Intro:मुंबई -
राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांकडून बेकायदा होर्डिंग आणि बॅनर लावून
शहर विद्रूप करण्यावर मुंबईतील राजकीय पक्ष आघाडीवर आहेत. पालिकेने वर्षभरात बॅनरवर केलेल्या कारवाईची आकडेवारी पाहता शहर विद्रुप करण्यात राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. वर्षभरात ११ हजार २०२ होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली त्यापैकी ६ हजार ५३५ होर्डिंग्ज हे राजकीय पक्षांचे असल्याचे समोर आले आहे. Body:मुंबईतील मोकळ्या जागा व्यापल्या असताना त्यात विविध प्रकारची होर्डिंग लावणाऱ्यांची संख्या वाढते आहे. मुंबईत अनधिकृतपणे होर्डिंग्ज लावण्यावर निर्बंध आहेत. असे असतानाही जागोजागी भले मोठे होर्डिंग्ज लावून मोकळ्या जागा व्यापल्या जात आहेत. राजकिय पुढाऱ्यांचे वाढदिवस, सभा, मोर्चे, आदी कार्यक्रमांच्या जाहिरातींचे अनधिकृत होर्डिंग्जची भर पडली आहे. यातील बहुतांशी होर्डिंग्ज अनधिकृत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे नोंद आहेत. या तक्रारीनंतर पालिकेकडून असे होर्डिंग्ज काढले जातात. तरीही नियम धाब्यावर बसवून भले मोठे होर्डिंग लटकवून शहर विद्रुप केले जाते. विशेष म्हणजे कारवाई करण्यात येणाऱ्या होर्डिंग्जमध्ये राजकीय पुढाऱ्यांचीच सर्वाधिक होर्डिंग आहेत. पालिकेने जानेवारी २०१८ ते २०१९ या वर्षभरातील कारवाईच्या अहवाल नुकताच आयुक्तांना सादर केला. यानुसार मुंबईतून ११ हजार २०२ होर्डिंग काढण्यात आले. यात ६५२५ राजकीय, १८७५ व्यावसायिक तर २७९२ हे इतर बॅनर होते. महापालिकेने याबाबत २२९५ जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार तर ६४० जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तर जानेवारी २०१९ या एका महिन्यात केलेल्या कारवाईत १२५५ बॅनरपैकी ६३२ हे राजकीय पक्ष व नेत्यांचे असल्याचे समोर आले आहे. यामध्ये आर दक्षिण विभागात सर्वाधिक २७६ होर्डिंग काढली असून १२० होर्डिंग्ज ही राजकीत पक्ष व नेत्यांची होती. त्या खालोखाल के पूर्व विभागात १३८ पैकी ४८ होर्डिंग्ज पक्षांनी होर्डिंग लावली होती. बेकायदेशीर होर्डिंग्ज लावण्यावर बंदी असताना राजकीय पक्ष व पुढारी बिनदिक्कतपणे होर्डिंग्जबाजी करत आहेत. त्यामुळे नियम धाब्यावर बसविणाऱ्यामध्ये त्यांचा पहिला क्रमांक लागत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. दरम्यान होर्डिंग्जबाबत प्रशासनाचे धोरण आहे. त्यानुसार होर्डिंग लावण्यास परवानगी दिली जाते. मात्र बेकायदा होर्डिंग लावलेले आढळून आल्यास कारवाई करण्यात येते. तरीही राजकिय पक्ष किंवा नेत्यांकडून विनापरवाना होर्डिंग्ज लावण्यात येतात. सातत्याने लागणाऱ्या या होर्डिंग्जवर कारवाई करण्यास महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अडचणी येतात. बहुतांशवेळा दबाव टाकला जातो. राजकिय नेत्यांच्या यावृत्तीमुळे महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

जानेवारी २०१९ मध्ये काढलेले होर्डिंग्ज   
अे विभाग ८८, बी विभाग ०४, सी विभाग ०८, डी विभाग २०, ई विभाग ११, एफ -साऊथ विभाग २३, एफ - नॉर्थ विभाग ४४, जी- साऊथ विभाग ७२, जी -नॉर्थ विभाग ३६, एच - पूर्व विभाग २३, एच- वेस्ट विभाग ०४, के- पूर्व विभाग १३८, के- पश्चिम विभाग ४२, एल विभाग ३४,
एम - पश्चिम विभाग १५, एन विभाग ६७, पी - दक्षिण विभाग ४२, पी - उत्तर विभाग ०८, आर दक्षिण विभाग १७६, आर मध्य विभाग १२२, आर उत्तर विभाग १७, एस विभाग ०२, टी विभाग १६९. Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.