मुंबई : आजच्या काळात जवळपास प्रत्येकाचे बँक खाते आहे. कुणाचे वैयक्तिक बचत खाते, कुणाचे पगार खाते, कुणाचे जन धन योजनेचे बँक खाते. प्रत्येक वेळी बँकेत जाऊन पैसे काढणे ( money withdrawing ) अवघड असते. म्हणून एटीएमचा पर्याय काढण्यात आला. त्यामुळे खातेदार पैसे काढताना बँकांमध्ये लांब रांगा लावत नाहीत. पण जर तुम्ही एटीएममधून पैसे काढत असाल आणि अचानक लाईट गेली तर एटीएममधून ( light goes while withdrawing money ) पैसे कसे काढावे हे जाणून घ्या.
एटीएम वापर : आजच्या काळात लोक त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी ( money withdrawing from bank account ) एटीएमचा वापर करतात यात शंका नाही. डेबिट कार्डद्वारे एटीएम मशीनमधून पैसे काढता येतात. परंतू काही वेळा लोकांना काही समस्यांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांचे पैसे अडकतात. यात पीन योग्य नसणे, कार्डमध्ये पैशांची लिमीट कमी असणे यांचा समावेश आहे.
चिंतेची बाब : वास्तविक, ज्या एटीएममध्ये लाईटचा बॅकअप घेण्याचा पर्याय नाही. त्या एटीएममध्ये अश्या समस्या नेहमी होतात. लाईट गेल्यावर ते अचानक बंद होतात. मात्र, आता असे एटीएम क्वचितच पाहायला मिळतात ज्यात लाईट जाते आणि ते बंद होतात. पैसे काढताना लाईटचा बॅकअप घेतला नाही आणि लाईट गेली तर ग्राहकांच्या खात्यातून पैसे कापले जातात. पण ते एटीएममधून बाहेर येत नाहीत. अशा प्रकारे लोक अस्वस्थ होतात.
पैसे कापले तर काय होईल? : जर तुमच्यासोबतही असे घडले असेल, तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या कस्टमर केअरला या प्रकरणाची माहिती देणे ( Informe Customer Care ) आवश्यक आहे. यानंतर, सेट केलेल्या नियमांनुसार, कापलेले पैसे 24 तासांच्या आत तुमच्या बँक खात्यात परत केले ( money refund in your account ) जातात. बऱ्याच प्रकरणांमध्ये, अशा घटनांमधले पैसे अल्पावधीत ग्राहकांच्या खात्यात परत केले जातात.
कस्टमर केअरचीही मदत घेऊ शकता : तुमच्या खात्यातून पैसे कापले गेल्यास एका प्रकारची फसवणूक होते. ही बाबत तात्काळ बँकेच्या निदर्शनास आणणे गरजेचे आहे. इतर प्रकरणांमध्ये देखील तुम्ही कस्टमर केअरची मदत घेऊ शकता आणि येथून तुम्हाला योग्य मदत दिली जाते.