मुंबई : आयसीआयसीआय बँक घोटाळा प्रकरणात (ICICI Bank Scam) सीबीआयने अटक केलेल्या आयसीआयसी बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर (Chanda Kochhar), दीपक कोचर (Deepak Kochhar) आणि वेणूगोपाल धूत यांना आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने 3 दिवसाची सीबीआय कोठडी दिली आहे. चंदा कोचर, दीपक कोचर यांना सीबीआयने दिल्लीतून शुक्रवार रात्री अटक केल्यानंतर, आज या प्रकरणात तिसरी अटक वेणूगोपाल धूत (Venugopal Dhoot) यांना करण्यात आली आहे. धूत यांना आज न्यायालयात हजर केल्यानंतर पुन्हा तीन दिवसाच्या सीबीआय कोठडीत त्यांची रवानगी (remanded to CBI custody for 3 days) करण्यात आली आहे. CBI Custody In ICICI Bank Scam
मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली अटक : 2009 मध्ये 300 कोटी रुपयांच्या व्हिडीओकॉन कर्ज घोटाळा प्रकरणात आयसीआयसी बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर व दीपक कोचर या दोघांना अटक झाली होती. मात्र गेल्यावर्षी त्यांची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर त्यांना मुंबई सीबीआय कोर्टात हजर करण्यात आले. याआधी दोघांनाही ईडीने अटक केली होती. ईडीकडूनही याप्रकरणी चौकशी सुरू असून, सप्टेंबर 2020 मध्ये दीपक कोचर यांना अटक करण्यात आली होती. मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली ही अटक झाली होती .
पदाचा गैरवापर केल्याचा आरोप : व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणात आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना मोठा हादरा बसला असून; सीबीआयने चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली आहे. चंदा कोचर यांनी पती दीपक कोचर यांना फायदा मिळवून देण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.
2 हजार 810 कोटी रुपयांचे कर्ज थकीत : चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असताना बँकेने व्हिडीओकॉन समूहाला 3 हजार 250 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. एप्रिल 2012 मध्ये हे कर्ज दिले गेले होते. यातील 2 हजार 810 कोटी रुपयांचे कर्ज थकीत होते आणि 2017 मध्ये ते बुडीत कर्ज म्हणून जाहीर केले गेले होते. याप्रकरणी सीबीआयकडून चौकशी सुरू होती. त्यानंतर आज अटकेची कारवाई करण्यात आली.
अरविंद गुप्ता यांची तक्रार : चंदा कोचर यांनी बँकेचे धोरण आणि नियम मोडून व्हिडीओकॉन समूहाला कर्ज मंजूर केल्याचा आरोप आहे. व्हिडीओकॉनचे एक भागधारक अरविंद गुप्ता यांनी याबाबत पत्र लिहून पंतप्रधान, रिझर्व्ह बँक आणि सेबीकडे तक्रार केली होती.
चंदा कोचर चे यशस्वी करिअर : 1984 मध्ये ट्रेनी व्यवस्थापक म्हणून आयसीआयसीआय बँकेत रुजू झालेल्या चंदा कोचर यांचा यशाचा आलेख चढता राहिला. उपमहाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक, कार्यकारी संचालक, कॉर्पोरेट बिझनेस हेड, मुख्य वित्त अधिकारी अशा विविध पदांवर काम केल्यानंतर 2009 मध्ये त्या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाव्यवस्थापक बनल्या.
सीबीआय कोर्टातील युक्तीवादातील प्रमुख मुद्दे : सीबीआयचा वकिलांचा युक्तिवाद , वेणूगोपाल धूत तपासात सहकार्य करत नाहीत, त्यांना ब-याचदा समन्सही पाठवण्यात आले होते. सीबीआय ने अखेरीस आज त्यांना ताब्यात घेतल आहे, समन्सला प्रतिसाद देण्यास धूत टाळाटाळ करत होते, आम्हाला चंदा कोचर, दीपक कोचर आणि धूत यांना कागदपत्रे आणि संघर्षासाठी ताब्यात घेण्याची आवश्यकता आहे, कोचर दाम्पत्य आणि वेणुगोपाल धूत यांची 3 दिवसांची कस्टडी CBI ने मागितली.
दीपक कोच्चर यांचे वकील विक्रम चौधरी यांचा युक्तिवाद : केसमध्ये 2 मूलभूत उल्लंघन, नमूद केलेला गुन्हा 13. 1B अंतर्गत आहे, प्राथमिक चौकशीतून हे तपासात पुढे आले आहे, दीपक कोचर हे सहकार्य करत नसल्याचे रिमांडमध्ये म्हटले आहे. मात्र कसे आणि का याबाबत काही स्पष्ट केले नाही, ईडीच्या केसमध्ये दीपक कोचर यांना जामीन मिळाला आहे. ईडीने यापूर्वी सगळी चौकशी केली आहे. 6 महिने चौकशी सुरू होती मात्र त्यांना जामीन मिळाल्यावर CBI ने त्यांना अटक केली. ह्या कोर्टच्या जामिनाच्या निर्णयाच्या विरोधात ED सुप्रीम कोर्टात गेले. मात्र सुप्रीम कोर्टने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. दीपक कोचर यांच्या मुलाचे लग्न ठरले आहे, अमानवीयरीत्या याचवेळी त्यांना अटक केली. दीपक कोचर यांची अटक बेकायदेशीर, केवळ आरोपांवर आधारित अटक करता येऊ शकत नाही. 2017 चे प्रकरण जर त्यांना वाटत आहे की गुन्हा आहे मग 5 वर्ष अटक करायला का लावली. हा सत्तेचा गैरवापर आहे.
चंदा कोचर यांचे वकील ऍड. अमित देसाई यांच्या युक्तीवाद : मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे. मागील रिमांड कॉपी पेस्ट केली आहे. हाय कोर्टने हे सारं प्रकरणात म्हटलं आहे की no offense आहे आणि सुप्रीम कोर्टने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. CBI ने आरोपपत्र दाखल झाले आणि आरोपी आरोपपत्रात दाखल केल्याप्रमाणे दोषी आढळला अशी उदाहरण बघायला मिळत नाहीत. वकील म्हणून आम्हाला तसा अनुभव आहे. 2 दिवस काहीच चौकशी केली नाही, मग सहकार्य करत नाही असे CBI कसे म्हणू शकते. आज त्यांनी धूत यांना अटक केली आहे आणि आता त्यांना तिघांची एकत्र चौकशी करायची आहे. एवढी वर्षे बँकेकडे लेटर आहे ते का नाही तपासले. मी लगेच जामिनासाठी अर्ज करणार नाही, कारण केस रिमांडच्या टप्प्यावर आहे.
वेणूगोपाल धूत यांचे वकील ऍड. लट्टा यांच्या युक्तीवाद : हे कर्ज वाटप बेकायदेशीर आहे असे कुठेच CBI ने आपल्या रिमांड कॉपीमध्ये म्हटले नाही. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. हे कर्ज वाटप बेकायदेशीर आहे असे कुठेच CBI ने आपल्या रिमांड कॉपीमध्ये म्हटले नाही. 300 कोटींची केस असल्याचे CBI म्हणतात या केसची ईडीने यापूर्वीच चौकशी केली आहे. ईडी केसमध्ये धूत यांना अटक झाली नव्हती. ईडीने यापूर्वी हे प्रकरण हाताळले आहे मग CBI केस हाताळत आहे हे व्यर्थ आहे. समन्सच्या दिवशी मी मुंबईत नव्हतो, याबाबत धूत यांनी CBI च्या अधिकाऱ्यांना फोन करून कळवले होते. ही बेकायदेशीर अटक आहे. 70 पेक्षा अधिक वयाचे धूत आहेत. धूत यांनी पासपोर्ट आधीच CBI कडे सोपवला आहे. CBI Custody In ICICI Bank Scam