ETV Bharat / state

ICICI Bank Scam Case : वेणूगोपाल धूत यांच्या जामीन अर्जावर 13 जानेवारी रोजी सुनावणी, आयसीआयसी बँक घोटाळा प्रकरण

author img

By

Published : Jan 10, 2023, 3:44 PM IST

आयसीआयसीआय बँक घोटाळा प्रकरणात (ICICI Bank Scam Case) सीबीआयने अटक केलेल्या व्हिडिओकॉन समूहाचे व्यवस्थापक वेणूगोपाल धूत यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. धूत यांच्या जामीन अर्जावरील वरील याचिकावर (Hearing on Venugopal Dhoot bail) तातडीने सुनावणी घेण्याची विनंती आज धूत यांच्या वकिलांनी केल्यानंतर या याचिकेवर 13 जानेवारी रोजी सुनावणी (Hearing on 13 January) घेण्याचे निश्चित करण्यात आले. न्यायालयाने सीबीआयला धूत यांच्या जामीनावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.

ICICI Bank Scam Case
आयसीआयसी बँक घोटाळा प्रकरण

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने आयसीआयसीआय बँक घोटाळा प्रकरणातील (ICICI Bank Scam Case) इतर दोन आरोपी चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना जामीन मंजूर केला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने यापूर्वी धूत यांना बेकायदेशीर अटक केल्याचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर त्यांनी आता जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या अर्जावर 13 जानेवारी (Hearing on 13 January) रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने सीबीआयला धूत यांच्या जामीनावर (Hearing on Venugopal Dhoot bail) उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.

न्यायालयाने याचिका फेटाळली : आयसीआयसीआय बँक लोन घोटाळा प्रकरणात व्हिडिओकॉन ग्रुपचे व्यवस्थापक वेणूगोपाल धूत यांना अटक करण्यात आली होती. ही अटक बेकायदेशीर असल्याचे म्हणत, सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत; असे निरीक्षण नोंदवले की सीबीआयने केलेली अटक ही कायदेशीर आहे.

काय आहे प्रकरण : आयसीआयसी बँक लोन घोटाळ्या प्रकरणात सीबीआयने आयसीआयसी बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर, दीपक कोचर, व्हिडिओकॉन ग्रुपचे वेणूगोपाल धूत यांच्यासह न्यूपॉवर रिन्यूएबल्स, सुप्रीम एनर्जी, व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रिज लिमिटेड यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यामध्ये भारतीय दंड संहितेतील गुन्हेगारी कटाचे कलम तसेच आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्यातील कलमे लावण्यात आली आहेत.

आयसीआयसीआय बँकेची फसवणूक केल्याचा आरोप : व्हिडिओकॉन ग्रुपला 2012 मध्ये आयसीआयसीआय बँकेकडून 3 हजार 250 कोटी रुपयांचे कर्ज मिळाले होते. त्यानंतर या कंपनीचे प्रवर्कत वेणूगोपाल धूत यांनी न्यूपॉवर कंपनीत कथिक कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. आरोपींनी इतरांसोबत गुन्हेगारी कट रचून खासगी कंपन्यांना कर्जे मंजूर केल्याचा आरोप आहे. यातून आरोपींनी आयसीआयसीआय बँकेची फसवणूक केल्याचे सीबीआयने म्हटले आहे. या प्रकरणी सीबीआयने 2019 मध्ये एफआयआर दाखल केली होती.

पदाचा गैरवापर केल्याचा आरोप : न्यूपॉवर ही कंपनी दीपक कोचर यांनी स्थापन केली आहे. या कर्जाच्या या व्यवहारांतून कोचर दाम्पत्याला लाभ झाल्याचे सांगितले जाते. चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेचे सीईओ व एमडी पद ऑक्टोबर 2018 मध्ये सोडले होते. चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बेकायदा पद्धतीने व्हिडिओकॉन ग्रुपला कर्ज मंजूर केल्याचे सीबीआयने म्हटले आहे. तर डिसेंबर महीन्याच्या शेवटच्या आठवड्यात धूत यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी आता जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या अर्जावर 13 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने सीबीआयला धूत यांच्या जामीनावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.