मुंबई : मुंबई सत्र न्यायालयात विशेष सीबीआय कोर्टाने आज गुरुवारी आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर यांनी भायखळा महिला कारागृहात घरचे जेवण, एक खुर्ची आणि गादीची मागणी करणारी याचिका फेटाळली लावली आहे. ( sessions court rejected petitio ) आर्थर रोड कारागृहात बंद असलेले चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांनी दाखल केलेली (petition of Chanda Kochhar )अशीच याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. संबंधित कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून त्यांना त्यांच्या वैद्यकीय परिस्थितीनुसार आहार देण्याचे निर्देश न्यायालयाने कारागृह अधीक्षकांना दिले आहे. ( Chanda Kochhar and two other accused )
हायपरलिपिडेमियासह आजारांनी अत्यंत कमजोर : आयसीआयसीआय बँक कर्ज फसवणूक प्रकरणातील सहआरोपी, व्हिडिओकॉनच्या वेणुगोपाल धूतची घरच्या जेवणाची मागणी करणारी याचिका देखील न्यायालयाने फेटाळली आहे. चंदाच्या वकिलाने असे म्हटले की ती व्हर्टिगो आणि हायपरलिपिडेमियासह आजारांनी अत्यंत कमजोर होती. भायखळा तुरुंग रुग्णालयाच्या नोंदींमध्ये तिच्या गुडघ्यात चक्कर आणि वेदना झाल्याची निष्पन्न झाल्याने त्यांना खुर्चीची मागणी करण्यात आली होती. तसेच त्यांचे पती दीपक कोचर यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे त्यांनी युक्तीवादा दरम्यान सांगितले होते. (petition of Chanda Kochhar )
काय आहे प्रकरण : आयसीआयसी बँक लोन घोटाळ्या प्रकरणात सीबीआयने आयसीआयसी बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर, दीपक कोचर, व्हिडिओकॉन ग्रुपचे वेणूगोपाल धूत यांच्यासह न्यूपॉवर रिन्यूएबल्स, सुप्रीम एनर्जी, व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रिज लिमिटेड यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यामध्ये भारतीय दंड संहितेतील गुन्हेगारी कटाचे कलम तसेच आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्यातील कलमे लावण्यात आली आहेत.
खासगी कंपन्यांना कर्जे मंजूर केल्याचा आरोप : व्हिडिओकॉन ग्रुपला 2012 मध्ये आयसीआयसीआय बँकेकडून 3 हजार 250 कोटी रुपयांचे कर्ज मिळाले होते. त्यानंतर या कंपनीचे प्रवर्कत वेणूगोपाल धूत यांनी न्यूपॉवर कंपनीत कथिक कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. आरोपींनी इतरांसोबत गुन्हेगारी कट रचून खासगी कंपन्यांना कर्जे मंजूर केल्याचा आरोप आहे. यातून आरोपींनी आयसीआयसीआय बँकेची फसवणूक केल्याचे सीबीआयने म्हटले आहे. या प्रकरणी सीबीआयने 2019 मध्ये एफआयआर दाखल केला होता. न्यूपॉवर ही कंपनी दीपक कोचर यांनी स्थापन केली असून कर्जाच्या या व्यवहारांतून कोचर दाम्पत्याला लाभ झाल्याचे सांगितले जाते. चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेचे सीईओ व एमडी पद ऑक्टोबर 2018 मध्ये सोडले होते. चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बेकायदा पद्धतीने व्हिडिओकॉन ग्रुपला कर्ज मंजूर केल्याचे सीबीआयने म्हटले आहे.