ETV Bharat / state

तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीचे आदेश रद्द

तुकाराम मुंढे नागपूर पालिका आयुक्त पदावरून बदली झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसातच हा बदली आदेश रद्द करण्यात आला आहे. त्यांना बदलीनंतर देण्यात आलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

तुकाराम मुंढे
तुकाराम मुंढे
author img

By

Published : Sep 10, 2020, 6:11 PM IST

Updated : Sep 10, 2020, 6:45 PM IST

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा सनदी अधिरकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरुच आहे. आजही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यात नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सचिवपदी नियुक्ती केलेल्या तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंढे यांच्या बदलीचा तिढा कायम आहे.

तुकाराम मुंढे यांची नागपूर पालिका आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांतच हा बदली आदेश रद्द करण्यात आला आहे. मुंढे यांच्या बदलीचे आदेश रद्द करताना आता मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. तसे आदेश आज जारी करण्यात आले आहेत. निंबाळकर हे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.

सनदी अधिकारी बदली -

1. एम. जे. प्रदीप चंद्र यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर या रिक्त पदावर

2. ई रवींद्रन यांची नियुक्ती सह विक्रीकर आयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई या पदावर

Last Updated : Sep 10, 2020, 6:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.