मुंबई Ashwini Bhide on British Airways : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तथा मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांना ब्रिटिश एअरवेजच्या विमानातून प्रवास करताना वाईट अनुभव आलाय. त्यांनी याबद्दल 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनुभव शेअर केलाय. तसंच त्यांनी ब्रिटिश एअरवेजची तक्रारही केली आहे. ब्रिटिश एअरवेजनं ओव्हरबुकिंगचं कारण देत प्रीमियम क्लासचं सीट बुक असतानाही भिडे यांना इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करण्यास लावलं होतं. त्यामुळं भिडे यांनी संताप व्यक्त केलाय. त्यांनी 'X' साईटवर पोस्टमध्ये त्यांना झालेल्या त्रासाबद्दल लिहिलंय. ब्रिटिश एअरवेजच्या प्रवाशांना नेहमीच असे अनुभव येत असल्याचा दावाही भिडे यांनी पोस्टमध्ये केलाय. त्यावर ब्रिटिश एअरवेजकडून उत्तर आलंय. तुमच्या झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत, असा रिप्लाय ब्रिटिश एअरवेजने भिडेंना दिलाय.
-
Are you cheating or following discriminatory/racist policies @British_Airways ? How come u downgrade a premium economy passenger at check-in counter on false pretext of overbooking without even paying price difference forget about compensation? I’m told this is a common…
— Ashwini Bhide (@AshwiniBhide) January 12, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Are you cheating or following discriminatory/racist policies @British_Airways ? How come u downgrade a premium economy passenger at check-in counter on false pretext of overbooking without even paying price difference forget about compensation? I’m told this is a common…
— Ashwini Bhide (@AshwiniBhide) January 12, 2024Are you cheating or following discriminatory/racist policies @British_Airways ? How come u downgrade a premium economy passenger at check-in counter on false pretext of overbooking without even paying price difference forget about compensation? I’m told this is a common…
— Ashwini Bhide (@AshwiniBhide) January 12, 2024
ब्रिटिश एअरवेजवर भेदभावाचा आरोप : अश्विनी भिडे यांच्याकडं प्रीमियम दर्जाचं तिकीट होतं. परंतु, ब्रिटिश एअरवेजनं अश्विनी भिडे यांना ओव्हरबुकिंगचं कारण देत इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करण्यास भाग पाडलं. त्यामुळं भिडे यांनी ब्रिटिश एअरवेजवर भेदभाव तसंच वर्णद्वेषाचा आरोप केलाय.
-
We're sorry to hear what happened and apologise for the inconvenience caused this has caused. If you wish to submit your complaint to our Customer Relations team, please use the following link: https://t.co/cuwkn37hqx. Milika
— British Airways (@British_Airways) January 13, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">We're sorry to hear what happened and apologise for the inconvenience caused this has caused. If you wish to submit your complaint to our Customer Relations team, please use the following link: https://t.co/cuwkn37hqx. Milika
— British Airways (@British_Airways) January 13, 2024We're sorry to hear what happened and apologise for the inconvenience caused this has caused. If you wish to submit your complaint to our Customer Relations team, please use the following link: https://t.co/cuwkn37hqx. Milika
— British Airways (@British_Airways) January 13, 2024
वर्णद्वेष करता? : 'X' वरील एका पोस्टमध्ये भिडे यांनी ब्रिटिश एअरवेजला उद्देशून म्हटलं आहे की, "तुम्ही लोकांना फसवता, भेदभाव करता की वर्णद्वेष करता? चेक-इन काउंटरवर प्रीमियम इकॉनॉमी तिकीट बुक केलेलं असतानाही प्रवाशाला ओव्हरबुकिंगच्या नावाखाली भरपाई न देता, ऐनवेळेवर इकॉनॉमी सीटवरून प्रवास करण्यास सांगितलं जातं. ब्रिटिश एअरवेज नेहमीच प्रवाशांशी अशीच वागते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.
भरपाई दिली नसल्याचा आरोप : प्रिमियम क्लासऐवजी इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करण्यास सांगितल्यानंतर ब्रिटिश एअरवेजनं त्यांना भरपाईही दिली नसल्याचा आरोप अश्विनी भिडे यांनी केलाय. भिडे म्हणाल्या की, 'तुम्ही DGCA (Directorate General of Civil Aviation) च्या नियमांचं उल्लंघन करत असल्याचं मी ऐकलं आहे, हे मला पहिल्यांदाच लक्षात आलंय.'
हेही वाचा -