मुंबई - दिवाळी सरते ना सरते तोपर्यंत किरीट सोमैया यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर झोपडपट्टी पुनर्वसन मधील गाळ्यात भ्रष्टाचाराच्या संदर्भात आरोपांची राळ उठवली आहे. यामुळे दादर पोलीस स्टेशनमध्ये किशोरी पेडणेकर यांना दोन वेळा चौकशीसाठी बोलावले होते. दरम्यान, त्यांनी किरीट सोमैया यांचे आरोप निराधार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

भ्रष्टाचाराची संबंध येत नाही - किरीट सोमैया यांनी वरळी व दादर येथील एसआरए घोटाळ्या प्रकरणी केलेल्या आरोपांना यापूर्वीच उत्तर दिले असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. तसेच, त्यांनी हे देखील नमूद केले की," सोमैया धादांत खोटे बोलून आरोप आणि आरोपांच्या फेरी झाडून बदनाम करीत आहेत. हे त्यांचे षड्यंत्र भाग आहे. एस आर ए गाळयाबाबत बाबत जे आरोप केलेले आहेत. त्या संदर्भात स्वतः झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलेल आहे. हे प्रतिज्ञा पत्र पाहिले असता, कुठेही माझा या भ्रष्टाचाराची संबंध येत नाही हे सिद्ध होते असं त्यांनी सांगितलं आहे.
गाळे लाटण्याचा आरोप : मात्र राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे त्यावेळी सरकार असल्याकारणाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती, असा आरोप पत्रकार परिषदेतून यांनी लावला आहे. एस आर एचे अनेक प्रकरणांमध्ये किशोरी पेडणेकर यांनी घोटाळे केले आहेत. याबाबत किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती. याबाबतचे काही कागदपत्र देखील किरीट सोमय्या यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांकडे दिले आहेत. या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांना पोलिसांकडून समंस देण्यात आला असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. गोमाता नगर एस आर ए प्रकल्पात किशोरी पेडणेकर यांनी गाळे लाटण्याचा आरोप यांच्याकडून करण्यात आला आहे.
किरीट सोमय्या यांचे आरोप खोटे : एस आर ए प्रकरणात किरीट सोमय्या आपलं नाव बदनाम करत आहेत. या सर्व प्रकरणात किंवा यांनी लावलेले आरोप खोटे असून, आपल्याला बदनाम करण्याचं हे एक षडयंत्र आहे. आज पत्रकार परिषद घेऊन यांनी जे आरोप लावलेले आहेत, याची उत्तरे आपण आधीच दिली आहेत. घोटाळ्या बाबत आपल्यावर जे आरोप लावले जात आहेत. त्यापैकी एकही गाळा किंवा घर आपल्या नावावर नाही. आपल्यावर केवळ खोटे आरोप लावले जात असल्याचे स्पष्टीकरण किशोरी पेडणेकर यांच्याकडून ट्विटच्या माध्यमातून देण्यात आला आहे.