ETV Bharat / state

दिशा सालियन प्रकरणी 'का-कू' न करता शर्मिला ठाकरेंनी घेतली आदित्य ठाकरेंची बाजू, म्हणाल्या "तो असं काही करेल वाटत नाही"

Sharmila Thackeray On Aaditya Thackeray : अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांची माजी व्यवस्थापक दिशा सालियनच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी मंगळवारी विशेष तपास समिती (एसआयटी) स्थापन केली. या प्रकरणी आदित्य ठाकरेंची काकू शर्मिला ठाकरे यांनी पाठराखण केली आहे. तो असं काही करेल असं वाटत नाही, असं ठाकरे म्हणाल्यात.

Sharmila Thackeray On  Aaditya Thackeray
Sharmila Thackeray On Aaditya Thackeray
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2023, 4:00 PM IST

Updated : Dec 15, 2023, 5:47 PM IST

शर्मिला ठाकरे यांची प्रतिक्रिया

मुंबई Sharmila Thackeray On Aaditya Thackeray : अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या सचिव दिशा सालियनच्या मृत्यूच्या चौकशीसाठी पोलिसांचं विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापना करण्यात आलं आहे. यासंदर्भात पोलीस विभागाला सूचना देण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दिली. या चौकशीमुळं आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावरून भाजपा नेते आदित्य ठाकरेंवर टीका करत आहेत. तर, आदित्य ठाकरे यांच्या बचावासाठी त्यांच्या काकू शर्मिला ठाकरे मदतीला धावून आल्या आहेत. या प्रकणावर बोलताना त्या म्हणाल्या की, 'आदित्य ठाकरे असं काही करेल असं वाटत नाही', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

अशा चौकशीतून आम्हीही गेलो : मनसेच्या स्वयंरोजगार विभागातर्फे 'उद्योग कर उद्योग' या विशेष कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी आहे. उद्योग, व्यापारात महिलांना प्रोत्साहन देणं, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं दिली. आदित्य ठाकरे यांच्याबद्दल बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे असं काही करेल असं वाटत नाही. अशा चौकशीतून आम्हीही गेलो आहोत, असं त्यांनी आदित्य ठाकरे यांच्याबद्दल बोलताना सांगितलं.

ठाकरे कुटुंब एकत्र : शिवसेना उद्धव ठाकरे गट तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. एकीकडं राज ठाकरे अनेक वेळा उद्धव ठाकरेंवर टीका करताना दिसतात, तर दुसरीकडं उद्धव ठाकरे देखील राज ठाकरेंचा समाचार घेताना दिसतात. मात्र, ठाकरे कुटुंबीयांवर आरोप होत असताना ठाकरे कुटुंब एकत्र आल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी 'या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही', अशी टिप्पणी केली होती. आता आदित्य ठाकरेंवर आरोप होत, असताना राज ठाकरे यांच्या पत्नी तसंच आदित्य ठाकरे यांच्या काकू शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंबाबत मत व्यक्त केलंय.

हेही वाचा -

  1. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची अमित शाहांसोबत आजची भेट रद्द; कधी होणार पुढील भेट?
  2. सुधाकर बडगुजर प्रकरणाची संपूर्ण एसआयटी चौकशी लावू- देवेंद्र फडणवीस
  3. देशपातळीवर विरोधकांची इंडिया आघाडी! मात्र पुण्याच्या जागेबाबत आघाडीत बिघाडी, तर महायुतीत देखील अनेक दावेदार

Last Updated : Dec 15, 2023, 5:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.