ETV Bharat / state

Hyper tension patients : मुंबईत हायपर टेन्शनचे २५ लाख रुग्ण, पालिकेची उद्यापासून 'डॉक्टर आपल्या दारी' मोहीम - Dr Sanjeev Kumar

बदलते वातावरण, धावपळीचे जीवन, वेळेवर जेवण नसणे आदी कारणांमुळे मुंबईकरांना डायबिटीस व हायपर टेन्शनचे आजार झाले आहेत. मुंबईत तब्बल २५ लाख मुंबईकर हायपर टेन्शनचे (hyper tension patients in Mumbai) रुग्ण असून हायपर टेन्शन मुक्त मुंबईसाठी पालिकेने 'डॉक्टर आपल्या दारी' मोहीम (Doctor At Home campaign of BMC) सुरू करण्याच्या निर्णय घेतला आहे. सोमवार २ जानेवारीपासून ही मोहीम सुरू होणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ संजीवकुमार (Dr Sanjeev Kumar) यांनी दिली.

Hyper tension patients
मुंबईत हायपर टेन्शनचे २५ लाख रुग्ण
author img

By

Published : Jan 1, 2023, 3:06 PM IST

मुंबई : मुंबईकरांचे सर्व्हेक्षण (survey of Mumbaikars) : मुंबईत २५ लाख मुंबईकर हायपर टेन्शनचे रुग्ण (hyper tension patients in Mumbai) आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात हा आकडा मोठा असल्याने मुंबई डायबिटीस व हायपर टेन्शनमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष मोहीम (Doctor Aplya Dari campaign) हाती घेतली आहे. तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली १० हजार आशा वर्कर ३० वर्षांवरील ५० लाख मुंबईकरांची तपासणी करणार आहेत. सोमवारपासून (२ जानेवारी) ही मोहीम सुरु करण्यात येणार असून डायबिटीस व हायपर टेन्शनचे रुग्ण (Patients with diabetes and hypertension) आढळल्यास योग्य ते औषधोपचार केले जाणार आहे.

आरोग्य केंद्रांमध्ये विशेष मोहीम (Special campaign in health centers) : या मोहिमेत गरोदर महिला व वयोवृद्धांची तपासणी करण्यात येणार आहे. ‘आशा’ वर्करच्या माध्यमातून घरोघरी जाऊन प्राथमिक तपासणी केली जाईल. यावर ‘बीएमएस’ डॉक्टरच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येईल. तर सर्वेक्षणात आढळणार्‍या संशयितांवर डॉक्टर, पालिकेचे दवाखाने आणि आवश्यकता भासल्यास मोठ्या रुग्णालयांच्या माध्यमातून औषधोपचार करण्यात येणार आहे. या उपक्रमात आरोग्य केंद्रांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचे डॉ संजीवकुमार यांनी सांगितले.

५० लाख मुंबईकरांची तपासणी होणार (50 lakh Mumbaikars will be examined) : मुंबई महापालिका माध्यमातून सध्या ४ हजार आशा वर्कर कार्यरत असून आणखी ५,५०० आशा वर्कर यांची भरती करण्यात येणार आहे. 'आशा’ वर्कर, डॉक्टर्स माध्यमातून राबवण्यात येणार्‍या उपक्रमात घरोघरी गेल्यानंतर ज्येष्ठ, लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याबाबत माहिती घेतली जाणार आहे. यामध्ये ज्येष्ठ, गरोदर स्त्रियांना गरजेनुसार आवश्यक उपचार मिळवून देण्यासाठी मदत केली जाणार असल्याने मोठा फायदा होणार आहे. या प्राथमिक तपासण्यांसाठी आवश्यक असणारे ट्रेनिंग त्यांना आरोग्य विभागाकडून देण्यात (Training will be given to them) येणार आहे. मुंबईत ३० वर्षांवरील सर्व नागरिकांची तपासणी यामध्ये केली जाणार आहे.

३४ टक्के मुंबईकरांना हायपर टेन्शन (34 percent of Mumbaikars have hyper tension) : मुंबईमध्ये राहणाऱ्या नागरिकांना कोणते आजार मोठ्या प्रमाणात आहेत. आणि त्यावर कोणत्या उपाययोजना करता येवू शकतात यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने ५ हजार नागरिकांचे सर्वेक्षण केले (5 thousand citizens were surveyed) होते. या सर्वेक्षणात ३४ टक्के मुंबईकर हायपर टेन्शनचे शिकार असल्याचे समोर आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.