ETV Bharat / state

मानखुर्दमध्ये घरगुती वादातून पतीने केली पत्नीची हत्या - पतीने केली पत्नीची हत्या

पोलीस तपासामध्ये सदर मृत महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले.

पतीने केली पत्नीची हत्या
author img

By

Published : Sep 7, 2019, 4:26 PM IST

मुंबई - पत्नीसोबत वारंवार होत असलेल्या वादाला कंटाळून पतीने रागाच्या भरात पत्नीची हत्या केल्याची घटना मानखुर्दमध्ये घडली आहे. डोक्यात दगड घालून पतीने पत्नीची हत्या केली. नूर सलमानी हजम (वय 29) असे या मृत पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहम्मद खलील मोहम्मद सलमानी (वय 33) याला अटक केली आहे.

हेही वाचा - गणेशोत्सवाच्या काळात कोट्यवधी योजनांचा 'श्री गणेशा' - पंतप्रधान मोदी

याबाबत अधिक माहिती अशी की, मानखुर्द परिसरातील सायन ट्रॉम्बे रस्त्याच्या कडेला गुरुवारी सकाळी एका अनोळखी महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह स्थानिकांना दिसला. या घटनेची माहिती परिसरात समजल्यानंतर खळबळ उडाली. स्थानिकांनी मानखुर्द पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पाठवला आणि मानखुर्द पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करुन तपासला सुरुवात केली.

पोलीस तपासामध्ये सदर मृत महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. गुन्हे शाखा-6 च्या एका पथकाने मृत महिलेचा घटनास्थळावरून काढलेल्या फोटोची माहिती व मृत महिलेची ओळख पटवताना मानखुर्द, देवनार गोवंडी, ट्राम्बे, शिवाजीनगर परिसरामध्ये ही माहिती खबऱ्या मार्फत पसरवली. त्यावेळी नूर सलमानी हजम (वय 29) असल्याची माहिती मिळाली.

हेही वाचा - मुंबईत मोदींच्या हस्ते तीन मेट्रो मार्गिकांचे भूमिपूजन; औरंगाबादलाही जाणार

मृत महिला पती व 2 मुलासोबत बैगणवाडीमध्ये वास्तव्यास होती. तिचे पतीसोबत किरकोळ कारणावरून वारंवार वाद होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या महिलेचा घराचा पत्ता काढून बैगणवाडीतील घर गाठले. तेव्हा पती सलमानी आपल्या गावी उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता. यावरून पोलिसांना त्याच्यावरील संशय अधिक बळावला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, आपणच पत्नीची हत्या केल्याचे त्याने मान्य केले.

बुधवारी रात्री कडाक्याचे भांडण झाल्यानंतर मृत महिला रागात घराबाहेर पडली. पती तिला समजवण्याचा प्रयत्न करत तिच्या मागे गेला असता, एका रिक्षामध्येही भांडण झाले. अखेर सायन ट्राम्बे रस्त्यावरील धोबीघाटजवळील रस्त्याच्याकडेला दोघांत पुन्हा वाद सुरू असताना रागाच्या भरात पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घातला, असे सलमानी यांनी पोलिसांना सांगितले.

Intro:मानखुर्द मध्ये रागाच्या भरात पत्नीची हत्या पतीला अटक

पत्नीसोबत वारंवार होत असलेल्या वादाला कंटाळून पतीने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मानखुर्द मध्ये उघडकीस आला आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती मोहम्मद खलील मोहम्मद सलमानी वय 33 याला अटक केली आहेBody:मानखुर्द मध्ये रागाच्या भरात पत्नीची हत्या पतीला अटक

पत्नीसोबत वारंवार होत असलेल्या वादाला कंटाळून पतीने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मानखुर्द मध्ये उघडकीस आला आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती मोहम्मद खलील मोहम्मद सलमानी वय 33 याला अटक केली आहे

मानखुर्द परिसरातील सायन ट्रॉम्बे रस्त्याच्याकडेला गुरुवारी सकाळी एका अनोळखी महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह स्थानिकांना दिसला या घटनेची माहिती परिसरात समजल्यानंतर खळबळ उडाली होती .स्थानिकानी मानखुर्द पोलिसांना ही माहिती दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पाठवला आणि मानखुर्द पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यां विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करत तपासला सुरुवात केली. पोलीस तपासामध्ये सदर मृत महिलेच्या डोक्यात दगड घालून निर्घुण हत्या केल्याचे तपासात दिसत होते. यावेळी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले गुन्हे शाखा 6 च्या एका पथकाने मृत महिलेचा घटनास्थळावरून काढलेल्या फोटोची माहिती व मृत महिलेची ओळख पटवणे करता मानखुर्द, देवनार गोवंडी ,ट्राम्बे ,शिवाजीनगर परिसरामध्ये ही माहिती खबऱ्या मार्फत पसरवली तेव्हा या महिलेचे नाव नूर सलमानी हजम वय 29 असल्याचे माहिती मिळाली मृत महिला पती व 2 मुलासोबत बैगणवाडी मध्ये वास्तव्यास होती तिचे पती सोबत किरकोळ कारणावरून वारंवार वाद होत असल्याची महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळाली यावेळी पोलिसांनी या महिलेचा घराचा पत्ता काढून बैगणवाडीतील घर गाठले यावेळी पती सलमानी आपल्या गावी उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता यावरून पोलिसांना त्याच्यावरील संशय अधिक बळावला पोलिसांनी अधिक चौकशी केली त्यात आपण पत्नीची हत्या केल्याचे मान्य केले यावेळी आरोपीने बुधवारी रात्री कडाक्याचे भांडण झाल्यानंतर मयत महिला घराबाहेर रागात बाहेर पडली तिला समजवण्याचा प्रयत्न करत तिच्या मागे गेलो असता एका रिक्षामध्ये हि भांडण झाले. अखेर सायन ट्रोम्बे रस्त्यावरील धोबीघाट जवळील रस्त्याच्याकडेला दोघांत पुन्हा वाद सुरू असताना रागाच्या भरात तिच्या डोक्यात रस्त्यावरील दगड घातल्याचे सलमानी यांनी पोलिसांना सांगितले अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सलमानी याला अटक करून पुढील तपासासाठी मानखुर्द पोलिसाच्या हवाली केले पुढील तपास मानखुर्द पोलीस करीत आहेत.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.