ETV Bharat / state

Mumbai Crime : पतीसोबत झालेल्या भांडणानंतर पत्नीची आत्महत्या, पतीने मृतदेह फ्रिजमध्ये ठेवल्याने संशय

कांदिवलीतील एका महिलेने पतीशी झालेल्या वादानंतर विष प्राशन करुन आत्महत्या केली. मात्र पतीने तिचा मृतदेह रुग्णालयातून आणून फ्रिजमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केल्याने या घटनेवरून संशय बळावला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

murder
खून
author img

By

Published : Apr 25, 2023, 8:40 PM IST

मुंबई : योगा क्लास बंद करण्यावरुन पतीसोबत झालेल्या वादानंतर रागाच्या भरात एका 39 वर्षांच्या महिलेने विष प्राशन करुन आत्महत्या केली. विशेष म्हणजे महिलेला मृत घोषित केल्यानंतर ही केस आत्महत्येची असतानाही स्थानिक खाजगी हॉस्पिटलमधून ही माहिती पोलिसांना देण्यात आली नाही. तसेच महिलेच्या पतीने तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केल्याने या घटनेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला : या घटनेची समतानगर पोलिसांनी दखल घेतली असून त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. ही महिला तिचा पती व 13 आणि 7 वर्षांच्या दोन मुलींसोबत कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज, एन. जे सनसिटी अपार्टमेंटमध्ये राहत होती. ती तिच्या राहत्या घरी योगाचे क्लास घेत होती. पत्नीने घरात योगाचे क्लास घेणे पतीला पसंद नव्हते. त्यामुळे त्याने तिला क्लास बंद करण्यास सांगितले. मात्र, तिने त्यास नकार दिला. त्यावरुन त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु होता. शनिवारी याच कारणावरुन त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर रागाच्या भरात महिलेने विषारी किटकनाशक प्राशन केले. तिच्या तोंडातून फेस येऊ लागताच पती घाबरला आणि त्याने तिला जवळच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तिथे दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

आत्महत्येची माहिती पोलिसांपासून लपवून ठेवली : हा आत्महत्येचा प्रकार असल्याने हॉस्पिटल प्रशासनाकडून ही माहिती समतानगर पोलिसांना देणे बंधनकारक होते. मात्र हॉस्पिटलने ही माहिती पोलिसांना न देता तिचा मृतदेह तिच्या पतीच्या स्वाधीन केला. घरी आल्यानंतर पतीने महिलेचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानेही ही माहिती पोलिसांपासून लपवून ठेवली होती. मात्र ही माहिती मिळताच महिलेच्या नातेवाईकांनी तिथे धाव घेतली.

शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई : घडलेल्या या सर्व प्रकाराचा महिलेच्या एका नातेवाईकाला संशय आला. त्यानंतर त्याने ही माहिती समतानगर पोलिसांना दिली. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी भगवती हॉस्पिटलला पाठविला. नातेवाईकांच्या चौकशीत हा संपूर्ण प्रकार बाहेर आला. याची गंभीर दखल घेत समतानगर पोलिसांनी तपासाचे आदेश दिले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. चौकशीनंतर या गुन्ह्यांतील कलमात वाढ केली जाणार आहे. शवविच्छेदन अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही. या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Mumbai Crime News : खंडणीसाठी केले हॉटेल मालकाचे अपहरण, पोलिसांनी 12 तासांत ठोकल्या बेड्या!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.