ETV Bharat / state

प्रतीक्षा संपली.. हूरहूर वाढली.. उद्या जाहीर होणार बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल - बारावी

महाराष्ट्र बोर्डाने बारावीच्या निकालांची तारीख जाहीर केली आहे.

HSC Result 2019: उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल
author img

By

Published : May 27, 2019, 5:16 PM IST

Updated : May 27, 2019, 11:53 PM IST

मुंबई - महाराष्ट्र बोर्डाने बारावीच्या निकालांची तारीख जाहीर केली आहे. बोर्डाने HSC म्हणजे बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल 28 मे रोजी म्हणजे दुपारी 1 वाजता लागणार असल्याची माहिती दिली आहे.

गेल्या वर्षी 10 वी चा निकाल 89.41 टक्के एवढा होता आणि 12 वी चा निकाल 88.41 टक्के होता. गेल्या वर्षी 30 मे रोजी बारावीचा निकाल लागला होता. त्यामुळे यंदा 2 दिवस अगोदर बारावीचा रिझल्ट विद्यार्थ्यांच्या हाती येणार आहे.

सीबीएसई, आयसीएसई आदी मंडळांचे निकाल मे च्या पहिल्या आठवड्यातच जाहीर झाले आहेत. त्यामुळे राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. राज्यभरातून एकूण 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. त्यापैकी 8 लाख 42 हजार 919 विद्यार्थी व 6 लाख 48 हजार 151 विद्यार्थीनी आहेत. राज्यातील 9 हजार 771 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती.

यंदा विज्ञान शाखेतून सर्वाधिक 5 लाख 69 हजार 446 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापाठोपाठ कला शाखेतून 4 लाख 82 हजार 372 तर वाणिज्य शाखेतील 3 लाख 81 हजार 446 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम घेतलेले 58 हजार 12 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. राज्य मंडळाच्या मुंबई विभागातून सर्वाधिक 3 लाख 35 हजार विद्यार्थी परीक्षा दिली. तर कोकण विभागातून सर्वात कमी (32 हजार 362) विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

  • या संकेतस्थळावर पाहू शकता निकाल-
  1. www.mahresult.nic.in
  2. www.hscresult.mkcl.org
  3. www.maharashtraeducation.com
  • निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार
  • गुणपडताळणी 29 मे ते 7 जून या कालावधीत करता येणार
  • उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 29 मे ते 17 जून पर्यंत अर्ज करता येईल

Intro:Body:Conclusion:
Last Updated : May 27, 2019, 11:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.