ETV Bharat / state

आता 'एसआरए' प्रकल्पातील घरे विकता येणार, गृहनिर्माण मंत्र्यांचे संकेत - मंत्री जितेंद्र आव्हाड बातमी

झोपडपट्टीमध्ये घरे असणाऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी नवीन निर्णय घेण्यात येणार असून एसआरए प्रकल्पातील घर आता झोपडी पाडल्यापासून पाच वर्षांनी विकता येणार आहेत, असे संकेत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहेत.

Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Mar 13, 2021, 3:21 PM IST

मुंबई - झोपडपट्टीमध्ये घरे असणाऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी नवीन निर्णय घेण्यात येणार असून एसआरए प्रकल्पातील घर आता झोपडी पाडल्यापासून पाच वर्षांनी विकता येणार आहेत. अनेक वेळा प्रकल्प पूर्ण व्हायला वेळ लागत असतो. त्यामुळे झोपडी पडल्यानंतर पाच वर्षाने ते घर विकण्याची मुभा एसआरए देणार असल्याचे संकेत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहेत.

मुंबईला मोठी किनारपट्टी लाभलेली आहे. त्या किनारपट्टीवर अनेक ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत. खास करुन दक्षिण मुंबईतील कफ परेडच्या बधवार पार्क येथे 32 एकर परिसरात झोपडपट्टी आहे. त्यातील 16 एकरमध्ये 300 चौरस फुटांचे घर झोपडपट्टीवासीयांना दिले, तर इतर जागेवर म्हाडा घरे बांधून ती घरे विकणार आहेत. त्यातून म्हाडाला मोठे उत्पन्न मिळणार आहे. अशा ठिकाणी एसआरए आणि म्हाडा एकत्र येऊन संयुक्तपणे घरबांधणीचा प्रकल्प राबवतील असा विचार आहे, असे मंत्री आव्हाड म्हणाले.

बीडीडी चाळ पुनर्विकासाचा शुभारंभ लवकरच

गेल्या अनेक वर्षांपासून बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा प्रश्न खोळंबला आहे. बीडीडी चाळीच्या पुनर्विकासासाठी महाविकास आघाडी गंभीर असून याच महिन्यात शुभारंभ देखील होईल, असे संकेत जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पावर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा - गोरेगाव येथील चारशे ते पाचशे कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश; शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचाही सामावेश

हेही वाचा - पुन्हा एकदा खोट्या प्रकरणात अडकवल्याचा सचिन वझेंचा दावा; व्हाट्सअ‌ॅप स्टेटसमधून व्यक्त केला मृत्यूचा विचार?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.