ETV Bharat / state

Avinash Bhosle : हॉटेल व्यावसायिक अविनाश भोसले यांना अखेर न्यायालयाचा दिलासा नाहीच

ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरोप असलेल्या अविनाश भोसले यांच्यावर पीएमएलए कायद्यांतर्गत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. भोसले यांनी आपल्यावरील दाखल गुन्हे रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयात सुट्टीकालीन न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी सुनावणी तहकूब केल्याने अविनाश भोसले यांना दिलासा मिळाला नाही.

Bombay High court
मुंबई उच्च न्यायालय
author img

By

Published : May 23, 2023, 4:51 PM IST

मुंबई : अविनाश भोसले हे पुण्यातील व्यावसायिक आहेत आणि उद्योजक देखील आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम हे त्यांचे सासरे देखील आहेत.
सक्त वसुली संचलनालयाने त्यांच्यावर आरोप केला आहे की, आर्थिक घोटाळा करून त्यांनी लंडन या ठिकाणी कोट्यावधी रुपयांची मालमत्ता बेकायदेशीररित्या खरेदी केलेली आहे. डीएचएफएल या वित्त संस्थेकडून बेकायदेशीर 550 कोटी रुपये कर्ज अविनाश भोसले यांनी उचललेले आहे. त्यापैकी 300 कोटी रुपये लंडन येथील संपत्ती खरेदी करण्यासाठी त्यांनी ते वापरले. हा सर्व व्यवहार बेकायदेशीर असल्याचं सीबीआयने देखील आपल्या आरोप पत्रामध्ये म्हटलेलं आहे.

आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटक : पुण्यातील बिल्डर आणि हॉटेल व्यावसायिक अविनाश भोसले यांना आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर त्यांनी तब्येतीच्या कारणास्तव सेंट जॉर्ज रुग्णालयातच रुग्णालयाच्या दिलेल्या अहवालाच्या आधारे ते उपचार घेत होते. त्यांना रुग्णालयात ठेवण्याची गरज नाही, असे सीबीआयने मागील सुनावणीच्या वेळी सत्र न्यायालयासमोर कागदपत्राच्या आधारे भूमिका स्पष्ट केली होती. परिणामी ते न्यायालयीन कोठडी मध्ये आहेत.

न्यायालयीन कोठडी 6 जून पर्यंत : अविनाश भोसले यांच्यावर दाखल एफ आय आर रद्द करण्यासाठीचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या एकलखंडपीठ न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या समोर दाखल झाला होता. याबाबत नुकतीच न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्यासमोर सुनावणीसाठी हे प्रकरण आले असता त्यांनी सुनावणी तहकूब केली. त्यामुळे अविनाश भोसले यांची न्यायालयीन कोठडी 6 जून पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणी ही 6 जून रोजी निश्चित करण्यात आलेली आहे. अविनाश भोसले वैद्यकीय कारणास्तव जे जे रुग्णालयामध्ये काही काळ दाखल होते. मात्र, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. या झालेल्या सुनावणीमुळे आता अविनाश भोसले यांना दिलासा मिळालेला नाही.

हेही वाचा : 1. Cabinet Expansion : लवकर होणार मंत्रिमंडळाचा विस्तार; भाजप - शिंदे गटातील प्रत्येकी ७-७ मंत्र्यांचा समावेश?

2. Nitesh Rane in Nashik : नितेश राणे केली त्र्यंबकराजांची महाआरती, राजकारण पुन्हा तापणार ?

3. RBI Guidelines : आजपासून 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू, जाणून घ्या काय आहेत आरबीआयचे मार्गदर्शक तत्त्वे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.