ETV Bharat / state

नव्या वर्षात घरविक्रीत मोठी घट, जानेवारीत मुंबईत केवळ 10 हजार 412 घरांची विक्री - नव्या वर्षात घरविक्रीत मोठी घट

राज्य सरकारने मुद्रांक शुल्क दरात कपात केल्याने सप्टेंबरपासून घरविक्री वाढू लागली आणि डिसेंबरमध्ये तर घरविक्रीने आजवरचे सर्व रेकॉर्ड तोडले. डिसेंबरमध्ये राज्यात 2 लाख 55 हजार 510 घरे विकली गेली होती. तर यातील 19 हजार 581 घरे ही मुंबईतील होती. या रेकॉर्ड ब्रेक घरविक्रीमुळे बांधकाम क्षेत्राला 'अच्छे दिन' आले असे वाटत असतानाच नव्या वर्षाच्या सुरवातीलाच घरविक्रीत मोठी घट झाली आहे.

नव्या वर्षात घरविक्रीत मोठी घट
नव्या वर्षात घरविक्रीत मोठी घट
author img

By

Published : Feb 1, 2021, 7:50 AM IST

मुंबई - कोरोना आणि लॉकडाऊनचा मोठा फटका बांधकाम क्षेत्राला बसला होता. पण राज्य सरकारने मुद्रांक शुल्क दरात कपात केल्याने सप्टेंबरपासून घरविक्री वाढू लागली आणि डिसेंबरमध्ये तर घरविक्रीने आजवरचे सर्व रेकॉर्ड तोडले. डिसेंबरमध्ये राज्यात 2 लाख 55 हजार 510 घरे विकली गेली होती. तर यातील 19 हजार 581 घरे ही मुंबईतील होती. या रेकॉर्ड ब्रेक घरविक्रीमुळे बांधकाम क्षेत्राला 'अच्छे दिन' आले असे वाटत असतानाच नव्या वर्षाच्या सुरवातीलाच घरविक्रीत मोठी घट झाली आहे. जानेवारी 2021 मध्ये राज्यात केवळ 1 लाख 52 हजार 216 घरे विकली गेली आहेत तर यातील 10 हजार 410 घरे मुंबईतील आहेत. दरम्यान घरविक्री घटल्याने साहजिकच मुद्रांक शुल्क वसुली रूपाने राज्य सरकारला मिळणाऱ्या महसुलात ही मोठी घट झाली आहे.

कोरोना-लॉकडाऊनचा एप्रिल ते जुलैदरम्यान मोठा फटका
राज्यात 1 लाखांहुन अधिक घरांची विक्री दर महिन्याला होत होती. त्यानुसार जानेवारी 2020 मध्ये 1 लाख 16 हजार 647 घरे विकली गेली होती. तर फेब्रुवारीत 1 लाख 30 हजार 955 घरे विकली गेली होती. मार्चमध्ये ही घरविक्री बरी होत असताना 22 मार्चपासून राज्यात लॉकडाऊन लागले. सर्व व्यवहार, बांधकाम ठप्प झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. पगार कमी झाले. परिणामी घरविक्री ही घटली. त्यामुळेच मार्चमध्ये राज्यात केवळ 85 हजार घरे विकली गेली. तर एप्रिलमध्ये तर घरविक्रीत लक्षणीय घट झाली. कधी नव्हे ते मुंबईत या महिन्यात एकही घर विकले गेले नाही. तर राज्यात केवळ 778 इतकीच घरे विकली गेली. यामुळे बांधकाम व्यावसायिक प्रचंड तणावात होते. पण पुढे मात्र परिस्थिती हळूहळू सुधारत गेली.

सरकारच्या 'या' निर्णयामुळे घरविक्रीला नवसंजीवनी
बांधकाम क्षेत्राला कोरोना-लॉकडाऊनचा मोठा फटका बसला. घरविक्री घटली. महसुल कमी झाला. ही सर्व बाब लक्षात घेता सरकारने 24 ऑगस्टला मुद्रांक शुल्क दरात मोठी कपात केली. 5 टक्क्यांवरील मुद्रांक शुल्क काही शहरात 31 डिसेंबर 2020 पर्यंत 2 टक्के तर काही ठिकाणी 3 टक्के केला. तर 1 जानेवारी 2021 पासून मुद्रांक शुल्क दर काही ठिकाणी 3 टक्के तर काही ठिकाणी 4 टक्के करण्यात आली. मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा सरकारचा निर्णय बांधकाम क्षेत्राला नवसंजीवनी देणारा ठरला. सप्टेंबरपासून घरविक्रीत मोठी वाढ होण्यास सुरुवात झाली. डिसेंबरमध्ये तर घरविक्रीने उच्चांक गाठला. डिसेंबरमध्ये राज्यात 2 लाख 55 हजार 510 घरे विकली गेली होती. तर यातील 19 हजार 581 घरे ही मुंबईतील होती. दरम्यान या घरविक्रीतुन राज्याला महसूल ही खूप मोठा मिळाला होता. 2 हजार 212 रुपये इतका महसूल डिसेंबरमध्ये मिळाला होता.

नव्या वर्षात घरविक्री आणि महसूलातही घट
मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा फायदा घरविक्रीला आणि महसूल वाढवण्यात झाला. पण 1 जानेवारीपासून मुद्रांक शुल्क दर 1 टक्क्यांनी वाढले. परिणामी नव्या वर्षात जानेवारीत घरविक्री प्रचंड घटली आहे. अधिकृत कागदपत्रानुसार जानेवारीत राज्यात 1 लाख 52 हजार 216 घरे विकली गेली आहेत. डिसेंबरच्या तुलनेत 1 लाख घरे जानेवारीत कमी विकली गेली आहेत. तर मुंबईत डिसेंबरमध्ये 19 हजाराहून अधिक घरे विकली गेली होती. तर यातून 680 कोटी रुपये इतका महसूल मिळाला होता. तर आता जानेवारीत घरविक्रीचा आकडा जवळपास 50 टक्क्यांनी खाली आला आहे. जानेवारीत मुंबईत केवळ 10 हजार 412 घरे विकली गेली असून यातून केवळ 305 कोटी रुपये इतका महसूल मिळाला आहे. मुद्रांक शुल्क 1 टक्क्यांनी वाढल्याने ही घट झाल्याचे म्हटले जात आहे. तेव्हा आता फेब्रुवारीत घरविक्री किती होते हे पाहणे महत्वाचे ठरेल.
हेही वाचा - Budget 2021 : जाणून घ्या कसा असेल केंद्रीय अर्थसंकल्प

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.