ETV Bharat / state

Holi Special Train: मुंबई ते जयनगर आणि बलिया दरम्यान होळी स्पेशल ट्रेन

author img

By

Published : Feb 21, 2023, 10:50 PM IST

मुलांच्या शाळेच्या सुट्टीच्या दरम्यान प्रवासी मोठ्या प्रमाणात जवळ तसेच लांबचा प्रवास करतात. येत्या होळीच्या सणादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने मुंबई ते जयनगर दरम्यान ६ तर बलिया दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. जयनगरसाठी आरक्षण सुरू झाले असून बलियासाठी उद्या बुधवारपासून आरक्षण सुरू होणार आहे.

Holi Special Train
ट्रेन

मुंबई: ट्रेन क्रमांक 05562 होळी विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १३ मार्च २०२३ ते २७ मार्च २०२३ पर्यंत दर सोमवारी दुपारी १३.३० वाजता सुटेल आणि जयनगर येथे तिसऱ्या दिवशी ०८.०० वाजता पोहोचेल. ट्रेन क्र. 05561 होळी विशेष ही गाडी ११ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत दर शनिवारी रात्री २३.५० वाजता जयनगर येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसर्‍या दिवशी दुपारी १३.०० वाजता पोहोचेल.

'या' ठिकाणी ट्रेन थांबणार: मुंबई ते जयनगर विशेष गाडी ही गाडी कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, पटना, बख्तियारपूर, मोकामा, बरौनी, समस्तीपूर आणि दरभंगा या स्थानकांवर थांबणार आहे. या ट्रेनचे बुकिंग आजपासून (२१ फेब्रुवारी) सुरू झाले आहे.

मुंबई ते बलिया विशेष गाडी: ट्रेन क्र. 01025 दादर- बलिया त्रि-साप्ताहिक विशेष गाडी ३० जून पर्यंत २०२३ पर्यंत, ट्रेन क्रमांक 01026 बलिया-दादर त्रि-साप्ताहिक विशेष गाडी २ जुलै २०२३ पर्यंत, ट्रेन क्रमांक 01027 दादर- गोरखपूर आठवड्यातून ४ दिवस २९ जून २०२३ पर्यंत, ट्रेन क्रमांक 01028 गोरखपूर- दादर आठवड्यातून ४ दिवस ३ जुलै पर्यंत, ट्रेन क्रमांक 01139 नागपूर- मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष गाडी ७ जून २०२३ पर्यंत, ट्रेन क्रमांक 01140 मडगाव- नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष गाडी २ जुलै पर्यंत चालविण्यात करण्यात येणार आहे.

बलियासाठी उद्या पासून आरक्षण सुरू: मुंबई ते बलिया विशेष गाड्यांच्या वेळा, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल केलेला नाही अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. 01025, 01027 आणि 01139/01140 विशेष ट्रेनच्या विस्तारित ट्रिपसाठी विशेष शुल्कासह बुकिंग उद्या २२ फेब्रुवारी २०२३ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाउनलोड करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा: HSC Paper Answer Printing : बारावीच्या पेपरमध्ये प्रश्नांसोबत उत्तरेही छापली; विद्यार्थ्यांसह शिक्षकही गोंधळले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.