ETV Bharat / state

यावर्षीही मुंबईत रंगपंचमीचा बेरंग; १२ रुग्ण दाखल

रासायनिक रंग आणि फुग्यांचा वापर करू नका, असे आवाहन करण्यात येते तरीही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने असे प्रकार घडत आहेत.

राजावाडी रुग्णालय
author img

By

Published : Mar 21, 2019, 6:52 PM IST

मुंबई - रंगपंचमी साजरी करताना दक्षता न बाळगल्याने दरवर्षी अप्रिय घटना घडत असतात. यावर्षीही रंगपंचमीचा उत्साह साजरा करत असताना शहरातील १२ जण जखमी झाले. रासायनिक रंग आणि फुग्यांचा वापर करू नका, असे आवाहन करण्यात येते तरीही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने असे प्रकार घडत आहेत.

राजावाडी रुग्णालय

जखमी झालेल्या नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रंगपंचमीला थंडाईचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. ही थंडाई पिऊन २ जणांना विषबाधा झाली. त्यांना शहरातील राजावाडी रुग्णालयात दाखल केले गेले आहे. सोबतच फुगा लागल्याने संतोष वागले याच्या डाव्या डोळ्याला जखम झाली. त्याला शीव येथील पालिका रुग्णालयात पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, रंगपंचमी साजरी करताना रंगाचा बेरंग होऊ नये याची खबरदारी घ्या, असे आवाहन दक्षता समिती सदस्य राजावाडी रुग्णालय प्रकाश वाणी यांनी केले आहे.

Intro:मुंबई ।
रंगपंचमी साजरी करताना दक्षता न बाळगल्याने दरवर्षी अप्रिय घटना घडते. यावर्षीही रंगपंचमीचा बेरंग झाला आहे.
रासायनिक रंग आणि फुग्यांचा वापर करू नका असे आवाहन करण्यात येते तरीही दुर्लक्ष केले जाते. म्हणूनच मुंबईत आतापर्यंत हा सण साजरा करताना 12 जण जखमी झाले आहेत.Body:त्यांना पालिकेच्या विद्याविहार येथील पालिकेच्या राजावाडी रुग्णालया दाखल करण्यात आले आहे. फुगा लागल्याने संतोष वागले याच्या डाव्या डोळ्याला जखम झाली. त्याला शीव येथील पालिका रुग्णालयात पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आले.
रंगपंचमीला थंडाईचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. ही थंडाई पिऊन दोनजणांना विषबाधा झाली. त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले गेले आहे. याचबरोबर होळी खेळताना पडून जखमी झालेले रुग्ण उपचार घेत आहेत.
रंगपंचमी साजरी करताना रंगाचा बेरंग होऊ नये याची खबरदारी घ्या, असे आवाहन दक्षता समिती सदस्य राजावाडी रुग्णालय प्रकाश वाणी यांनी केले आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.