ETV Bharat / state

Hindu Jan Aakrosh Morcha : लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधात मुंबईत जन आक्रोश मोर्चा; भाजप, शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर टीका

देशासह राज्यात लव्ह जिहाद धर्मांतराचे प्रकार वाढील लागले आहेत, असा आरोप करत सकल हिंदू समाजाने धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा, या मागणीसाठी मुंबईत जन आक्रोश मोर्चा काढला. मोर्चात भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांनी हजेरी लावत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकेचे बाण सोडले.

Etv BharatJan Aakrosh Morcha
लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायद्या लागू करण्यासाठी जन आक्रोश मोर्चा
author img

By

Published : Jan 29, 2023, 9:58 PM IST

लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायद्या लागू करण्यासाठी जन आक्रोश मोर्चा

मुंबई : लव्ह जिहादच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाने दादर शिवाजी पार्क ते कामगार मैदानापर्यंत जन आक्रोश मोर्चा काढला. यावेळी हजारो मोर्चेकरी रस्त्यावर उतरले. भाजप नेते आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, किरीट सोमय्या, चित्रा वाघ, आमदार नितेश राणे, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रसाद लाड, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, केशव उपाध्ये, खासदार गोपाळ शेट्टी, वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह शेकडो भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर, किरण पावसकर, शितल म्हात्रे यासह मोठ्या संख्येने महिला देखील मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

हिंदूंवर अत्याचार : गेल्या तीन वर्षांत हिंदूंवर अत्याचार होत आहे. हिंदूंची संख्या कमी होईल, असा प्रयत्न सुरु आहे. मुंबईतील हिंदूंना घरातून पलायन करावे लागले. आमच्या माता भगिनींचे लव्ह जिहादमधून आयुष्य खराब केले आहे. लव्ह जिहादद्वारे वर्चस्व निर्माण केले तर आम्ही खपवून घेणार नाही. आता महाराष्ट्रातील हिंदूंनी जागे होणे गरजेचे आहे. आमच्या विरोधात येणाऱ्यांविरोधात आम्ही लढू शकतो, हे सांगण्याची गरज आहे. हा मोर्चा त्यासाठीच आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात देखील हिंदूंच्या सणासुदींवर बंधने आणली गेल्याचा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला.

उद्धव ठाकरेंवर टीका : देशासह राज्यातील लव्ह जिहादच्या विरोधातील हा मोर्चा आहे. विधान परिषद आणि विधानसभेत लव्ह जिहादच्या कायद्यासह हे हिंदू राष्ट्र व्हावे अशी मागणी करणार आहोत. महिलांच्या हिताचा हा मोर्चा आहे, असल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटले. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडले असून केवळ एमआयएमसोबत युती करण्याचे बाकी आहेत, अशी टीका लाड यांनी केली. शिवसेनेने हिंदुत्ववादाच्या विरोधात जाऊन ते राजकारण केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंवर केली.

लव्ह जिहादला आमचा विरोध : शिवसेना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब यांच्या विचाराने चालणारी संघटना आहे. आम्हाला त्याचा गर्व आहे. त्यामुळे लव्ह जिहादला आमचा विरोध आहे. उद्धव ठाकरेंनी तर कधीच हिंदुत्व सोडले आहे. भाषणात हिंदुत्वावर बोलायचे आणि दुसरीकडे राहूल गांधी सोबत हातात हात घालून फिरत आहेत. वडीलांचे नाव हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब असताना ठाकरेंनी हिंदुत्व कधीच सोडले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचा वसा उचलला आहे. आजचा जनआक्रोश मोर्चा बाळासाहेबांचे विचाराचे बीज आहे. राम मंदिरा सहित अनेक प्रश्नांसाठी बाळासाहेबांनी आपले आयुष्य वेचले. परंतु, बाळासाहेबांचा मुलगा आणि नातू हा वसा चालवत नाहीत. हे, महाराष्ट्राचे दुदैव आहे, असा टोला किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

हिंदूत्वाचा मोर्चा : शिवसेना भवन येथून जाताना, वाईट वाटत आहे. ज्या बाळासाहेबांनी गर्व से कहो हम हिंदू है, असा नारा दिला होता. त्या बाळासाहेबांच्या नावाने जे राजकारण करत आहेत. त्या पक्षाचा एक ही व्यक्ती या आंदोलनात सामील नाही. हिंदूत्व सोडले आहे का, आज ते खरे हिंदू आहेत, हिंदूत्व त्यांचा प्राण आहे तर त्यांनी मोर्चात सहभागी व्हायला हवे होते. हा कोणताही राजकीय मोर्चा नाही. हिंदूत्वाचा मोर्चा आहे. लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद विरोधात कायदा करण्यासाठी आक्रोश जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी हा मोर्चा आहे, असे शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंवर देखील त्यांनी यावेळी टीका केली. इतर समाज, जातीय मते मिळणार नाहीत, या भीतीने आणि कदाचित शरद पवार यांच्या धाकामुळे ते या मोर्चात सामील झाले नसल्याचा खोचक टोला लगावला. ठाकरे गटाचा यावेळी त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.

हेही वाचा - Dhirendra Shastri on Sant Tukaram Maharaj : बागेश्वर बाबा बरळले! संत तुकाराम महाराजांबद्दल केले आक्षेपार्ह विधान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.