मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई ( High Court slaps BMC ) महानगरपालिकेला दणका दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांना छटपूजाच्या आयोजनाकरिता उच्च न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. घाटकोपरच्या आचार्य अत्रे मैदानावर छट पूजेसाठी राष्ट्रवादीच्या नेत्या राखी जाधव यांच्या मंडळाला परवानगी देण्यात आली आहे. 30 आणि 30 ऑक्टोबर रोजी दुर्गा परमेशवरी सेवा मंडळ या संस्थेला मुंबई उच्च न्यायालयाने पूजेसाठी परवानगी दिली आहे.
छट पूजेचे आयोजन करण्यासाठी मुंबईतील मैदानावर मंडप आणि छठपूजेसाठी कृत्रिम तलाव बांधण्यासाठी दुर्गा परमेश्वर सेवा मंडळाचे ( Durga Parameshwar Seva Mandal ) अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते यांनी पालिकेकडे परवानगी मागितली होती. नोंदणीकृत सोसायटीला बृहन्मुंबई महानगरपालिकेने ( Brihanmumbai Municipal Corporation ) पत्र पाठवत मैदानावर छट पूजा आयोजित करण्यास परवानगी नाकारली. पालिकेच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( Nationalist Congress ) सदस्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याची दखल घेत याचिकाकर्त्यांना सुटटीकालीन न्यायालयाकडे दाद मागण्याचे निर्देश दिले. उत्तर भारतीयांचा छट पूजे येत्या 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी छट पूजेचे आयोजन करण्यासाठी मुंबईतील मैदानावर मंडप आणि छठपूजेसाठी कृत्रिम तलाव बांधण्यासाठी दुर्गा परमेश्वर सेवा मंडळाचे ( Durga Parameshwar Seva Mandal ) अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते यांनी पालिकेकडे परवानगी मागितली होती.
मुंबई पोलिसांनी एनओसी देण्यास दिला नकार : 19 ऑक्टोबर रोजी पालिकेकडून पत्र प्राप्त झाले. ज्यात याचिकाकर्त्यांना परवानगी नाकारण्यात आल्याचे म्हटले होते. त्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. पालिकेने अन्य मंडळांना कथितपणे कोणत्याही अर्जाशिवाय आणि केवळ भारतीय जनता पक्षाने पाठवलेल्या पत्राच्या आधारे छट पूजा आयोजित करण्याची परवानगी दिल्याचे याचिकेत नमूद कऱण्यात आले आहे. वाहतूक आणि अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र असूनही मुंबई पोलिसांनी एनओसी देण्यास नकार दिल्याचा आरोप याचिकेत केला आहे.
सुट्टीकालीन खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश : त्यामुळे इतर मंडळांना दिलेली परवानगी रद्द करून त्याऐवजी याचिकाकर्त्यांच्या मंडळाला विशिष्ट मैदानावर छठ पूजा करण्याची आवश्यक परवानगी देण्यात यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. सदर याचिकेवर गुरुवारी न्या. आर. डी. धानुका आणि न्या. कमल खता यांच्या खंडपीठासमोर तातडीने सुनावणी पार पडली. तेव्हा खंडपीठाने याचिकाकर्त्यांना सुट्टीकालीन खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश दिले होते.