ETV Bharat / state

सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज पुरवल्याचा आरोप; उच्च न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला - sushant singh rajput drug case update

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, "एनसीबीने साहिल शहाचा शोध सुरू केला आहे. तो अद्याप फरार आहे. सुशांत सिंह राजपूत ड्रग्स प्रकरणात साहिल शाह हा प्रमुख संशयित आरोपी आहे. सुशांतला तो ड्रग्ज पुरवत असे".

sushant singh rajput
सुशांत सिंह राजपूत
author img

By

Published : Jun 16, 2021, 6:54 AM IST

मुंबई - मृत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज पुरवल्याचा आरोप असलेल्या आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने नाकारला. साहिल शाह असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीने मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्णयाला दिलेले आव्हान उच्च न्यायालयाने फेटाळले आहे. कारवाई टाळण्यासाठी साहिल सध्या फरार असल्याची माहिती असून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो साहिल शाहच्या मागावर आहे. अटक टाळण्यासाठी शाह यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात अग्रिम जामीन दाखल केला होता. यावर मंगळवारी सुनावणी झाली.

एनसीबीचे अधिकारी काय म्हणाले?

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, "एनसीबीने साहिल शहाचा शोध सुरू केला आहे. तो अद्याप फरार आहे. सुशांत सिंह राजपूत ड्रग्स प्रकरणात साहिल शाह हा प्रमुख संशयित आरोपी आहे. सुशांतला तो ड्रग्ज पुरवत असे".

त्याआधी चार जून रोजी सुशांतसिंग राजपूतचा सहकरी सिद्धार्थ पिठानीला 28 मेरोजी हैदराबादहून एनसीबीने अटक केली. यानंतर त्याला सुशांतच्या मृत्यूशी संबंधित असलेल्या ड्रग्स प्रकरणासंदर्भात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. एनसीबीने राजपूतच्या अंगरक्षक आणि नीरज आणि केशव यापूर्वीच्या मदतीबद्दलही चौकशी केली होती. त्याशिवाय अभिनेत्रीच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने हरीश खान नावाच्या ड्रग पेडलरलाही अटक केली.

हेही वाचा - कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून शेकापचे मा.आमदार विवेक पाटील यांना अटक

अभिनेत्याच्या मृत्यूच्या प्रकरणात ड्रग्स एंगलची चौकशी करणार्‍या एनसीबीने अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अधिकृतपणे संपर्क साधल्यानंतर चौकशी सुरू केली. यात ड्रग्स वापर, खरेदी, वापर आणि वाहतुकीशी संबंधित विविध गोष्टींचा तपास झाला. गेल्या वर्षी 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतने त्याच्या मुंबई येथील निवासस्थानी गळफास घेतला. यात त्याचा मृत्यू झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.