मुंबई- शिवसेना दोन गट पडल्यानंतर ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे, शिंदे गटामध्ये संघर्ष ( Conflict between Uddhav Thackeray and Shinde group ) वेळोवेळी पाहायला मिळाला आहे. 14 नोव्हेंबर रोजी ठाण्यात उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे ( Uddhav Thackeray MP Rajan asked ) शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादानंतर ( MP Rajan Vikhare's controversy with the Shinde group ) ठाणे पोलिसांनी दोन्हीही गटांच्या एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. या प्रकरणात राजन विचारे गटाच्या कार्यकर्त्यांची ठाणे सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला होता. मात्र, आज मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay High Court ) या दोन्हीही आरोपींना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे.
दोन्ही गटांना जामीन मंजूर - ठाणे येथे खासदार राजन विचारे यांच्या दोन गटात मारामारी झाली होती. त्यावेळी दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने जामीन नाकारला होता. त्यानंतर वकील नितीन सातपुते यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज ABA / 3330/ 2022 दाखल केला होता. आज दोन्ही गटांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
युक्तिवाद ऐकल्यानंतर जामीन - राजन विचारे गटाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेण्यात आली होती. या अर्जावर सुनावणी करताना आरोपीच्या वतीने वरिष्ठ वकील नितीन सातपुते यांनी युक्तिवाद करताना घटनास्थळावरील व्हिडिओ न्यायालयासमोर सादर करण्यात केला. त्यावेळी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेणाऱ्या आरोपी पैकी कोणीही आरोपी त्यावेळी हजर नव्हते. तसेच या व्यक्तीने तक्रार केली आहे तो देखील त्यावेळी त्या ठिकाणी हजर नव्हता, असे न्यायालयाच्या समोर वकील नितीन सातपुते यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी चिंतामणी कारखानिस, मधुकर देशमुख यांना अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे दोन्ही आरोपींना वैयक्तिक 25 हजाराच्या जातमुचलकीवर जामीन मंजूर केला आहे तसेच तपास यंत्रणेला सहकार्य करण्याचे देखील अट न्यायालयाने जामीन मंजूर करताना दिली आहे.
काय आहे प्रकरण - 14 नोव्हेंबर सोमवारी रात्री ९.१५ वाजता किसन नगर ३, शंकर नगर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांच्या कार्यालयात सदिच्छा भेटीसाठी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, उपशहर प्रमुख दीपक साळवी, हेमंत नार्वेकर इतर शिवसेना पदाधिकारी गेले होते. शंकर नगर येथील साईज्योत अपार्टमेंट येथील कार्यक्रम पार पडल्यानंतर शेवटीकडी येथील महाशक्ती अपार्टमेंट मधील सुरज अहिरे यांना भेटून सर्वजण निघाले होते. त्यावेळी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे माजी नगरसेवक योगेश जानकर १०० ते १५० कार्यकर्त्यांसोबत तेथे आले. योगेश जानकर यांनी उपशहर प्रमुख दीपक साळवी यांना मला काय बघतोस असे विचारल्यानंतर त्यांच्या बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही गटात मारहाण झाल्याचा प्रकार ठाण्यात घडला होता.