मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( High Court Grant Bail To Anil Deshmukh PS Sanjeev Palande ) यांचे खासगी सचिव संजीव पालांडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) मोठा दिलासा दिला आहे. सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने ( Special PMLA Court ) जामीन फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली होती. आज मुंबई उच्च न्यायालयातील ( Mumbai High Court ) न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने पलांडे यांनी जामीन मंजूर केला आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात ( Anil Deshmukh Money Laundering ) जामीन मिळवणारे संजीव पलांडे हे दुसरे आरोपी आहेत. मात्र संजीव पलांडे ( Anil Deshmukh PS Sanjeev Palande ) यांच्याविरोधात सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात अटकेत असल्याने त्यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे.
अटी शर्तीसह दिला न्यायालयाने जामीन मुंबई उच्च न्यायालयाने संजीव पालांडे ( High Court Grant Bail To Anil Deshmukh PS Sanjeev Palande ) यांना जामीन देताना काही अटी व शर्तीसह जामीन देण्यात आला आहे. संजीव पलांडे ( Anil Deshmukh PS Sanjeev Palande ) यांना 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तसेच या प्रकरणाशी संबंधित कुठल्याही व्यक्तीशी स्वतः साक्षीदारांची आणि पुराव्याशी छेडछाड करण्यात येऊ नये, असे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत. पालांडे यांना उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी काही दिवसाची मुदत देण्यात यावी, अशी मागणी ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग ( Solicitor General Anil Singh ) यांनी केली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे.
काय आहे प्रकरण ? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( Ex Mumbai Police Commissioner Param Bir Singh ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Shiv Sena Chief Uddhav Thackeray ) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh Money Laundering ) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे ( API Sachin Vaze ) यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे ( High Court Grant Bail To Anil Deshmukh PS Sanjeev Palande ) आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.