मुंबई: पोलीस अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी न्यायालयीन परिसरामध्ये उपस्थित राहताना गणवेशात नसल्यासंदर्भात वकील सुभाष झा यांनी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठांसमोर युक्तीवाद केला. दरम्यान मुद्दा उपस्थित केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालय परिसरामध्ये हजर राहणाऱ्या तसेच येणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना गणवेशात हजर राहावे, असे आदेश दिले आहे.
उच्च न्यायालयाने स्पष्ट केले: महिला पोलीस गणवेशात नसल्याकडे एका वकिलाने लक्ष वेधल्यानंतर सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी न्यायालयीन शिष्टाचाराचे पालन करून गणवेशातच न्यायालयात उपस्थित राहावे, असे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले आहे. तसेच गणवेशात उपस्थिती न लावणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याला दंड ठोठावल्याची आठवणही न्यायालयाने करून दिली आहे.
प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर: उच्च न्यायालयात येणारे पोलीस अधिकारी न्यायालयीन शिष्टाचाराचे पालन करत नसल्याचे आणि न्यायालयात येताना गणवेश परिधान करत नसल्याची तक्रार बुधवारी युक्तिवाद करताना वकील सुभाष झा यांनी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर केली आहे. गणवेशात नसलेल्या एका महिला पोलिसाकडे झा यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी न्यायालयाच्या शिष्टाचाराचे पालन करत नसून गणवेश वगळता जीन्स सारख्या कपड्यांमध्ये न्यायालयात उपस्थिती लावत असल्याचे झा यांनी न्यायालयाला सांगितले आहे.
आर्थिक गुन्हे विभागात कार्यरत: झा यांच्या तक्रारीची न्यायालयाने दखल घेतली आहे. तसेच न्यायालयात उपस्थिती लावणाऱ्या पोलिसांच्या कपड्यांसारख्या मुद्यांची सरकारी वकीलांनी काळजी घ्यावी असे स्पष्ट केले आहे. ज्या महिला अधिकाऱ्याचा उल्लेख होतो आहे. त्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागात कार्यरत असून त्यांना गणवेश परिधान करणे बंधनकारक नाही, अशी माहिती सहाय्यक सरकारी वकील संगीता शिंदे यांनी न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयात उपस्थिती लावताना पोलीस अधिकाऱ्यांनी गणवेश परिधान करणे अपेक्षित असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.