मुंबई - आंतरराष्ट्रीय विमानतळावर हेरॉईन जप्त ( Heroin seized at Mumbai international airport ) 35 कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. ड्रग्ज एका ट्रॉलीमध्ये लपवून ठेवले होते. नैरोबीहून येणाऱ्या एका प्रवाशाला मुंबईकडून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ( Chhatrapati Shivaji Maharaj International Airport ) थांबवून त्याच्याकडून ४.९८ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. प्रतिबंधित पदार्थाचे आंतरराष्ट्रीय बाजार मूल्य 35 कोटी रुपये आहे असल्याचे DRI चे म्हणणे आहे.
डीआरआयच्या टीमची कारवाई - नाम्बियाहून मुंबईत ड्रग्जची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती डीआरआयच्या सूत्रांना मिळाली होती. त्यानुसार डीआरआय टीमने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापळा लावला होता. नैरोबीहून येणाऱ्या एका प्रवाशाकडून ४.९८ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले.