ETV Bharat / state

गणेश विसर्जनासमोर विघ्न; मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात - अतिवृष्टीचा इशारा

गणेशोत्सव साजरा होत असताना पावसाने मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार हजेरी लावली. यामुळे दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासमोर विघ्न निर्माण झाले आहे.

गणेश विसर्जनासमोर विघ्न
author img

By

Published : Sep 3, 2019, 8:55 PM IST

मुंबई - गणेशोत्सवाला काल (सोमवार) धुमधडाक्यात सुरूवात झाली आहे. गणेशोत्सव साजरा होत असताना पावसाने मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार हजेरी लावली. यामुळे दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासमोर विघ्न निर्माण झाले आहे.

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात

चौपाट्या, तलाव येथे प्रशासनाकडून विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, पावसात विसर्जनाला निघायचे कसे? असा प्रश्न गणेश भक्तांसमोर निर्माण झाला आहे. तरीही अनेक जण मुसळधार पावसात विसर्जनासाठी बाहेर निघाले आहेत.सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस आज (मंगळवारी) दिवसभर अधूनमधून कोसळत आहे.

हेही वाचा - पूरग्रस्तांसाठी रेल्वे हमालांनी केला गणपतीला नवस

मुंबईत मोठ्या प्रमाणावर दीड दिवसांच्या घरगुती गणपतींचे विसर्जन होते. संध्याकाळी अनेक जण विसर्जनासाठी बाहेर पडतात. मात्र, जोराचा पाऊस सुरू असल्याने लाडक्या बाप्पाला वाजत गाजत निरोप देने शक्य नाही, त्यामुळे गणेश भक्तांचा हिरमोड झाला आहे.
दरम्यान, हवामान खात्यानेही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

Intro:मुंबई । गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत असताना पावसाने मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार हजेरी लावली आहे. संततधार सुरूच आहे. यामुळे दीड दिवसांच्या गणपती विसर्जनासमोर विघ्न निर्माण झाले आहे. चौपाट्या, तलाव येथे प्रशासनाकडून तयारी झाली असली तरी पावसात विसर्जनाला निघायचे कसे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. तरीही अनेक जण मुसळधार पावसात विसर्जनासाठी निरोप दयायला बाहेर निघाले आहेत.Body:सोमवारी मध्यरात्रीपासून पडणारा पाऊस आज मंगळवारी सकाळी अधूनमधून कोसळत होता. दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हवामान खात्यानेही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पाऊस पडत राहिल्यास मुंबईच्या जनजीवन विस्कळीत होऊ शकते.
मुंबईत मोठ्या प्रमाणावर दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होते. संध्याकाळी अनेक जण विसर्जनासाठी बाहेर पडतात. पाऊस सुरू असल्याने बाप्पा ला वाजत गाजत निरोप देऊ शकत नाही, याबाबतही अनेकांचा हिरमोड झाला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.