ETV Bharat / state

राज्यात मुसळधार; सोलापूर, पुण्यात पाऊस ओसरला...विविध ठिकाणी बचावकार्य सुरू

मंगळवारपासून राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. सोलापूर पुणे, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी पावसाने झोडपून काढले आहे. मुंबईतही बुधवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. तर सोलापूर जिल्ह्यात भीमा आणि सीना या दोन्ही नदीला पूर आला आहे. पुणे जिल्ह्यालाही पावसाने झोडपून काढल्याने अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

heavy-rainfall-in-mahrashtra
राज्यात मुसळधार
author img

By

Published : Oct 15, 2020, 11:27 AM IST

Updated : Oct 15, 2020, 5:42 PM IST

मुंबई - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला हवेच्या कमी दाबाचा पट्टा राज्यात सक्रीय झाल्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवार पासून सुरू झालेल्या या पावसाने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला झोडपून काढले आहे. मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या पावसामुळे सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पंढरपुरात चंद्रभागा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. राज्यातील या अतिवृष्टीचा आढावा घेणारा ईटीव्हीचा हा वृत्तांत...

राज्यात मुसळधार;

मुंबई - मंगळवारी रात्री ८ वाजल्यापासून मुंबईत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने मुंबईतील सखल भागात पाणी साचले होते. सध्या मुंबईतील पावसाने उसंत घेतली आहे. मात्र, येत्या १२ तासासाठी मुंबईसह ठाणे, रायगड कोकणला हवामान विभागाने रेड अलर्ट घोषित केला आहे. मुंबईत गेल्या २४ तासात कुलाबा येथे ११५.८ मिमी, सांताक्रुझ- ८६.५ मिमी, नवी मुंबईमध्ये १०० ते १२० मिमी. ठाण्यात ७८मिमी पावसाची नोंद झाली आहे.

LIVE : मुंबईला रेड अलर्ट... शहरासह उपनगरात पावसाचा जोर वाढला

पुणे - जिल्ह्यात बुधवारी रात्री अतिवृष्टी झाली. शहरासह जिल्ह्याला तुफानी पावसाने झोडपून काढले आहे. पुणे जिल्ह्यातील सोलापूर रस्त्यावरील गावांना उजनी धरणाच्या पाण्याचा फटका बसला आहे. तसेच पुणे सोलापूर हा राष्ट्रीय महामार्गही बंद करण्यात आला होता. निमगाव केतकी येथे पूरपरिस्थितीमुळे 40 ते 50 नागरिक अडकले होते. त्यांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलवले आहे. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी वाहतानाचे दृश्य दिसून आले.

जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर तालुक्यांत मागील पंधरा दिवसांपूर्वी काढणीला आलेला बटाटा परतीच्या पावसाने चिखलात सडला आहे. सतत सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे लागवड केलेला कांदाही वाहून गेला. काही ठिकाणी पाण्याची पातळी वाढल्याने बराखीत काढलेला कांदा भिजलाय.

  • दौडमध्ये ४ जण वाहून गेल्याची घटना घडली आहे.

तसेच काल झालेल्या मुसळधार पावसाने अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे शहरात झाड पडल्याच्या 10, तर विविध भागात पाणी साठल्याच्या 45 घटनांची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यात पुराच्या पाण्यात दोन दुचाकी वरीचार जण वाहून गेल्याचीही घटना घडली आहे.

पुणे शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर सिंहगड रोड येथे पावसाच्या पाण्यात दुचाकीही वाहून गेल्या आहेत. पाऊस थांबल्यानंतरही काही भागात सकाळपर्यंत पाणी साचले होते. सिंहगड रोडवरील पानमळा परिसरात मोठ्याप्रमाणत पाणी साचले होत. रस्त्यांवरही पाणी साचल्याने वाहतुकीला आणि स्थानिकांना ये जा करण्यासाठी अडचण होत होती. दांडेकर पुलालगत सर्व्हे नंबर 133 मधील काही नागरिकांना साने गुरुजी शाळा आणि मनपा कॉलनी शाळा या दोन्ही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

मुसळधार पावसाने इंदापूरला झोडपले; पुरात अडकलेल्या ४० ते ५० जणांना नेले सुरक्षितस्थळी

सोलापूर- मंगळवारपासून सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. बुधवारीही पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणच्या ओढे, नदी नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यात भीमा, सीना,मान, बोरी,या नद्यांना पूर आला आहे. नदी काठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. उजनी धरणातून सध्या २ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने आणि वीर धरणातून येणाऱ्या पाण्यामुळे पंढरपुरात भीमा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या ठिकाणी प्रशासनाकडून आपत्तीव्यवस्थापनच्या दृष्टीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर सुरक्षेच्या दृष्टीने बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या तुकड्या दाखल झाल्या आहेत.

पंढरपुरात भिंत कोसळली..सहा जणांचा मृत्यू, आणखी काहीजण अडकल्याची भीती

उस्मानाबाद - जिल्ह्याला देखील मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. या पावसामुळे मांजरा नदीला पूर आला आहे. तसेच पंराडा तालुक्यातील सीना कोळेगाव प्रकल्प १०० टक्के भरला आहे. त्यामुळे धरणातून २५०० क्युसे्क पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील धरणे तुडुंब, सीना कोळगाव प्रकल्पातून विसर्ग सुरू

कोल्हापूर- सोलापूर सांगली प्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातही अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

सांगली - राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा फटका सांगली जिल्ह्यालाही बसला आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून शहरातील आयर्विन पूलाजवळील पाणी पातळी 29 फुटांवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 10 फूट आणि तीन तासात पाच फूट पाणीपातळी वाढली आहे. अजूनही पाणी पातळी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कराड (सातारा) - परतीच्या संततधार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे साडे तीन फुटांनी उचलून 34,211 क्युसेक इतका विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील कण्हेर, धोम आणि तारळी या धरणांचे दरवाजे आणि पायथा वीजगृहातूनही विसर्ग सुरू आहे. उरमोडी धरणाचे दरवाजे पहाटे बंद करण्यात आले असून केवळ वीजगृहातून 400 क्युसेक विसर्ग सुरू ठेवला आहे.

रायगड : पश्चिम बंगाल समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सुरू झालेल्या अतिवृष्टीने रायगडातील शेतीला चांगलाच फटका बसला आहे. पावसाने बहरलेली उभी भात पिके कोलमडून पडली आहेत. हाताशी आलेले पीक हे पडल्याने शेतकरी हा चिंतातुर झाला आहे. 17 ऑक्टोबर पर्यत अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने शेतकरी हा चिंताग्रस्त झाला आहे.

राज्यात गेल्या २४ तासात सकाळी ८.३० पर्यंत सोलापूर 82.0 मिमी ठाणे 78.0 मिमी, पुणे 112.1 मिमी सातारा - 85.1 मिमी, रत्नागिरी 122.9 मिमी, कोल्हापूर 130.4 मिमी, महाबळेश्वर 131.9 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

Last Updated : Oct 15, 2020, 5:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.