ETV Bharat / state

देशात उष्णतेची लाट; 'या' राज्यांना बसणार सर्वाधिक झळा - सौराष्ट्र, कच्छ, कोकण आणि गोव्यात उष्णतेची लाट

आग्नेय दिशेला बंगालच्या उपसागरातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे ईशान्य भारतात येत्या 29 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान, मोठ्या पट्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उष्णतेची लाट
उष्णतेची लाट
author img

By

Published : Mar 27, 2021, 1:03 PM IST

मुंबई-राज्यात तापमानात भलतीच वाढ झाली आहे. चक्रीय चक्रवात आता विरुन गेल्याने हवामान कोरडे झाले आहे. कोकणात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. ही लाट आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हिमालय प्रदेश आणि पंजाबमध्ये पाऊस
वेस्टर्न डिस्टर्बनस आणि त्यामुळे निर्माण झालेल्या चक्रवाती हवेमुळे पश्चिमी हिमालय प्रदेश आणि पंजाब या भागात 22 ते 24 मार्च या काळात विस्तृत परिसरात पाऊस/बर्फवृष्टी/वादळे निर्माण झाली होती. तसेच यामुळे, ईशान्य भारत आणि मध्य भारतातही या काळात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. राजस्थानातही या दोन दिवसात तुरळक ठिकाणी गारपीट/वारावादळ झाल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा- प्रभादेवीत इमारतीला भीषण आग; जीवितहानी नाही

कोकण आणि गोवा या भागात उष्णतेची लाट

देशाच्या मध्यभागात निर्माण झाल्या चक्रीवातांमुळे मध्य भारतात गेल्या आठवड्यात 18 ते 24 मार्च अनेक भागांमध्ये हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळीवाऱ्यासह पाऊस झाला आहे. आग्नेय दिशेला बंगालच्या उपसागरातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे ईशान्य भारतात येत्या 29 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान, मोठ्या पट्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात, या प्रदेशातील काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आज सौराष्ट्र आणि कच्छ तसेच कोकण आणि गोवा या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, उत्तर गुजरात भागात 27 आणि 28 मार्चला उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- ड्रीम्स मॉल आग प्रकरण : मॉल व रूग्णालय संचालकांविरोधात गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.