ETV Bharat / state

Shiv Sena Symbol Hearing : शिवसेनेच्या चिन्हावर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी - शिवसेनेच्या चिन्हावर जानेवारीत सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेनेच्या चिन्हावर आणि नावावर सुनावणी ( Hearing On Shiv Sena Symbol ) पार पडली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यावर सुनावणी होणार आहे.

Shiv Sena Symbol Hearing
Shiv Sena Symbol Hearing
author img

By

Published : Dec 12, 2022, 2:08 PM IST

Updated : Dec 12, 2022, 5:17 PM IST

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटाने पक्ष आणि चिन्हावर दावा केला. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट असून सर्वोच्च न्यायालयाने यावर आज सोमवार (दि. 12 डिसेंबर)रोजी सुनावणी ( Hearing On Shiv Sena Symbol ) झाली. दरम्यान, दोन्ही गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. पुढील सुनावणी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार ( Hearing In First Week Of January ) असल्याची माहिती खासदार अनिल देसाईंनी दिली.

धनुष्यबाण चिन्ह गोठवले : शिवसेनेतील वादावर गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. नेमकी शिवसेना कोणाची? या प्रश्नावर निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवले. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना वेगळी नावे आणि चिन्हे दिली. त्यानंतर ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यासंबधी याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनात्मक पीठापुढे 29 नोव्हेंबरला ही सुनावणी होणार होती. परंतू काही कारणास्तव ही सुनावणी लांबणीवर ( Shiv Sena Bow And Arrow Symbol Frozen ) पडली.

ठाकरे गटाचे प्रतिनीधी उपस्थित : मागील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना आपली लिखित बाजू मांडण्यास सांगितले. दोन्ही पक्षकारांना सर्वोच्च न्यायालयाकडून तीन आठवड्यांची मुदत दिली. शिवसेना आणि शिंदे गटाच्या पक्षचिन्हाच्या हक्कावर आज दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगात सुनावणी झाली. शिंदे गट आणि ठाकरे गटाचे प्रतिनिधी या सुनावणीच्या वेळेस निवडणूक आयोगात उपस्थित होते. वकिलांसह ठाकरे गटाचे नेते, खासदार अनिल देसाई उपस्थित होते. शिंदे गटाकडून वकिलां व्यतिरिक्त कुणीही यावेळी हजर नव्हते. या प्रकरणावर आता पुढील सुनावणी ही जानेवारी महिन्यात होणार आहे, पहिल्या आठवड्यात यावर चर्चा होणार आहे, कोणत्या पक्षाने किती सदस्यांनी माहिती दिली, किती कागदपत्र सादर केली, याबद्दल पुढील सुनावणीमध्ये चर्चा होणार आहे. अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली.

पुढच्या सुनावणीत निर्णय : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्यावतीने जवळपास पंधरा लाखापेक्षा जास्त प्राथमिक सदस्यांचे पत्र आणि तीन लाखाच्या जवळपास शपथपत्र केंद्रीय निवडणूक आयोगामध्येआतापर्यंत सादर केले आहेत. तर शिंदे गटाने सात लाख सदस्यांची नावे केंद्रीय निवडणूक आयोगाला दिली आहेत. ठाकरे गटाने शिंदे गटापेक्षा दुप्पट सदस्यांची यादी सादर केली आहे. आतापर्यंत ठाकरे गटाकडून 182 राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे पत्र, जवळपास 2 लाख 83 हजार पदाधिकाऱ्यांच्या प्रतिज्ञापत्र आणि जवळपास 15 लाख प्राथमिक सदस्य नोंदणी निवडणूक आयोगाकडे सोपवली आहेत. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव कोणाला द्यायचं यासंदर्भात निर्णय घेणार आहे.

शिंदे गटाला निशाणी 'ढाल तलवार' : केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला निशाणी 'ढाल तलवार' दिली ( Shinde Group Symbol Shield Sword ) होती. त्याशिवाय एकनाथ शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव देण्यात आले आहे. यासोबतच उद्धव ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव देण्यात आले होते. मात्र शिवसेनेची पारंपारागत निशाणी असलेले धनुष्यबाण गोठवण्यात आली ( Mashal Symbol To Uddhav Thackeray ) होते. शिवसैनिकांमध्ये हळहळ व्यक्त होत ( Shiv Sena bow and arrow symbol frozen ) होती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देत असताना आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. विरोधकांमुळेच शिवसेनेची धनुष्यबाण ही निशाणी गोठली, असा आरोप नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर केला होता.

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक : चिन्ह गोठवताना आयोगाने सांगितले की, अंधेरी पूर्व जागेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही गटांपैकी एकालाही ‘धनुष्यबाण’ चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्हे या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या चिन्हांच्या यादीतून दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्हे निवडण्यास सांगण्यात आल्याचे आयोगाने म्हटले होते.

Last Updated : Dec 12, 2022, 5:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.