ETV Bharat / state

Sanjay Raut: मेधा सोमय्या यांच्या संजय राऊत विरोधातील अब्रुनुकसानी याचिकेवर 6 जानेवारीला सुनावणी - against Sanjay Raut

Sanjay Raut: मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या काही सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम आणि देखभालीच्या 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात आपण गुंतल्याचा आरोप करणारे वृत्त 15 व 16 एप्रिलला प्रसिद्ध झाले होते. ते वाचून आपल्याला धक्का बसला असे डॉ. मेधा सोमय्या यांनी तक्रारीत म्हटले आहे. न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी 6 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली.

Sanjay Raut
Sanjay Raut
author img

By

Published : Dec 14, 2022, 2:53 PM IST

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीचा याचिकेवर आज सुनावणी दरम्यान संजय राऊत यांच्या वकिलांकडून सुनावणी गैरहजर राहण्याकरिता परवानगी देण्यात यावी, याकरिता शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर अर्ज करण्यात आला आहे. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी 6 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

सुनावणी 6 जानेवारीपर्यंत तहकूब: दिल्लीमध्ये सुरू असलेल्या संसदीय अधिवेशनाकरिता संजय राऊत दिल्लीला असल्याने आज न्यायालयात हजर राहू शकले नाही. त्यामुळे त्यांना गैरहजर राहण्याची परवानगी देण्यात यावी, असे अर्ज न्यायालयात वकिलांमार्फत करण्यात आले आहे. नंतर न्यायालयाने या प्रकरणावरील सुनावणी 6 जानेवारीपर्यंत तहकूब केली आहे. संयज राऊत यांनी किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.

फसवणूक करण्यात आल्याचा आरोप: मीरा भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आले आहेत. त्यातील 16 शौचालये बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रे सादर करून मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांवर आहे. तसेच साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत सर्वप्रथम हा मुद्दा उपस्थित केला होता.

हजर राहण्याचे आदेश: त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान याप्रकरणी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. याप्रकरणी त्यांना अनेकवेळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. शिवसेना नेते संजय राऊत यांना मागील सुनावणी दरम्यान कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिवडी न्यायालयात सुनावणी दरम्यान हजर राहण्याची निर्देश दिल्यानंतर त्यावेळी संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावरील सर्व आरोप योग्य असल्याचे म्हटले होते. आता या प्रकरणात नवीन काय खुलासा होतो हे महत्त्वाचं असणार आहे.

काय आहे प्रकरण: मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या काही सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम आणि देखभालीच्या 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात आपण गुंतल्याचा आरोप करणारे वृत्त 15 व 16 एप्रिलला प्रसिद्ध झाले होते. ते वाचून आपल्याला धक्का बसला असे डॉ. मेधा सोमय्या यांनी तक्रारीत म्हटले आहे. राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेली वक्तव्यं ही बदनामीकारक आहेत. सर्वसामान्यांच्या नजरेत आपली बदनामी करण्यासाठी ही विधाने करण्यात आल्याचा दावाही डॉ. मेधा सोमय्या यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.