ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात?...

author img

By

Published : Apr 13, 2020, 2:02 PM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. तर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र, त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक अणाऱ्या साधनांचा सध्या तुटवडा असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी रुग्णालयातील कर्मचारी, स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटायझर, पिपीई किट नसल्याचे आढळून येत आहे.

health-of-medical-staff-and-sweepers-in-danger-as-theyre-most-vulnerable-to-coronavirus

मुंबई- केंद्र आणि राज्य पातळीवर साऱ्या यंत्रणा कोरोनाशी झुंजत असल्या तरी देशात विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. तर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र, त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक अणाऱ्या साधनांचा सध्या तुटवडा असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी रुग्णालयातील कर्मचारी, स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटायझर, पीपीई किट (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट) नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे त्यांना कोरोनाचा धोका अधिक आहे. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला आहे.

पालिकेच्या रुग्णालयात सुरक्षेची वानवा...

कोरोनावर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार केले जात होते. रुग्णांची वाढती संख्या पाहता पालिकेने आपल्या इतरही रुग्णालयात कोरोनावर उपचार करण्यास सुरुवात केली आहे. काही रुग्णालयात उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पालिकेने खासगी रुग्णालयेही ताब्यात घेतली असून त्यामध्येही उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, पालिकेच्या रुग्णालयात सुरक्षेची काळजी घेतली जाय नसल्याची तक्रार कर्मचाऱ्यांची आहे.

रुग्णालय कर्मचारी

मुंबईत रुग्णाची वाढती संख्या...

मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचे मुंबईमध्ये 12 एप्रिलपर्यंत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 1399 वर गेला आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण 91 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये गेल्या 24 तासांत झालेल्या 16 मृत्युंपैकी 15 जणांना दीर्घकालीन आजार होते. तर एकाचा वयोवृद्ध असल्याने मृत्यू झाला आहे. 16 मृत्युंपैकी 10 पुरुष तर 6 महिला आहेत. मुंबईमध्ये गेल्या 24 तासात 26 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत एकूण 99 रुग्णांना बरे करुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र या रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या क्षेत्रातील सर्वांना सतावत आहे.

कर्मचाऱ्यांना सेफ्टी किट नाहीत...

कांंदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात कोरोनावर उपचार करण्यासाठी भरती करण्यात आले आहे. त्याठिकाणी कर्मचाऱ्यांना सेफ्टी किट देण्यात आले नसल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिला होता. आधी सेफ्टी किट द्या अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. तर खार येथील व्ही एन देसाई रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरु आहेत. मात्र त्याठिकाणी सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाणार, सेफ्टी किट दिले जाणार आहे की नाही. यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते.

कर्मचारी

कोरोना विषाणूची दहशत सर्वत्र पसरली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या कोणत्याही सुविधा नसल्याने कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी वॉर्डच्या बाहेर ठाण मांडून बसले होते. तर खार येथील व्ही एन देसाई रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते.

जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक साहित्य नाही...

जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे आता कोव्हिड- 19 रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. परंतु, याठिकाणी कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक ते साहित्य उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे.

रुग्णालय

पीपीई किटचा साठा संपला...

जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पीपीई किटचा साठा संपला आहे. रुग्णालय प्रशासनाने 2 हजार पीपीई किटची मागणी शासनाकडे नोंदवली आहे. विशेष म्हणजे, शहरातील एका वकिलाने जिल्हा रुग्णालयातील पीपीई किटचा साठा संपल्याचे समजल्यानंतर मुंबईतील भंडारी नामक एका समाजसेवकाकडून 50 पीपीई किट उपलब्ध करुन दिले आहेत.

पीपीई किट

एचआयव्ही किटचा वापर...

जिल्हा रुग्णालयात पीपीई किट नसल्याने वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी एचआयव्ही किटचा वापर करत आहेत. याठिकाणी सर्जिकल मास्क आणि हॅन्डग्लोजचा साठा देखील मर्यादित आहे. त्याचप्रमाणे जळगाव शहर महापालिका प्रशासन देखील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने शहराच्या स्वच्छतेसाठी एका खासगी कंपनीला ठेका दिला आहे. या कंपनीच्या 400 मजुरांकडून कचरा संकलन, रस्ते व गटारी सफाई होते. या मजुरांना ड्रेस, मास्क, हॅन्डग्लोज अशी साधने नाहीत. कचरा संकलनासाठी महापालिकेकडे लोडर, स्कीप लोडर, घंटागाड्या, ट्रॅक्टर, कॉम्पॅक्टर अशी सुमारे दीडशे वाहने आहेत. त्यावरील चालकांना देखील ड्रेस, मास्क, हॅन्डग्लोज अशी साधने नाहीत.

एचआयव्ही किट

कोल्हापुरात सफाई कर्मचाऱ्यांचे प्रभावीपणे काम सुरू...

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 6 वर पोहोचली आहे. कोरोनाचा कोल्हापुरात एकही रुग्ण नव्हता तेंव्हापासून कोल्हापूरात अतिशय चांगल्या पद्धतीने ही संपूर्ण परिस्थिती हाताळण्यात येत आहे. याठिकाची आरोग्य यंत्रणा अत्यंत प्रभावीपणे काम करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळेच कोल्हापुरातील पहिला कोरोनाबधित सद्या कोरोनामुक्त झाला आहे. त्याची पहिली टेस्ट निगेटीव्ह आली आहे आणि त्याची प्रकृती सुद्धा अत्यंत चांगली आहे. जिल्ह्यात आरोग्य विभागाचे कर्मचारी त्याच बरोबर नगरपालिका आणि कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील सफाई कर्मचारी हे प्रभावीपणे काम करताना दिसून येत आहेत.

काही ठिकाणी सफाई कामगारांच्या चांगल्या सेवेमुळे नागरिकांकडूनच सत्कार होताना पाहायला मिळत आहे. प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा आणि साधनं उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. त्यामुळे कर्मचारी सुद्धा चांगल्या पद्धतीने आपली सेवा देत आहेत.

औरंगाबादमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात...

कोरोनाच्या अनुषंगाने सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजे स्वच्छता कर्मचारी. शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे महानगर पालिका दुर्लक्ष करत असल्याच वारंवार दिसून आल आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर, अशा अनेक सुविधा महानगर पालिकेने देणे आवश्यक आहे. मात्र, तसे होत नसल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा कर्मचारी संघटनेने याबाबत अनेकवेळा पाठपुरावा केला असला तरी मनपा प्रशासन आश्वासन देत असून कृतीमात्र शून्य असल्याच चित्र आहे. त्यात मनपा कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मनपात काम करणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे.

सफाई कर्मचारी

सुविधा मिळत नाहीत, तोपर्यंत सेंट जॉर्जमध्ये कोरोना रुग्ण आणण्यास कर्मचाऱ्यांचा विरोध...

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशभर वाढत चाललेला आहे. एकामागोमाग एक असे रुग्ण आढळत चाललेले आहे. त्यामुळे राज्यात- शहरात अनेक रुग्णालय उपचारासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. यामध्ये मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात देखील कोरोना संशयित रुग्ण ठेवले जातील असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. पण रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा याला विरोध आहे. कारण कर्मचाऱ्यांना प्रशासनाने सुरक्षा साहित्य दिलेली नाही. त्यामुळे त्यांचा विरोध आहे. हे रुग्ण आणून आमच्या जिवाशी प्रशासन खेळत आहे असे कर्मचारी सांगत आहेत.

जीवाशी खेळून प्रशासन काम करायला लावतयं...

मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटल हे राज्यशासनाचे महत्त्वपूर्ण रुग्णालय आहे. याठिकाणी उपचारासाठी खास उपलब्धी आहे. परंतु, या रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जे सेफ्टी साहित्य दिले जाते ते अद्याप मिळाले नाही. त्यामध्येच प्रशासनाने कोरोना वायरस संशयित रुग्ण या ठिकाणी आणण्यास सुरुवात केलेली आहे. त्‍यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळून हे प्रशासन आम्हाला काम करायला लावत आहे, असे म्हणत सेफ्टी द्या, अन्यथा आम्ही काम करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

रुग्णालयातील कर्मचारी

आमच्या आरोग्याचं काय?

सेंट जॉर्ज रुग्णालयात आया, परिचारिका, वॉर्डबॉय आणि इतर साफसफाई कर्मचारी आहेत. त्यांना प्रशासनाने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अद्याप सेफ्टी किट दिलेला नाही. जुन्याच एचआयव्ही किट आम्हाला दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेतो. परंतु, आमच्या आरोग्याचा काय? असा प्रश्न कर्मचारी विचारत आहेत. तसेच साफसफाई करणारे 70 ते 80 कर्मचारी आहेत. त्यांनादेखील कोणत्याही प्रकारची सुविधा प्रशासनाने दिली नाही. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सेंट जॉर्ज रुग्णालयात कोरोना संशयित रुग्ण आणले जात आहेत. याची माहिती अद्याप रुग्णालयातील अधीक्षकांनी कर्मचाऱ्यांना दिले नाही. जे रुग्ण आणलेले आहेत. त्यांच्याबाबत ही स्पष्टता रुग्णालय करत नाही. त्यामुळे रुग्णांच्या जवळ असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच माहिती नसेल तर कर्मचाऱ्यांच्या जीवाशी प्रशासन खेळत आहे असे कर्मचाऱ्यांचे म्हणने आहे. जोपर्यंत आम्हला सेफ्टी मिळत नाही. तोपर्यंत आम्ही काम करणार नाही अशी भूमिका आता कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.