मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. अशातच लॉकडाऊन झाल्यास रोजगार जाऊन उपासमारीची वेळ येईल, अशी सर्वसामान्यांमध्ये भीती आहे. परंतु, सध्या तरी लॉकडाऊनबाबत निर्णय नाही, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. गर्दीच्या ठिकाणी कठोर निर्बंध लावण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
गर्दीच्या ठिकाणी कठोर निर्बंध राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग वाढतो आहे. दिवसेंदिवस वाढणारा संसर्ग राज्य सरकारची डोकेदूखी ठरत आहे. राज्यातील काही भागांत बेड उपलब्ध नाहीत. व्हेंटिलेटर, आरोग्य सेवा सुविधा मिळत नसल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांना बेड वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोचा संसर्ग रोखायचा असेल तर गर्दीच्या ठिकाणावर निर्बंध घालायला हवेत. त्यादृष्टीने गर्दीची ठिकाणांवर कठोर निर्बंध लादण्याचा शासनाचा विचार आहे. सध्या लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार नसल्याचे टोपे म्हणाले.
यापुढे गर्दी होता कामा नये औरंंगाबाद येथे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन रद्द केले. खासदार इम्तियाज जलील यांच्यासह समर्थकांनी याबाबत जल्लोष साजरा केला. यावेळी कोरोनाचे नियम यावेळी धाब्यावर बसविण्यात आले. सोशल मीडियावर याचे व्हिडीओ व्हायरल झाले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावर जलील यांना खडेबोल सुनावले. अशी गर्दी करणे योग्य नाही. आणि यापुढे ती होताही कामा नये, असा इशाराही मंत्री टोपे यांनी दिला आहे.
राजेश टोपे यांनी यावर जलील यांना खडेबोल सुनावले पवार यांच्या पित्ताशयात अजूनही काही खडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयामध्ये खडा निर्माण झाल्याने ब्रीच कॅण्डी रुग्णालयात शस्त्रकियेद्वारे तो काढण्यात आला. अजूनही काही खडे आहेत. तेही शस्त्रक्रियेद्वारे काढावे लागणार आहेत. त्यासाठी नियोजन करावे लागेल. ते काढल्यानंतर पवार यांचा त्रास कमी होईल. परंतु, प्रकृती स्थिर झाल्याशिवाय काहीही करु शकत नाही. आता चार ते पाच दिवसांनी डिस्चार्ज मिळेल. मात्र, त्यानंतर १० ते १२ दिवसांनी पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागेल, असे आरोग्य मंत्री टोपे म्हणाले.
हेही वाचा - पोटच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम बाप गजाआड